-->
संपादकीय पान सोमवार दि. ०९ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
व्याघ्रगणनेचे वास्तव
देशभरातील १८ राज्यांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचा निष्कर्ष नुकताच प्रसारित करण्यात आला. या निष्कर्षाबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे त्याचबरोबर आजवर व्याघ्र संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची ही ङ्गलश्रृती असल्याचेही सांगितले जात आहे. परंतु मुळात हा निष्कर्ष पूर्णत: वस्तुस्थितीला धरून आहे असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. याचे कारण देशात वाघांच्या शिकारींचे प्रमाण मोठे आहे आणि बरेच प्रयत्न करूनही ते अपेक्षित प्रमाणात कमी करता आलेले नाही. हे वास्तव लक्षात घेऊन वाघांची संख्या निश्‍चित करताना त्यासाठी कोणत्या पध्दतीचा अवलंब करण्यात आला हा भागही महत्त्वाचा ठरतो. वाघांच्या पावलांचे ठसे आणि विष्ठा यावरून त्यांचा माग काढला जातो तसेच ते किती संख्येने असावेत याचाही अंदाज बांधला जातो. परंतु या पध्दतीतून काढण्यात आलेला निष्कर्ष आणि प्रत्यक्ष स्थिती यात तङ्गावत असू शकतेे. यात ठराविक वाघांची पुन्हा पुन्हा गणना होण्याची शक्यता असते. त्यामुळे विविध ठिकाणी कॅमेरे बसवून त्याद्वारे वाघांचे ङ्गोटो घेऊन त्यांच्या संख्येविषयी अंदाज बांधला जातो. या पध्दतीतही चुकीची गणना होण्याची शक्यता तुलनेने बरीच कमी असते. आणखी एक बाब म्हणजे वाघांच्या संख्येबाबत सरकारने सांगितलेली आकडेवारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी यात तङ्गावत असते. त्यामुळे यातील कोणती आकडेवारी खरी मानायची असा प्रश्‍न उभा राहतो. मात्र एक बाब मान्य केली पाहिजे की, वाघांची संख्या आता कमी झालेली नाही तर वाढतच चालली आहे. निश्‍चित संख्या किती यावर मतभेद होऊ शकतात. महाराष्ट्राचा विचार करायचा तर नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती भागात वाघांची संख्या तुलनेने अधिक आढळते. परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात ती अगदीच कमी आहे. म्हणजे या भागात पाच ते सहा या संख्येपेक्षा अधिक वाघ नाहीत. या बाबींचा विचार करता वाघांची संख्या खरेच वाढली असेल तर त्यामागे काय कारणे असावीत, असाही प्रश्‍न निर्माण होतो. कारण अलीकडे नवी अभयारण्ये विकसित करणे किंवा आहे त्या अभयारण्यांमध्ये काही सुधारणा घडवून आणणे या संदर्भात विशेष प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. मग वाघांची संख्या का वाढावी, हा प्रश्‍न कायम राहतो. वाघाची मादी साधारणपणे साडे तीन वर्षातून एकदा प्रसूत होते. तिला एका वेळी एक ते चार पिल्ले होतात. प्रसूतीनंतर मादी पिलांसोबत अडीच वर्षापर्यंत राहते आणि नंतर वेगळी होते. वाघाच्या पिलांना नर वाघांकडून धोका संभवतो. म्हणजे बोके मांजरीची पिल्ले मारून टाकतात. तीच मानसिकता नर वाघांमध्ये आढळते. या शिवाय पुरेशा प्रमाणात खाद्य उपलब्ध झाले नाही तरी वाघाची पिल्ले मृत्युमुखी पडतात. जगात वाघांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. मध्य प्रदेशातील कान्हा प्रकल्पात वाघ अधिक संख्येने आढळतात. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशातही वाघांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात ताडोबा राष्ट्रीय उद्यानातही वाघांची संख्या लक्षणीय आहे. वाघ हा मुलत: जंगलातील प्राणी. अलीकडे जंगले वरचेवर नष्ट होत आहेत. त्यातून वाघांचे अस्तित्त्व धोक्यात येणे साहजिक आहे. वाघांची संख्या घटण्यामागे शिकार हे मुख्य कारण आहे. जागतिक पातळीवर वाघाच्या तस्करीसाठी त्याची शिकार केली जाते. यातील आर्थिक उलाढाल बरीच मोठी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात एका वाघाची किंमत दीड ते दोन कोटींच्या घरात जाते. मारलेले वाघ आणि त्यांचे अवयव परदेशात पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा  कार्यरत असते. त्यात शिकार्‍यांपासून वन्यजीव तस्कर, व्यापारी, आंतरराष्ट्रीय धनिक आणि व्यावसायिक यांची साखळी आहे. विशेष म्हणजे या साखळीला राजकीय संरक्षण लाभले आहेे. वाघाच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट म्हणून तैवानचा उल्लेख  करावा लागेल. १९ व्या शतकात भारतात ४० हजार वाघ होते. त्यानंतर शिकारीच्या माध्यमातून अनेक वाघ मारण्यात आले. त्यामुळे वाघांची संख्या झपाट्याने घटत गेली. वाघांच्या एकंदर नऊ प्रजाती आहेत. त्यातील तीन प्रजातींचे अस्तित्त्व संपुष्टात आल्या असून सहा प्रजाती उरल्या आहेत. त्यामध्ये रॉयल बेंगॉल टायगर आणि सायबेरियन टायगर या दोन मुख्य प्रजाती होत. दर्‍या-खोर्‍यांनी, जंगलांनी वेढलेला प्रदेश आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता या बाबी वाघांच्या वास्तव्यासाठी आणि संवर्धनासाठी पोषक ठरतात. भारत हा सुरूवातीपासून जंगलांचा, नदी-नाल्यांचा आणि भरपूर नैसर्गिक संपदा लाभलेला देश राहिला आहे. येथे वाघांची संख्या जगातील एकूण वाघांच्या तुलनेत दोन तृतियांश इतकी राहिली आहे. हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे आणि तो जतन करणे, त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिचाच विसर पडल्याने आज हा राष्ट्रीय ठेवा दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे केवळ वाघांची संख्या वाढल्याच्या निष्कर्षावर समाधान न मानता वस्तुस्थिती लक्षात घेऊन वाघांच्या संवर्धनासाठी सरकारकडून काही महत्त्वाची पावले टाकण्याची आवश्यकता आहे. त्यात वाघांची शिकार पूर्णत: थांबवायला हवी. तरच हे वैभव पुन्हा नव्याने उभे राहिल.
------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel