-->
सतर्कता आवश्यक

सतर्कता आवश्यक

शनिवार दि. 23 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सतर्कता आवश्यक
कर्जतहून आपट्याकडे निघालेल्या एसटी बसमध्ये आढळलेली संशयित वस्तू बॉम्बच निप्पन्न झाल्याने आता राज्यात व तसेच मुंबई आणि परिसारातील जिल्ह्यात प्रामुख्याने सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. बॉम्बच्या या वृत्तामुळे कर्जत परिसरात खळबळ उडाली होती. बुधवारी रात्री अकराच्या सुमाराला कर्जत-आपटा एसटी बसमध्ये संशयित वस्तू आढल्याने अलिबागहून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. तयनंतर ही संशयित वस्तू बॉम्बच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला. यात चालकाने दाखविलेला सतर्कता वाखाण्याजोगाच आहे. कर्जत-आपटा एसटी बसमध्ये बस चालकास एका जागेवर बॅग ठेवलेली असल्याचे आढळले. बॅगेचा मालक कुणीही नसल्याचे लक्षात येताच चालकाचा संशय बळावला. चालकाने वेळ न दवडता ही बाब आपल्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने हालचालींना वेग आला. तपासणीत या बॅगेत स्फोटक पदार्थ असल्याचे पथकाला आढळले. बॅगेत सापडलेल्या या वस्तूमध्ये तीन किलो युरिया आणि आय.ई.डी. हे स्फोटजन्य पदार्थ होते. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड व मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी बस आगारांमध्ये कसून तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर
मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. पुलवाला घटनेनंतर सध्या देशात तणाव निर्माण झाला आहे. लोकांनी घाबरण्याचे कारण नसले तरीही सतर्कता ही बाळगली पाहिजे. या देशातील सुरक्षितता ही सर्वोच्च असली पाहिजे व प्रत्येकाला सुरक्षित वाटावे इथपत सुरक्षा पुरविली गेली पहिजे. मुंबईसारख्या महानगरात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविणे अशक्य असले तरीही जनतेनेही जागरुर राहिले पाहिजे. मुंबईतील रेल्वे स्थानके हे अतिरेक्यांची प्रामुख्याने लक्ष्य असतात. मुंबईतील आवाढव्य लोकसंख्या पाहता त्याचा फायदा अतिरेकी अनेकदा उठवित आले आहेत. त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा, संशायस्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत. विशेषत: दिल्लीकडून येणार्‍या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्‍वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत. यात अनेकदा देशातील नागरिक कंटाळतात परंतु प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी तपासणी ही आवश्यकच ठरते. आगामी काळात निवडणुका येऊ घातल्याने अतिरेकी संघटना बॉम्बस्फोट करण्यासाठी सक्रिय होऊ शकतात. कारण देशातील सुरक्षा व्यवस्था निवडणुकीच्या कामात गुंतलेली असते. त्यामुळे त्यांच्यावर असलेल्या वाढीव कामाच्या बोजाचा फायदा उठवित काही घटना घडू शकतात. त्यामुळेच येत्या तीन महिन्यात मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गर्दीच्या स्थानकांत गर्दी विभाजनासाठी सुरक्षा यंत्रणांची मदत घेण्याचा आदेशही रेल्वे सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत. आपटा येथील एस.टी. मध्ये सापडलेल्या बॉम्बमुळे आपल्याला सावधानतेचा इशारा मिळाला आहे. यातून धडा घेऊन पुढे जावे लागणार आहे. मुंबईने आजवर अनेक बॉम्बस्फोट झेलले आहेत. आता अशा प्रकारच्या दुर्घटना मुंबईला नको आहेत कारण अशा घटनांमुळे देशातील प्रगतीला अटकाव होतो. मुंबई व तिचा परिसर हा बहुभाषिक लोकांचा अड्डा आहे. येते लोकांना आपले काम भले व आपण भले असे नेहमीच वाटत आले आहेत. मुंबईत कोणत्याही धर्मीयांना शांतता ही प्रिय वाटत आली आहे. कारण कितीही अप्रिय घटना घडल्या तरी काही वेळात ही महानगरी आपल्याला लगेचच सावरते व आपले कामकार बंद पडू देत नाही. मुंबईत 92 साली झालेल्या भयानक बॉम्बस्फोट असोत किंवा कसाब व त्यांच्या नऊ साथिदारांचा शसस्त्र हल्ला असो मुंबईने आपल्याला नेहमीच झपाट्याने सावरले आहे. अशा प्रकारचे हल्ले पचविले आहेत. आता असे प्रसंग पुन्हा येऊ नयेत यासाठी सतर्क राहाण्याची गरज आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी रेल्वे पोलिस महासंचालक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालक यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबई रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या दोन्ही हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर या सूचना देण्यात आल्या होत्या. पंरतु केवळ पोलिसांवर सोपवून आपण निर्धास्त राहू शकत नाही. त्याासाठी प्रवाशांनीही सतर्क राहाताना विविध कामी पोलिसांना मदत करण्याची आवश्यकता आहे. बेवारस वस्तू अथवा संशयित बॅग दिसल्यास त्याची माहिती तातडीने आरपीएफ अथवा जीआरपी कर्मचार्‍यांना देण्याची गरज आहे. प्रवाशांनी अफवा पसरवू नयेत तसेच पोलिसांच्या तपासणीला सहकार्य करणे आवश्यक आहे. आपटा गावातील एसटी बसमध्ये आईडी बॉम्ब सापडणे ही आपल्या सर्वांसाठीच धोक्याची घंटा समजून पुढील काळात सतर्कतेने काम करावे लागेल.
------------------------------------------------------

0 Response to "सतर्कता आवश्यक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel