विकासाचा मुद्दा गायब
शनिवार दि. 06 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
-----------------------------------------------
विकासाचा मुद्दा गायब
गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्याला प्राधान्य दिले होते. गुजरात मॉडेल हे त्यासाठी फोकस करण्यात आले होते. गुजरातमध्ये फार मोठा विकास केल्याची जाहीरातबाजी त्यावेळी मोदींनी करुन एक विकासाचा आभास तयार केला होता. जनतेला विकासाची नेहमीच आस लागलेली असल्याने त्यांनी मोदींचा हा मुद्दा उचलून धरला व त्यांना सत्तास्थानी बसविले. परंतु आता पाच वर्षानंतर पहिल्यास विकास कुठेच झाला नाही, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. आता जनतेला मागच्या पाच वर्षाचा हिशेब द्यावा लागणार हे ओळखताच यावेळच्या मोदींच्या निवडणूक प्रचारात विकासाचा मुद्दा कुठेच मांडला जात नाही. कारण विकासाचा हिशेब जनतेने मागितल्यास देणार तरी काय असा सवाल आहे. कारण गेल्या पाच वर्षात विकास कोणता झाला याचे उत्तर देण्यासारखे काहीच काम झालेले नाही. त्यामुळे आता मोदींनी आपल्या विकासाच्या चेहर्यावरील मुखवटा सारुन हिंदुत्वाचा मुखवटा धारण केला आहे. खरे तर गेल्या तीन वर्षात सरकारने झपाट्याने हिंदुत्ववादी प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली. आता निवडणुकातही त्यांचा भर हा हिंदुत्ववादावरच राहिला आहे. धर्माच्या नावावर लोकांना भावनेच्या आहारी नेणे सोपे जाते व त्याव्दारे जनतेच्या मूलभूत प्रश्नांना विसरण्यासही मदत होते. यावेळी मात्र जनता त्यांच्या या डावांना भूलणार नाही. कॉँग्रेसने किमान उत्पन्न योजना जाहीर केल्याने शेतकर्यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये टाकण्याची भाजपची योजना अगदीच कालबाह्य वाटू लागली. फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्री अरुण जेटलींनी शेतकरी व मध्यमवर्ग केंद्रित धरून जो अर्थसंकल्प सादर केला तेव्हा भाजपला हा अर्थसंकल्प तारून नेईल, असेही अनेकांनी भविष्य वर्तविले होते. प्रत्यक्षात केवळ दोन महिन्यांनी परिस्थिती बदलली व जनतेच्या लक्षात यासंबंधीचा फोलपणे लक्षात आला. आता विकासाच्या मुद्याला रामराम करीत हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालण्यात आला आहे. निर्णायक क्षणी आधार देणारे राष्ट्रवाद व हिंदुत्व हे हुकमाचे पत्ते त्यांनी बाहेर काढले. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारातील भाषणे हेच दाखवितात. या तिघांनीही हिंदुत्वाच्या बाबतीत केलेली विधाने केवळ बेताल नव्हे, तर विखारी व चिथावणीखोर आहेत. अशी विधाने जाणीवपूर्वक करून ध्रुवीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेची आपल्याला पर्वा नसल्याचे त्यांचे वर्तन आहे. काँग्रेस देशद्रोही, हिंदूद्रोही आहे व त्यांची पाकिस्तानशी सलगी आहे, असे सतत बोलणे हा मोदींचा आवडता खेळ आहे. या खेळात ते कोणत्याही मर्यादा ओलांडतात. वर्ध्यातल्या भाषणात त्यांनी, पाच हजार वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या या देशात एकाही हिंदूने दहशतवादी कृत्य केले नाही आणि काँग्रेसने जगभरात हिंदूंचा अपमान केला, असे ठोकून दिले. अमित शहा यांनी तर, आपला हिंदू धर्म इतका सहिष्णु आहे की तो मुंग्यांनाही पीठ खाण्यास देतो, असे विधान केले. योगी आदित्यनाथ यांनी, भारताचे लष्कर ही मोदी सेना आहे, असे विधान करून मोदींच्या दावणीला जणू भारताचे लष्कर आहे, असे चित्र उभे केले. धर्म, लष्कर, राष्ट्रवादावरून अशी विधाने जाणीवपूर्वक करुन मूळ जनतेच्या प्रशनंना बगल दम्याची बाजपाची जुनी रित आहे. गेल्या पाच वर्षांत देशात जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या तेथे भाजपची थेट लढत काँग्रेसशी होती. तेथे मोदी-शहा-आदित्यनाथ यांनी हिंदू धर्म खतरे मेंं है, इतिहासात झालेले मुस्लिमांचे आक्रमण, पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राइक, हिंदू राष्ट्रवाद अशी जनतेला फितविणारे प्रश्न उपस्थित केले होते. यातूनच देशापुढे नोटबंदीमुळे देशोधडीला लागलेले उद्योगधंदे, चार दशकांत कधी नव्हे ती निर्माण झालेली भयावह बेरोजगारी व दुष्काळामुळे शेतकर्यांची झालेली दयनीय अवस्था तसेच शेतकर्यांच्या आत्महत्या या प्रश्नांकडे त्यांनी सफाईने दुर्लक्ष केले. आता त्यांच्याकडे हंदुत्वाचेच ट्रम्प कार्ड आहे व त्यासाठीच ते 2019च्या निवडणुकीत हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या अजेंड्यावर भर देत आहेत. मात्र त्यात ते यशस्वी होणार नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर देशभर जो राष्ट्रवाद उफाळला होता तो आता ओसरला आहे. काठावर बसणारे मतदारही भाजपच्या कथित देशप्रेमाला वैतागलेले आहेत. कॉँग्रेसने देशाचा चौकीदार दक्ष असताना पुलवामा हल्ला झालाच कसा? असा प्रतिप्रश्न विचारून भाजपाची बोलती बंद केली आहे. त्याची उत्तरे मोदी-शहा यांच्याकडे अजिबात नाहीत. कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, या देशात प्रत्येक जण हिंदू आहे पण त्याला रोजगाराची गरज आहे असे उत्तर दिले. राहुल गांधीचे हिंदू व रोजगार अशी सांगड घालणे ही मोदींच्या हिंदुत्वाला आव्हान देणारी आहे. 2019ला दुरावलेला मतदार परत मिळवण्यासाठी काँग्रेसला अशा प्रकारे एक सूर सापडला आहे. भाजपाचे हिंदुत्वाचे कार्ड यावेळी यशस्वी होणार नाही हे नक्की.
-------------------------------------------------------------

0 Response to "विकासाचा मुद्दा गायब"
टिप्पणी पोस्ट करा