-->
संपादकीय पान बुधवार दि. २९ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
कॉँग्रेसची आता आम आदमीपासूनच फारकत
-----------------------------------
आम आदमीचा सतत गेली दहा वर्षे जयघोष करणार्‍या सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाने आता आगामी लोकसभा निवडणुकीतून आम आदमीच्या नावापासून फारकत घेण्याचे ठरविले आहे. यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दिल्लीत आम आदमी पक्षाने सत्ता काबीज केल्याने कॉँग्रेसची आता खर्‍या अर्थाने आम आदमी या शब्दाचा प्रयोग करण्यात मोठी गोची झाली आहे. कॉंग्रेसने लोकसभा प्रचाराच्या जाहिरातीसाठी भाजपचे घोषवाक्य चोरल्याचा आरोप झाल्यानंतर आता प्रत्येक घोषवाक्य आणि जाहिरातींवर कॉँग्रेस पक्ष बारकाईने नजर ठेवून आहे. तर कॉंग्रेसने काही घोषवाक्यांमध्ये बदल केला आहे. आम आदमी हा शब्द कॉंग्रेसच्या जाहिरातीतून वगळण्यात आला आहे. नव्या जाहिरातीत प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती ही नवी घोषणा देण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवडणूक प्रचारात कॉंग्रेसच्या घोषणांमध्ये आम आदमी हा शब्द प्रयोग करण्यात येत होता. कॉंग्रेसने आता आम आदमीवरील आपले लक्ष्य कमी करुन ते मध्यमवर्गाकडे वळविले असल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील पक्षाला आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर, मध्यमवर्गाचा विश्वास संपादन करण्याची गरज व्यक्त केली आहे. आम आदमी पार्टीने आम आदमीच्या जोरावर दिल्ली विधानसभा काबीज केली. त्यामुळे कॉंग्रेसने आम आदमीचा उल्लेख केला तर ते आपची नक्कल करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप होण्याची पक्षाला भीती आहे. शुक्रवारी कॉंग्रेसने देशभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातील मी नाही, आम्ही घोषणा दिली होती. तेव्हा त्यांच्यावर भाजपची घोषणा चोरल्याचा आरोप झाला होता. आता आम आदमीचा उल्लेख केला तर आम आदमी पक्ष आपल्या घोषणा चोरल्याच आरोप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादात न पडण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने आम आदमीपासून फारकत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऐवढेच कशाला सरकारी योजनांतूनही आम आदमीला वगळण्यास सुरुवात केली आहे. आय.टी. क्षेत्रातील नामवंत उद्योगपती नंदन निलकेणी अध्यक्ष असलेल्या आधार या योजनेची टॅग लाईनही बदलली आहे. पूर्वी आधार आम आदमीचा अधिकार असे आधार कार्डची कॅचलाईन होती. परंतु आता त्यातही बदल करुन भारत एक ओळख असे केले आहे. २००४ साली कॉँग्रेसने आपल्या प्रचारात आम आदमी या शब्दाचा सर्वात प्रथम मोठ्या प्रमाणात वापर केला होता. भाजपाच्या शायनिंग इंडियाच्या विरोधात प्रचार करताना कॉँग्रेसने कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ असा जोरदार प्रचार करुन कॉँग्रेस सत्तेवर आली होती. गेल्या वेळी २००९ साली देखील कॉँग्रेसने आपल्या प्रचारात आम आदमीची प्रचारात काही साथ सोडली नव्हती. अर्थात कॉँग्रेसला आम आदमी हा केवळ प्रचारासाठीच पाहिजे आहे. कारण घएळअय्आ धङआ ऴर्षात कॉँग्रेसने त्यासाठी काय केले हा एक संशोधनाचा विषय ठरु शकेल. सत्तेवर असताना कॉँग्रेसने आम आदमीसाठी नडेमक्या कोणत्या योजना राबविल्या व ज्यांची घोषणा केली त्यांची अंमलबजावणी कितपत केली याच आढावा खरे तर त्यांनी आता घ्यावयास हवा. याचा जर आढावा घेतला तर कॉँग्रेसने या आम आदमीसाठी फारसे काहीच केले नाही असे अनुमान निघेल. त्यामुळे आता आम आदमी वगळल्याने हा वर्ग दुखावेल असे काही नाही. मुळात हा आम आदमी कॉँग्रेसवर सध्या नाराजच आहे आणि त्याने गेल्या चार राज्यातल्या निवडणुकात आपल्या हाताचा हिसका कॉँग्रेसला दाखविला आहेच. कॉँग्रसेची आम आदमीपासून फारकत झाली होतीच आता जाहीरातीतही झाली आहे, एवढेच.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel