-->
संपादकीय पान शनिवार दि. २१ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
स्वाईन फ्लूचा विळखा
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांमध्ये स्वाइन फ्लूने पाय पसरले आहेत. यावर्षी पहिल्या ५० दिवसांमध्येच स्वाइन फ्लूने ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच २०१४ मध्ये झालेल्या मृत्यूच्या तुलनेत दुपटीहून अधिक मृत्यू या वर्षाच्या सुरुवातीलाच झाले आहेत. तसेच या आजाराने गस्त असलेल्या रुग्णांची संख्या तर गेल्या दोन वर्षांच्या एकूण रुग्णांपेक्षाही जास्त असल्याचे समोर आले आहे. स्वाईन फ्लू या जिवघेण्या आजारानं मुंबईसह राज्यातील अनेक महानगरांमध्ये थैमान घातला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नारिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्याच्या वेशीवर हा रोग येऊन ठेपला आहे. वातावरणामुळे याचा प्रभाव वाढला आहे. थंडी अधिक काळ राहिली आहे. त्यात लोकांमध्ये जागरुकतेचे प्रमाणही कमी आहे. लोक लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच रुगण मनानेच अँटीबायोटिक्स घेत असल्याचीही माहिती मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्यात लोकांमध्ये सेकंडरी इन्फेक्शनचा धोका वाढत आहे. उन्हाळा वाढताच याचा प्रभाव कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. नाही, कारण पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरलॉजी आणि दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या नुकत्याच आलेल्या एका अहवालात एच१एन१ इन्फ्लुएंजाचे स्वरुप २००९ सारखेच असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हा पूर्वीपेक्षा घातक नाही. त्यामुळे तीच लक्ष अधिक परिणामकारक असणार आहे. पण दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नवी लस येत असते. स्वाइन फ्लू प्रतिकारक क्षमता तयार करण्यात या लसीला चार आठवडे लागतात. त्यामुळे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यातच लोकांनी लस घेणे गरजेचे आहे. भारतात स्वाइन फ्लूसाठी ४५ प्रकारच्या लसी मिळतात. देशात स्वाइन फ्लूच्या औषधांची कमतरता नाही. केंद्र सरकारकडे ६० हजार डोस उपलब्ध आहेत. पीडिऍट्रिक सिरपचे एक हजार डोस आहेत. पण तपास करणार्‍यांसाठी १० हजार मास्क आणि १० हजार डिटेक्शन किट आहेत. स्वाइन फ्लूच्या औषधांचा रुग्णालयांत पुरवठा होण्यात अडचणी मात्र आहेत. तसेच सर्वच मेडिकल स्टोरवरही हे औषध मिळत नाही. उदाहरणादाखल मुंबईत ७ हजार केमिस्ट आहेत. पण केवळ १०० स्टोरर्सनाच औषध विक्रीचा परवाना आहे. रुग्ण आपल्या मर्जीने हे औषध घेऊ शकत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन गरजेचे आहे. प्रिस्क्रिप्शन दाखवूनच ते खरेदी करता येऊ शकते. स्वाईन फ्लू हा हवेमार्फत पसरणार्‍या स्वाईन फ्लू इन्फ्लूएन्झा ए (एच १- एन १ ) या विषाणुमुळे  होतो. अशा आजाराची लक्षणे मुख्यतः सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप व अंगदुखी ही आहेत. कधी कधी उलट्या-जुलाब देखील होत असतात. विशेषतः स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या शिंकण्यातून खोकल्यातून हे विषाणु दुसर्‍या व्यक्तिंच्या शरीरात प्रवेश करतात. वरील लक्षणे दिसून आल्यास आजार अंगावर न काढता विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. सर्दी, खोकला येत असल्यास गर्दीत जाणे टाळणे आवश्यक असतेे. घरातच रहावे. शक्यतो जनसंपर्क टाळावा. शिंकताना वा खोकताना नाकातोंडावर रुाल धरावा. हात साध्या साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाव्यतिरिक्त गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात. गरम पाण्याची वाफ घेण्यास हरकत नाही. आपल्या आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी व ई व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश असावा. तात्पर्य प्रतिकारशक्ती इम्युनिटी पॉवर वाढविणे हा आजारावर मात करण्याचा सर्वोत्तम उपाय होय. धुम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे हा आजार मुख्यतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ज्या व्यक्तिंना हृदयरोग, किडनी, दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह असे विकार आहेत, अशांना स्वाईन फ्लूमुळे अधिक बाधा होण्याची शक्यता असते. हा आजार बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो. शाळेतील मुलांमध्ये संसर्गामुळे हा विकास बळावण्याची शक्यता असते. शाळेच्या व्यवस्थापकांनी फ्लू सदृश्य विद्यार्थी वा शिक्षक आढळल्यास तात्काळ स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. अशा रुग्णास तातडीने शासनाच्या अधिकृत रुग्णालयात पाठवावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापले रुमाल वा नॅपकिन हात पुसण्यासाठी वापरावेत. दुसर्‍या मुलांचे रुमाल चुकूनही वापरु नयेत, याबाबत पुरेपुर खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्लूबाधित रुगणाने वेळीच खबरदारी घेऊन योग्य तो औषधोपचार केल्यास हा आजार ५-६ दिवसांत बरा होऊ शकतो. स्वाईन फ्लूवर टॅमिफ्लू हे प्रभावी औषध सर्व शासनमान्य रुगणालयांमध्ये उपलब्ध असते. तसेच हे औषध एक्स औषध विक्रीचा परवाना असलेल्या विक्रेत्यांकडे उपलब्ध असते. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी पुण्यातील इन्स्टिट्युटतर्फे त्रिगुणी लस विकसित केली असल्याची माहिती डॉ. राजीव ढेरे यांनी दिली आहे. स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाला सर्वंकष उपचारासाठी आयसोलेशन वार्डात दाखल करा. जेणेकरुन आजाराचा फैलाव टाळता येईल. स्वाईन फ्लू हा काही जीवघेणा रोग नाही. मात्र त्याची योग्य वेळी तपासणी करुन रुग्णावर उपचार केल्यास हा रोग बरा होऊ शकतो. त्याचबरोबर डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन स्वाईन फ्लू बरा करता येऊ शकतो. त्यामुळे आपण याचा बाऊ न करता वेळीच उपचार करुन याचा मुकाबला करु शकतो.
-----------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel