शहा यांची हेडमास्तरी
मंगळवार दि. 20 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख
-----------------------------------------------
शहा यांची हेडमास्तरी
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी तीन दिवस झंझावती मुंबई दौरा केला. या दौर्यात त्यांनी अनेक भेटीगाठी घेतल्या, पक्षनेत्यापुढे हेडमास्तरी केली. सध्या सत्ता आहे म्हटल्यावर सर्वजणांनी गुपचूप एैकून घेतले. परंतु ही हेडमास्तरी त्यांची फार दिवस टिकणारी नाही. आपला सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेलाही दोन गोष्टी सुनावल्या अशी बाब आता उघड झाली आहे. मातोश्रीला कितीही बंदोबस्तात ठेवले असेल तरी प्रत्येक भिंतीला कान हे असतातच. शिवसेनेला चार गोष्टी सुनावल्या असल्याचा हा कान भाजपाचाच आहे, हे काही लपणारे नाही. शिवसेनेचे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत काही एकमत झालेले नाही. त्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा शिवसेनेला पटविण्यात काही उपयोगी पडलेला नाही, हे स्पष्टच आहे. त्याचबरोबर फडणवीस यांच्यामागे केंद्रीय नेतृत्व ठामपणे अजूनतरी उभे आहे, हे अमित शहा यांच्या वक्तव्यातून जाहीर झाले आहे. फडणवीसांसाठी ही बाब समाधानकारक असली तरीही त्यांच्या पक्षातील विरोधकांच्या हाती सध्या बोटे मोडण्याच्या पलिकडे आता काहीच हातात राहिलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त तर केलेच, शिवाय त्यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही सांगून टाकले. भाजपा श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यावरून स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलन नीट हाताळले नाही, तुरीच्या मुद्यावर सरकारची पंचाईत झाली असे फीलर्स दिल्लीत गेले काही दिवस पाठविले जात होते. गेल्या काही महिन्यांतील अशांत वातावरणासाठी फडणवीस यांना लक्ष्य करावे आणि त्यानिमित्ताने श्रेष्ठींच्या दरबारी त्यांना किमान नजर तरी लागावी, असा पक्षातील विरोधकांचा उद्देश होता. शहा यांनी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे मुंबई भेटीत बिनदिक्कतपणे सांगत सर्वच शक्यतांवर पडदा पडला. मध्यावधी होणार नाही, फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे अमित शहांनी सांगून टाकले. भाजपाशिवाय मध्यावधी निवडणूक आज कोणत्याही पक्षाला आर्थिकदृष्ट्या सोसणार नाही. एकदाची मध्यावधी निवडणूक घेऊनच टाकावी आणि पूर्ण बहुमत मिळवून शिवसेनेची साथ सोडावी, असे भाजपातील काही नेत्यांच्या मनात आहे. भाजपाने सर्वच मतदारसंघांमध्ये ताकद वाढविण्याची भूमिका घेतलेली आहे. याचा अर्थ शिवसेनेशी युती करण्याचा भाजपाचा मूड नाही. 122 जागा जिंकलेल्या भाजपाला जागावाटपात शिवसेनेपेक्षा कमी वाटा कदापिही मान्य होणार नाही. शिवसेना लहान भाऊ होणे मान्य करणार नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीची शक्यता नाही. म्हणजे हे दोघे एकमेकांविरुद्ध लढतील आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील. त्याचा मोठा फटका भाजपाला बसेल. त्यामुळे आज भाजपादेखील मध्यावधीच्या मूडमध्ये नाही. निवडणूक कोणालाच नको आहे. शहा यांच्या दौर्याने अनेक बाबी आता स्पष्ट झाल्या आहेत.
---------------------------------------

0 Response to "शहा यांची हेडमास्तरी"
टिप्पणी पोस्ट करा