-->
संपादकीय पान शनिवार दि. २१ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नवचैतन्याची प्रेरणा
सरत्या वर्षाला निरोप देऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा येते नव्या नव्हाळीच्या पालवत्या क्षणांना बरोबर घेऊन, सर्वांगांनी अशी रंगबिरंगी नव्याची नवलाई घेऊन. नववर्षाचा पहिला दिवस म्हणून चैत्र प्रतिपदा साजरी केली जाते ती गुढीपाडवा या नावाने ! धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीनेही या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. नवचैतन्याला प्रेरक ठरणार्‍या, मरगळलेल्या, अनुत्साहीत मनांना जागवणारा हा सण. यावर्षी निसर्ग काहीसा बदललाय. अवकाळी पावसानं ऐन ङ्गाल्गुनातही थंडी कायम ठेवली आहे. त्यामुळे होळीनंतर दरवर्षी उत्तरोत्तर उन्हाचा तडाखा अजून वाढलेला नाही. त्यामुळे लाहीलाही करणारा उन्हाळा अजुन दूरच आहे. असं असलं तरी या वातावरणाचा भारतीयांच्या उत्सवी प्रेमावर परिणाम झालेला नाही. त्यात चैत्राची चाहूल लागणं म्हणजे तर आनंदाला उधाण येणं. त्यामुळे चैत्राचं स्वागत मोठ्या थाटामाटात होतं. चैत्रात निसर्गाचं चित्र बदलत असतं. नव्या नव्हाळीनं जणू निसर्ग सजलेला असतो. खरं तर या क़ाळात झाडं आपला हिरवा रंग हरवून बसलेली असतात. अंगांगावरची पानं गाळून शुष्क झालेली, पण एक जादुई रंगीन नखरा त्यांना बहाल झालेला. अंगावरचं अखेरचं पान झडूनही त्याचं माथं नुसतं लालभडक ङ्गुललले असते. आपल्या पंख्यासारख्या ङ्गांद्यांनी शांतवणारा गुलमोहर, तोही आता तारुण्याच्या जोशात! एकेक पान गळून पडलंय; पण शेंदरी, लाल ङ्गुलांच्या झुबक्यांनी नुसता डवरलाय ! पिवळाधम्म अमलताश,  सोनमोहरांनी लगडलेला बहावा, आपल्या सुवर्णरंगी ङ्गुलांचा दिमाख मिरवतोय. सोन्याची रासच अंगोपांगी मढवून बसलाय. नाजूक, गुलाबी पाकळ्यांचा कॅशिया आपलं खानदानी सौंदर्य जपतोय. हवेत धुंद मोगर्‍याचा सुगंध दरवळतोय. वडा-पिंपळाच्या वठलेल्या झाडालासुद्धा तांबूस, कोवळी पालवी ङ्गुटलेय. सार्‍या आसमंताला वसंताची चाहूल लागली आहे. वसंतपंचमी साजरी झाली ती माघातच. पण चैत्र आला म्हणताच, दारासमोर चैत्रांगण सजायच्या आधीच निसर्गातलं चैत्रांगण सजू लागतं. हवेतली उष्णता दिवसेंदिवस वाढतेय; पण मग हा सृजनोत्सव कसा ? जमिनीत खोल मुरलेलं पाणी पिऊन झाडांवर उगवलेली ही कौतुकाची कोवळीक आणि लसलसत्या लालम्‌लाल आणि पिवळ्याधम्म हळदी-कुंकवी रंगाची उधळण! भुईच्या कुशीतून वर यायला, तांबूस कोवळ्या पालवीलाही अशी उबेची गरज असते. म्हणून हे निसर्गातलं सृजनरुपी टवटवीत चैत्रांगण ऐन कडाक्याच्या उन्हात नेत्रांना सुखावणारं आणि पानगळीच्या दिवसांबरोबरच ङ्गुलांचं रसरसून ङ्गुलणं, मन आकर्षित करणारं, निसर्गानं ही विरोधलय कशी जपलीय पहा, जनन-मरणाचा सोहोळा एकाच समेवर, ग्रीष्माचा दाह सुसह्य व्हायलाच का रंगोत्सव आणि नवजात पालवीची कोवळीक! सरत्या वर्षाला निरोप देऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा येते ती अशी नव्या नव्हाळीच्या पालवत्या क्षणांना बरोबर घेऊन, सर्वांगांनी अशी रंगबिरंगी नव्याची नवलाई घेऊन. नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ही चैत्र प्रतिपदा साजरी केली जाते ती गुढीपाडवा या नावाने. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीनेही या दिवसाला महत्वपूर्ण स्थान. नवचैतन्याला प्रेरक ठरणारा हा सण. शालिवाहनाने मातीच्या सैन्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण भरला, अशी कथा आहे. तसा मरगळलेल्या, अनुत्साहीत मनांना जागवण्याचा हा दिवस. प्रभू श्रीरामचंद्राने वालीच्या जुलुमातून दक्षिणेकडील लोकांना मुक्त केले. तो आनंद साजरा केला गेला तो याच दिवशी, घराघरांवर गुढ्या-तोरण उभारुन. आजही घरोघरी गुढ्या उभारुन हा सण साजरा केला जातो. पारंपरिक गुढी उभारणं म्हणजे तरी काय? कडुनिंबाची वा आंब्याची हिरवीकंच डहाळी, तिच्या निमुळत्या टोकावर भरजरी-रेशमी वस्त्राची सळसळ आणि त्यावर चांदीच्या कलशाची चमचमती झळाळी. दिमाखात उभारलेल्या या गुढीला मोहक, नयनरम्य ङ्गुलांची माळ. या सार्‍याचे माधुर्य वाढवणारा साखरेच्या गाठ्यांचा हार. नव्या वर्षातील आनंदाची ग्वाही देणारी, भारतीयांच्या घराघरात श्रद्धेनं ङ्गडकणारी गुढी! गुढीचं रुपडं एखाद्या कुंची घातलेल्या राजस, लोभसवाण्या बाळासारखं दिसतं. गुढी शक्य असेल तेवढ्या उंच उभारायची! निळ्याभोर आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर घराघरातून उभारलेल्या या गुढ्या म्हणजे वसंतऋतूच्या आगमनाची मानवनिर्मित रंगीत सुरुवात. गुढ्या म्हणजे नव्या वर्षाची, नव्या संकल्पांचीही सुरुवात. गुढीसाठी वापरलेल्या वस्तूंचा प्रतिकात्मक अर्थही किती सुंदर आह, गुढीसाठी वापरलेली आंब्याची किंवा कडूलिंबाची डहाळी म्हणजे जीवनधाराच. मांगल्याचं, हिरवाईचं, सृजनाचं ते प्रतिक. गुढीचं चांदीचं पात्र म्हणजे जीवनरस साठवून तो ग्रहण करण्याचं साधन. गुढीसाठी वापरलेलं रेशमी वस्त्र म्हणजे आपलं संरक्षण, आपली संस्कृती. गुढीवर लटकवलेली साखरेच्या गाठ्यांची माळ म्हणजे जीवनातल्या गोडीचं प्रतिक. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण वेळ शुभघटिकाच असते. नववर्षाच्या शुभारंभी येणारा पाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी व्यापारी, दुकानदार, कारखानदार, विक्रेते त्यांच्या कार्याचा शुभांरभ करतात. इमारतीची पायाभरणी, उद्घाटन, गृहप्रवेश अशी अनेक शुभकार्ये या मुहुर्तावर पार पडतात.आज गरज आहे काळाच्या गरजेनुसार नवनवे संकल्प करण्याची. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची, श्रेष्ठत्वाची, पराक्रमाची, आनंदाची ध्वजा. निसर्गातील सृजनोत्सवांच्या आणि रंगोत्सवाच्या शुभवेळेची सम साधून आपणही नवनव्या संकल्पांच्या गुढ्या उभारुया आणि नववर्षाला डोळसपणे सामोरं जाऊ या.
----------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel