रविवार दि. ०१ फेब्रुवारी २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
अमेरिका-पाकिस्तान संबंधांचे त्रांगडे
शीतयुध्द संपल्यापासून गेल्या तीन दशकात जागतिक राजकारणाची सूत्रे झपाट्याने बदलली आहेत. प्रामुख्याने गेल्या दशकात अमेरिकेने आपले जागतिक पातळीवरील प्रभूत्व आणखी घट्ट केले. एकेकाळी तिसर्या जगाचे प्रतिनिधीत्व करणारी अलिप्त राष्ट्र चळवळ आता संपल्यात जमा आहे. अमेरिकाला खर्या अर्थाने आव्हान हे चीननेच आहे. मात्र असे असले तरीही अजूनही चीनला महासत्तेचा दर्जा नाही. जपान एकीकडे अधोगतीकडे चालला आहे. रशिया आपल्या आर्थिक संकटातून काही बाहेर पडत नाही. युरोपाचीही मंदीची लाट एवढ्यात काही ओसरणार नाही. चीन कितीही झपाट्याने पुढे येत असला तरीही त्यांची अर्थव्यवस्था ही अमेरिकेशी निगडीतच आहे. अशा स्थितीत अमेरिकेत गेल्या पाच वर्षात मंदीची स्थिती असली तरीही अमेरिका जगातिक बाजारपेठेत आपले वर्चस्व राखूनच आहे. अशा वेळी भारतासारख्या एकेकाळच्या अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व करणार्या व सोव्हिएत युनियनच्या जवळ असलेल्या देशाला जागतिक राजकारणात कुणीच वाली नाही असे चित्र होते. त्यासाठी भारताला अमेरिकेशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता होती. त्याचबरोबर अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्या व बड्या भांडवलदारांना भारताची मोठी बाजारपेठ खुणवत असल्याने त्यांना भारताशी संबंध सुधारण्यात विशेष रस होता. या सर्व पार्श्वभूमीवर बराक ओबामा हे प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि उभय देशात फिल गुडचे वातावरण नव्याने सुरु झाले. मात्र यामुळे सर्वात जास्त दुख झाले ते पाकिस्तान व चीनला.
शीतयुद्धापासून अमेरिका आणि पाकिस्तान हे मित्रदेश आहेत. दहशतवादाच्या आधारे पाकिस्तानने जगभर हैदोस घालायला सुरूवात केली तरी अमेरिकेने पाकिस्तानला पाठीशी घालायचे सोडले नाही. अगदी ९/११च्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानबाबत अमेरिकेची भूमिका सौम्यच राहिली. अङ्गगाणिस्तानमधील तालिबान आणि ओसामा बिन लादेनच्या अल कायदाला असलेला पाकिस्तानचा पाठींबा जगजाहीर असतानाही अमेरिकेने दहशतवादा विरोधातील लढाईत पाकिस्तानवर विश्वास ठेवला. त्यामुळे अनेक वेळा अमेरिकेवर तोंडघशी पडण्याची वेळ आली तरी अमेरिकेने पाकिस्तानची पाठराखण करणे काही थांबवले नाही. अमेरिकेतील विचारवंत आणि वरीष्ठ अधिकारीही काही वेळा अमेरिकेच्या पाकिस्तानधार्जिण्या धोरणावर टीका करत असतात. दहशतवादाचा जोर वाढल्यावर पाकिस्तानला अमेरिकेने ताळ्यावर आणावे अशी अपेक्षा अमेरिकेतील विचारवंतांनी अनेक वेळा व्यक्त केली. पण अमेरिकेच्या धोरणात बदल झाला नाही. दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानने अमेरिकेला मदत करायचे आश्वासन दिले तरी तो नेहमीच दुहेरी डावपेच खेळत आला. एकीकडे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेकडून आर्थिक मदत उकळत राहिला आणि त्याच पैशांवर आपल्या देशातील दहशतवादी संघटनांना पोसत राहिला. अशा प्रकारची दुहेरी निती अमेरिकेने जगाच्या अनेक कोपर्यात वापरली आहे. दक्षिण आशियातील राजकारणात पाकिस्तानचा सर्वाधिक उपयोग होईल असे अमेरिकेला सतत वाटत राहिले. शीतयुद्धाच्या काळात अङ्गगाणिस्तानमध्ये घुसलेल्या सोविएत युनियनला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत आवश्यकच होती. त्या काळात भारतही सोविएत युनियनच्या बाजूने झुकला होता. पण शीतयुद्ध संपल्यानंतरही अमेरिकेच्या धोरणात बदल झाला नाही. कधी पाकिस्तानला दटावून तर कधी चुचकारून अमेरिकेचे पाकिस्तानला पाठीशी घालणे सुरूच होतेे. अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत. अलिकडच्या काळात या दोन देशांतील संबंध पूर्वीसारखे सौहार्दाचे किंवा अमेरिका बोले, पाकिस्तान हले या स्वरूपाचे राहिलेले नाहीत. पाकिस्तानबरोबर अमेरिकेचे संबंध बरेच बिघडले होते. अमेरिकेने भारताशी जवळीक वाढवावी असे मत आता अमेरिकेत चांगलेच मूळ धरू लागले आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत हा भारताच्या चिंतेचा विषय आहे. आताही ओबामा यांच्याशी चर्चेच्या वेळी हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानात गेल्यएा६५ वर्षात कधीच लोकशाही रुजली नाही. गेल्या वेळी सलग पाच वर्षे सत्तेत एकच सरकार राहिले. पाकिस्ताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. एक नेहमीच चिंतेचा विषय भारतासाठी आहे तो म्हणजे, पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता. अण्वस्त्र क्षमता असलेला पाकिस्तान जगातील एकमेव मुस्लिम देश आहे. उद्या अमेरिकेने पाकिस्तानची साथ सोडली आणि पाकिस्तान कुणा इस्लामी कट्टरतावाद्याच्या ताब्यात गेला, त्याने देशात इस्लामी राजवट प्रस्थापित केली आणि अमेरिकेसमोर झुकण्याचे नाकारले तर दक्षिण आशियातच नाही तर हा देश जगभरात हैदोस घालू शकतो. त्यातच अण्वस्त्रक्षमता असल्याने असा कट्टरतावादी हुकूमशहा कसलाही विचार न करता त्या क्षमतेचा विघातक वापर करू शकतो, ही भीती अमेरिकेला आहे. सध्या दहशतवादी अमेरिकेच्या विरोधात असले तरी अमेरिकेच्या मदतीवर पाकिस्तान अवलंबून असल्याने दहशतवादीही अमेरिकेच्या दृष्टीने बेकाबू झालेले नाहीत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानला अमेरिकेने एकटे सोडले तर भारत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवू शकेल अशी भीतीही अमेरिकेला आहे. म्हणूनच भारताबरोबर व्यापारी आणि अन्य राजनैतिक संबंध सुधारण्यावर भर असला तरी अमेरिका पाकिस्तानची साथ सोडायलाही तयार नाही. ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्येे सापडल्यामुळे या दोन देशांचे संबंध आणखी ताणले होते. अमेरिका पाकिस्तानवर बेजबाबदारपणाचा आरोप करत होता तर अमेरिका आपल्या सार्वभौमत्वाचा आदर करत नाही अशी तक्रार पाकिस्तान करत होता. अशा परिस्थितीतही या दोन्ही देशांमधील संबंध टिकून राहिले. आजही हे संबंध टिकले आहेत कारण अमेरिकेला दक्षिण आशियात सत्तेचे संतुलन राखायचे आहे. चीनला काबूत आणण्यासाठी भारताचा वापर करायचा आणि भारताला नियंत्रणात ठेवण्यासाठी पाकिस्तानला जवळ करायचे असा अमेरिकेचा डाव आहे. अमेरिकेला अङ्गगाणिस्तानमध्ये भारत हवा आहे आणि पाकिस्तानचे लष्करही हवे आहे. एकूणच दक्षिण आशियातील या दोन महत्वाच्या देशांशी संबंध ठेवताना अमेरिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शीतयुद्धकाळात अमेरिकेचे प्रशासन भारतविरोधी होते. आज भारताचे आर्थिकदृष्ट्या आणि राजनैतिकदृष्ट्या वाढत चाललेले महत्व अमेरिकेला डोळ्याआड करता येणे शक्य नाही. शिवाय अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचे असलेले योगदानही दुर्लक्षित करता येण्याजोगे नाही. दहशतवादाविरोधातील संघर्षातही पाकिस्तानपेक्षा भारताची मदत अधिक होऊ शकते याचीही जाणीव अमेरिकेला आहे. अङ्गगाणिस्तानात सोविएत युनियनने प्रवेश केल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खर्या अर्थाने आकाराला आले. पण पाकिस्तानबद्दल अमेरिकेतील जनतेला ङ्गारसे प्रेम कधी वाटले नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर महंमद अली जिना यांनी मिर्झा अबोल हसन इसपाहानी यांना पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत म्हणून पाठवले होते. जिनांना अमेरिकेबद्दल ङ्गारशी माहिती नव्हती. शीतयुद्ध संपुष्टात येईपर्यंत हे संबंध तसेच होते. त्यानंतर दहशतवादाचा उदय झाला. पाकिस्तानचे दहशतवादाबाबतचे धोरण आणि भूमिका जगजाहीर आहे. अमेरिकेने दहशतवादाविरोधातील लढाईत पाकिस्तानला बरोबर घेतले पण त्याचा ङ्गारसा उपयोग झाला नाही. पाकिस्तानच्या लष्कराचा दहशतवादाला असलेला पाठिंबा आणि नागरी सरकारची हतबलता यात जशी पाकिस्तानची जनता पिसली जात आहे तशी अमेरिकेचीही पंचाईत झाली आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही टिकावी यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पण त्याला अद्याप यश आलेले नाही. पाकिस्तानला आज ना उद्या दहशतवाद सोडून आर्थिक विकासाची कास धरावी लागणार आहे. त्या दृष्टीने देशाची व्यवस्था टिकवण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर आहे आणि पाकिस्तानला टिकवण्याचे आव्हान अमेरिकेच्या बोकांडी आहे. कारण पाकिस्तान नेस्तनाबूत झाला तर वरचढ झालेला भारत अमेरिकेला सहन होणार नाही. अशा सगळ्या त्रांगड्यात अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध सापडलेले आहेत. त्यांचे भविष्य बर्याच अंशी पाकिस्तानच्या शहाणपणावर अवलंबून आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून फौजा मागे घेण्याची आता घोषणा केली आहे. जर खरोखरीच या फौजा मागे घेण्यास प्रारंभ झाला तर पाकिस्तानला जसा तालिबान्यांकडून धोका आहे तसाच भारतासही धोका आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात अमेरिकेच्या फौजा राहाणे हे सध्याच्या स्थितीत भारताच्या हिताचे आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला चुचकारण्याचे धोरण चीनने अवलंबिल्यामुळे आपल्याला दोन्ही सीमांवर धोके आहेत. अमेरिकेच्या सोबत जाण्यात भारताला जसे फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. अमेरिका- पाकिस्तान संबंध ताणले गेले असताना आपण अमेरिकेशी दोस्ती केली आहे. मात्र त्याचबरोबर या दोस्तीपोटी आपले चीनशी संबंध बिघडणार आहेत. एकूणच आशिया खंडातील अस्वस्थता वाढणार आहे, हे खरे.
----------------------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा