-->
संपादकीय पान शनिवार दि. १४ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
वर्ल्डकपचा धमाका आजपासून
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगातील क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची वाट डोळ्यात प्राण आणून बघत होते, तो क्षण अखेर उजाडला. तब्बल २३ वर्षांच्या कालावधीनंतर वर्ल्डकपचे यजमानपद ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या दोन देशांना मिळाले असून, वर्ल्डकपचा जबरदस्त धमाका आजपासून ४४ दिवस सुरु राहणार आहे. फूटबॉल-हॉकी या खेळांचे वर्ल्डकप जगभरात लोकप्रिय होतात. पण, त्यावर मात करुन क्रिकेटने आपले नाव संपूर्ण जगातील क्रीडाप्रेमींच्या मनावर कोरले आहे. क्रिकेट हा खेळ श्रीमंतांचा आहे, अशी भावना तमाम जनतेच्या मनात होती; पण याच खेळाची बीजे जगाच्या कानाकोपर्‍यात खोलपर्यंत रुजली गेली आहेत. २०१९च्या वर्ल्डकपमध्ये अमेरिका, चीनसारखे देश सहभागी झाले, तर त्यामध्ये आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. १९७५ साली इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या वर्ल्डकपची मुहूर्तमेढ रचली गेली. त्यावेळी अवघे आठ ते दहा संघ होते, तरीदेखील या वर्ल्डकपला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर क्रिकेटच्या लोकप्रियतेत प्रचंड प्रमाणावर वाढ झाली. बघता-बघता वर्ल्डकपमध्ये १४ टीमचा सहभाग झाला आणि फुटबॉलप्रमाणेच क्रिकेट या खेळाचा ज्वर संपूर्ण देशात पसरु लागला. क्रिकेटचा वर्ल्डकप म्हटला म्हणजे, एक वेगळेच चैतन्य क्र्रिकेटप्रेमी रसिकांच्या अंगात संचारते. गुरुवारी अत्यंत दिमाखदार आणि नयनरम्य सोहळ्यात ११ व्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचा पडदा उघडला. न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये शाही सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. तब्बल २३ वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही देशात वर्ल्डकपचे आयोजन होत असल्यामुळे येथील क्रिकेट रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून येत होते. क्रिकेटचा वर्ल्डकप म्हणजे, प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. वर्ल्डकपचा माहोल सुरु झाला की, मागील वर्ल्डकपचा आलेख प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या डोळ्यासमोर येतो. वर्ल्डकपमधले थरार, नाट्यमय घटना, शतकी भागीदारी, विक्रमी धावसंख्या, शतकांच्या राशी, भन्नाट गोलंदाजी आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली लढत या सार्‍या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. वर्ल्डकपचा रोमांच सर्वत्र पसरलेला असून, सलग ४४ दिवस त्याचा आनंद जगातील क्रीडारसिकांना मनमुरादपणे लुटावयाचा आहे. वर्ल्डकप कोण जिंकेल? यावर कोटी-कोटी रुपयांचे बेटिंग लावण्यात आले आहे. या वर्ल्डकपमध्ये सलामीलाच भारताची गाठ आपले कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमवेत होणार असल्यामुळे या लढतीकडे सार्‍या जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच दुधात साखर म्हणजे, ही लढत रविवारी होणार असल्यामुळे ङ्गसुपरसंडेफचा आनंद सर्वांनाच लुटता येईल. मागील दहा वर्ल्डकपचा इतिहास चाळला तर, त्यामध्ये एक गोष्ट नजरेत भरण्यासारखी आहे की, ती म्हणजे, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला एकदा, दोनदा नाहीतर, पाच वेळा पराभूत केले आहे. अशी कामगिरी निदान वर्ल्डकपमध्ये तरी कुठल्याही टीमला करता आलेली नाही. पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये विंडीजच्या नावावरसुद्धा एका विक्रमाची नोंद आहे. ७५ आणि ७९च्या वर्ल्डकपमध्ये विंडीजच्या नावावर एकही पराभवाची नोंद झाली नव्हती. मात्र, ८३ साली भारतानेच विंडीजचा साखळी स्पर्धेत पराभव करुन सर्वांनाच धक्का दिला होता. अशाच काही धक्कादायक घटना आपल्या या वर्ल्डकपमध्ये बघायला मिळतील, असा अंदाज आहे. या वर्ल्डकपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमानुसार प्रथमच दोन नव्या चेंडूंचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे चेंडूची शाईन जास्त काळ टिकेल. तसेच ३४ षटकांनंतरसुद्धा चेंडू बदलण्यात येतील. त्यावेळी प्रत्येक सामन्यातील लढत रंगतदार होईल, यात शंकाच नाही. वर्ल्डकप ही क्रिकेटप्रेमींसाठी एक जत्राच असते. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून ङ्गयाची देही याची डोळाफ सामना बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. खास करुन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील काही स्टेडियमच्या बाजूला मोकळी जागा असल्याने सामना बघताना पिकनिकचा माहोल येतो. मॅच आणि पिकनिक दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतात. मात्र, तसा आनंद आपल्याला भारतात लुटावयास मिळत नाही. पाश्‍चात्य देशातील क्रीडाप्रेमी फुटबॉल असो किंवा क्रिकेट असो. त्याचा आनंद बियरच्या छोटा समवेतच लुटत असतो. मात्र, तसं भाग्य आपल्या नशिबात नाही, हीच मनाला जास्त खंत वाटते. वर्ल्डकप म्हटला म्हणजे, विश्‍वविक्रम असे गणितच आहे. त्यामुळे सार्‍यांच्या नजरा त्याकडे लागल्या असणार, यात शंकाच नाही. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील वातावरण क्रिकेटमय झाले आहे; पण तशी हवा सध्या तरी आपल्याकडे पसरली नाही. कारण, ङ्गवर्ल्डकपफ आणि ङ्गप्रेमाचा दिवसफ एकाच दिवशी येत असल्यामुळे निदान पहिल्या दिवशी तरी वर्ल्डकप फिव्हर जाणवणार नाही. पण, १५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात क्रिकेटचा फिव्हर असेल. वर्ल्डकपच्या पहिल्याच पेपरात भारत पास होईल का? याकडेच करोडो क्रीडाप्रेमींचे डोळे लागून राहिले असतील. पण, एकाच गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे, १० आणि १२ वीच्या महत्त्वाच्या परीक्षासुद्धा याच काळात सुरु होणार असल्याने प्रत्येक घरात ङ्गमॅचफविरुद्ध ङ्गपरीक्षाफ असे युद्ध सुरु असेल, यात शंकाच नाही. तरीसुद्धा येत्या ४४ दिवसांत वर्ल्डकपचा आनंद लुटणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. मग बघता काय, व्हा सामील वर्ल्डकप धमाक्यात २९ मार्चपर्यंत!

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel