-->
संपादकीय पान बुधवार दि. ०७ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
पीके, गोडसे आणि वाद!
सध्या दोन चित्रपटांच्या बाबतीत वेगळ्याच कारणांसाठी चर्चा सुरु आहेत. यापैकी एक चित्रपट मराठी तर दुसरा हिंदीआहे. महात्मा गांधी यांची हत्त्या करणार्‍या नथुराम गोडसेवर मराठीमध्ये चित्रपट काढण्यात आला असून त्याच्या शीर्षकामध्ये देशभक्त असा शब्द वापरण्यात आला आहे. दुसरीकडे आमीर खान, अनुष्का शर्मा यांच्या पीके या चित्रपटातील काही दृश्यांनी वादंग माजवून ज्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तेथे तोडङ्गोड, दगडङ्गेक इत्यादी प्रकार सुरु आहेत. हे चित्र पाहिल्यावर अचंबित व्हायला होते. पीके चित्रपटाबाबत वादंग माजवावा असे आक्षेपार्ह काही नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डकडून हा चित्रपट मंजूर झाला असताना का वादंग निर्माण केला जात आहे हे कळत नाही. या चित्रपटात जत्रेमध्ये भगवान शंकराची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. त्या पात्राबाबत काहीही दाखवण्यात आले असले तरी ते चित्रपटातील एक पात्र आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या देशात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे मनातील विचारांची अभिव्यक्ती कशा प्रकारे करायची हे प्रत्येकजण ठरवू शकतो. या चित्रपटातील ज्या दृश्यांना आक्षेप घेऊन वाद निर्माण केला जात आहे त्या दृश्यांना सेन्सॉर बोर्डने हरकत घेतलेली नाही. एकदा सेन्सॉर बोर्डने मंजुरी दिल्यानंतर त्या दृश्यांबद्दल कोणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण उरत नाही. या चित्रपटावरुन कितीही वाद निर्माण झाला तरी बॉक्स ऑङ्गिसवर कमाई करण्यात हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आहे. या चित्रपटावरुन वादाचे प्रकरण सेन्सॉर बोर्डपर्यंतही गेले. बोर्डाने या चित्रपटातील  एकही दृश्य कापले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांनीही ही बाब मान्य केलीच. अनेकदा चित्रपटाशी संबंधित मंडळी मुद्दामहून वाद वाढवून सांगतात. अशा प्रकारचे वाद निर्माण झाले की त्याचा चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठीही ङ्गायदा होतो. चित्रपटाच्या चांगल्या व वाईट या दोन्ही वादाचा चित्रपट चालण्यासाठी मदत होतेच, असे अनेकदा सिध्द झाले आहे. पीके या चित्रपटाच्या बाबतीत असे होणे अपेक्षित नव्हते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. मग, त्याची आणखी चर्चा व्हावी असे का वाटावे? परंतु, स्पर्धेच्या युगात अनेकदा अपेक्षित नसलेल्या गोष्टीही घडू शकतात. इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजनाच्या क्षेत्रातही मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी, इतर चित्रपटांपेक्षा पुढे जाण्यासाठी अशा गोष्टी काही वेळा घडवून आणल्या जातात. ही स्पर्धा ङ्गार घातक आहे. चित्रपट, नाटकामध्ये कोणत्याही गोष्टी दाखवण्यात आल्या तरी त्या पाहून समाजमानावर ङ्गारसा परिणाम होत नसतो. लोक केवळ करमणुकीच्या माध्यमातून चित्रपट पाहात असतात. पीकेलाही हेच सूत्र लागू होते. चित्रपट किंवा नाटकांकडे केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणूनच पहायला हवेे. पीके या चित्रपटात कशाचीही वाईट थट्टा करण्यात आलेली नाही. देशभक्त नथुराम गोडसे या चित्रपटावरुनही सध्या असाच वाद सुरु आहे. हा चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्यामुळे तो  कुणी पाहाण्याचा प्रश्‍न नाही. पण, या चित्रपटाच्या शीर्षकामध्ये वापरण्यात आलेला देशभक्त हा शब्द नक्कीच चुकीचा आहे. महात्मा गांधी यांची हत्त्या करणार्‍याला कोणी देशभक्त कसं काय ठरवू शकतो? यामुळे सार्‍या देशाचाच अपमान होईल. पण, एक गोष्ट मात्र खरी की, कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीत कितीही वाद झाला, वादंग निर्माण करण्यात आला तरी त्यामध्ये मांडण्यात आलेले विचार मारले जात नाहीत. मग कितीही दगडङ्गेक करा, जाळपोळ करा विचार अबाधित राहतात. विचार मारले गेले असते तर क्रांतीकारक तयार झाले नसते. कोणत्याही गोष्टीवरुन वाद निर्माण करताना ही मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. मनोरंजनाच्या विश्वात प्रेक्षकांना आवडतील अशा गोष्टी सादर केल्या जातात. पण, नथुराम गोडसेला देशभक्त असे संबोधन वापरणे या देशातील कोणाला आवडेल? त्यामुळे तसे करणे गैर आहे. या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्याचे पुढे काय होईल हे आताच सांगता येणे अवघड आहे. मुळात नथुराम गोडसेवर चित्रपट बनवला जाईल अशी अपेक्षाच कोणी कधी केली नसेल. पण, तो बनवण्यात आला. असे चित्रपट वादग्रस्त ठरत असले तरी ते प्रेक्षकांकडून पाहिले जातात. याचे कारण त्यांना इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता असते. असे चित्रपट प्रदर्शित झाले तरी ते स्वीकारायचे की नाही ते आपल्या हातात असते. प्रत्येकाने ते ठरवून चित्रपट पाहण्याचा किंवा न पाहण्याचा निर्णय घ्यावा. त्यावरुन वादंग निर्माण करण्यात काही अर्थ राहत नाही. या चित्रपटावर बंदी आणावी या मागणीसाठी आंदोलनही केले जात आहे. तसे करणेही चुकीचे आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. तेथे प्रत्येकाला आपली मते मांडू द्या. त्यांच्या स्वीकार करायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. नथुराम गोडसे हे भारतीय इतिहासातील अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. वास्तविक चित्रपट बनवावा असे ते पात्र नाही. पण, एखाद्याने तो बनवला असेल तर ते तो बनवणार्‍याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असू शकते. मात्र, त्याच्या नावाच्या आधी देशभक्त असा शब्द वापरुन आपण त्याला मोठे करणार आहोत काय? तसे कदापि होता कामा नये.
-------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel