-->
गर्दी गेली कुठे?

गर्दी गेली कुठे?

शुक्रवार दि. 05 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
गर्दी गेली कुठे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला अपेक्षेइतकी गर्दी जमत नसल्याची जोरदार चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. सध्या ही चर्चा दबक्या आवाजात आहे, परंतु ही लवकरच उघड होणार, भाजपाने कोंबडे कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही फायदा होईल असे दिसत नाही. मेरठ येथून प्रचाराला प्रारंभ करताना मोदींना अपेक्षित असणारी गर्दी जमू शकली नाही. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकांत भाजपाने येथून आपल्या विक्रमी सभांचा सिलसिला सुरु केला होता. परंतु आता मोदींच्या सभेला गर्दी होत नाही हे वास्तव आहे. येत्या 44 दिवसांमध्ये मोदी 100 सभा घेणार आहेत. इतर ठिकाणी त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून लोक बाजूने किंवा विरोधात व्यक्त व्हायला लागतील. तसे पाहता अजून तरी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची राळ उडायला सुरुवात झालेली नाही. महाराष्ट्रातील वर्ध्यातून गेल्या वेळी मोदींनी आपल्य प्रचाराची सुरुवात केली होती आणि त्यात त्यांना भरभरुन यश लाभले होते. त्यामुळे यंदाही त्यांनी तेथूनच प्रचाराला सुरूवात करण्यात आली. वर्ध्यातील 18 एकराच्या स्वावलंबी मैदानापैकी निम्म्याहून अधिक मैदान रिकामे पडलेले दिसले. मोदींची सभा सुरू असतानाच लोक निघून जातानाही दिसत होते. धुळे येथील सभेचा प्रतिसादही फारसा उत्साहवर्धक दिसत नव्हता. उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे मोदींसारख्या फर्ड्या वक्त्याच्या सभेत असे घडावे हे अनेकांना आश्‍चर्य वाटण्यासारखेच होते. गेल्या वेळी 2014 सालीही अशाच रखरखत्या उन्हात सभा झाल्या होत्या. वर्ध्याला असे वातावरण नवे नाही. पण, तरीही गतवेळच्या तुलनेत गर्दी फारच कमी असल्याने ही सभा फ्लॉपच म्हणावी लागेल. हे जर असेच चालू राहिले तर 27 एकराच्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार्‍यासभेचे काय होईल अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही याचा अर्थ मोदींनी गेल्या वर्षी दिलेली आश्‍वासने न पाळल्यामुळे लोकांमध्ये निराशा असल्याचे गृहीत धरायचे का, असाही सवाल आहे. जर उन्हाळ्याचा विचार करता गर्दी होत नाही असे म्हटले तर गर्दीची ही चिंता जशी शिवसेना, भाजपला असेल तशीच ती काँग्रेस आघाडीला, वंचित आघाडीला आणि अन्य घटकांनाही असणार आहे. काँग्रेसच्या किती सभात होतात, त्यांचे कोणते राष्ट्रीय नेते येतात? प्रियांका गांधींच्या राज्यात किती सभा होणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. अनेकदा असेही होते की गर्दी जमा होऊनही संबंधित पक्षाचे उमेदवार पडतात, तर अनेकदा गर्दी न जमताही अनेकदा पक्षांना आपले उमेदवार विजयी करण्यात यश लाभते. मात्र मोदींच्या सभेला लोक येत नाही, म्हणजे त्यांच्याविषयी लोकांचा भ्रमनिरास झाला हे सत्य आहे. मोदी आता मतांचे मशिन राहिलेले नाही, असे समजायचे का? अर्तात याची उत्तरे निकालानंतर लागतील. या जनतेच्या मनात काय आहे, ते निश्‍चितपणे सांगता येत नाही. मात्र शेवटच्या टप्प्यात जनतेचा कौल कोणत्या दिशेला आहे, तो अंदाज काही प्रमाणात बांधता येतो. यावेळी सत्तादारी भाजपा भरलाच जोरात आहे, पैशाच्या राशी ओतल्या जात आहेत. असे असूनसुद्दा भाजपा नेत्यांना गर्दी जमविता येत नाही, याचे उत्तर शोधावे लागेल. मोदींनी चौकीदारांचे जे कॅम्पेन सुरु केले आहे, त्याला फारसा प्रतिसाद आम जनतेतून मिळालेला नाही हे देखील सत्य आहे. सध्या भाजपाक़डे फक्त मोदी एके मोदीच आहेत. जनतेला गेल्या पाच वर्षातील हिशेब पाहिजे आहे, तो देण्याकडे सत्ताधार्‍यांचा कल नाही. मोदींनी जाहीर केलेल्या अनेक घोषणांच्या अपयशी ठरल्या आहेत. शेतमालाच्या दरवाीढीचे केवळ आश्‍वासन आणि बेरोजगारीच्या गंभीर समस्या, अशा अनेक समस्यांचे उत्तर या सरकारडे नाही. गेल्या निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन निघालेले मोदी उत्तर प्रदेशला पोहोचेपर्यंत पुन्हा मंदिर, मशिद, स्मशान आणि दफनभूमीवर येऊन अडकले. जेव्हा त्यांनी देशभक्तीचा सूर लावला तेव्हा लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. पण, आताच्या सभांमध्ये अंतराळातील कामगिरी आणि तशाच पद्धतीच्या मुद्यांनाही थंड प्रतिसाद आहे. वर्ध्यातील सभेत विदर्भ विकासासाठी आणि महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. पण, शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत मौन पाळले. मोदींनी यापूर्वी बारामतीच्या विकासाचे गोडवे गायिले, पवारांनीच बोटाला धरून शिकवले असे म्हटल्याचे अजून लोक विसरले नाहीत. मात्र त्याच पवारांवर निवडणुकीच्या आखाड्यात टीका केली. लोकांना हे पटणारे आहे का? सध्याच्या घटत्या गर्दी मागे फक्त उन्हाचे चटकेच आहेत की सातत्याने बदललेल्या भूमिकेबद्दलची नापसंती आहे याचाही विचार मोदींनी करणेे आवश्यक आहे. मोदींच्या सभेला कमी मिळणार्‍या प्रतिसादाचे नेमके कारण सध्यातरी गुलदलत्यात असून जरा प्रचाराला वेग येईल तसे त्याचे कारण स्पष्ट होईल. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, मोदींच्या बाबत नाराजी आहे, अर्थात ही नाराजी मतपेटीतून दिसेल का हाच सवाल आहे.
---------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "गर्दी गेली कुठे?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel