-->
संपादकीय पान सोमवार दि. १९ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------------
राजकीय आघाडीवर धक्के
लोकसभा आणि त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही प्रादेशिक पक्षांचाही पुरता सङ्गाया झाला आहे. या निवडणुकात भाजपाने पूर्णपणे यश संपादन केले होते. पराभवातून कॉँग्रेस पक्ष कसा सावरेल हा प्रश्‍न आहे. महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेची झालेली जबरदस्त पिछेहाट अनपेक्षित तसेच त्या पक्षासाठी धक्कादायक ठरली. यातून हा पक्ष अजुनही सावरलेला नाही. आपल्याकडे घर ङ्गिरले की घराचे वासे ङ्गिरतात अशी एक म्हण आहे. म्हणजे व्यक्ती असो, पक्ष असो वा संस्था तिच्यावर वाईट वेळ आली की आपले म्हणणारेही साथ सोडतात. उगवत्या सूर्याला नमस्कार करायची पध्दतच आहे. त्यामुळे यशाकडे जाणार्‍यांच्या मागे धावण्याचा सार्‍यांचा प्रयत्न असतो. तद्वत मनसेची साथ सोडून अन्य पक्षात जाण्याचा सिलसिला सुरू झाला आणि तो अजुनही कायम आहे. मनसेचे माजी आमदार प्रविण दरेकर आणि वसंत गीते यांनीही मनसेला नुकतीच सोडचिठ्ठी दिली. त्यांच्याबरोबर कल्याण ग्रामीणचे माजी आमदार रमेश पाटील आणि अखिलेश चौबे यांनीही मनसेला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे मनसेबाबत पुन्हा चर्चेला तोंड ङ्गुटले. मनसेतील दरेंकरांसह काही पदाधिकार्‍यांनी यापूर्वीच आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्यात मतभेद असल्याचे  समोर आले होते. त्यामुळे आज ना उद्या दरेकर मनसेतून बाहेर पडणार अशी शक्यता वर्तवली जात होती आणि अखेर झालेही तसेच. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळही नुकत्याच मनसेतून शिवसेनेत परतल्या. विधानसभा निवडणुकांनंतर मनसेतील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी पक्षत्याग केला आहे. या सार्‍या परिस्थितीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. परंतु राज ठाकरे यांनी या सार्‍या प्रकाराबाबत अजुन तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या परिस्थितीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विश्‍वासात घ्यायला हवे, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करायला हवा. त्यासाठी व्यापक दौरे करून संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर देणे अपेक्षित आहे. परंतु असे काही होताना दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर होण्याची तसेच त्यांचा आत्मविश्‍वास वरचेवर कमी होत जाण्याची शक्यता असते आणि तसे होणे पक्षासाठी आणखी नुकसानकारक ठरते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या चित्राच्या प्रदर्शनाला राज ठाकरे यांनी भेट देऊन उध्दव यांचे कौतुक केले. या घटनेमुळे हे दोघेजण पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. आता लवकरच मुुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत राज्यात भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांची युती सत्तेत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रसंगी भाजपा स्वबळावर लढवेल, असे भाजपाने नुतन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच स्पष्ट केले. अर्थात, या संदर्भातील अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आणि विचारपूर्वक घेतला जाणार आहे. त्यामुळे दानवेंनी सांगितले तसेच होईल असे नाही. तरिही आपली तयारी म्हणून शिवसेना मनसेला जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी विधानसभा निवडणुकांमधील दारूण पराभवातून सावरत मनसेने आपले राजकीय अस्तित्त्व मोर्चे, आंदोलने याद्वारे दाखवून द्यायला हवे होते. मनसेचा प्रभाव कमी होत जाण्याचा ङ्गायदा भाजपाला मिळणार आहे. सध्या केंद्रात आणि राज्यातही हा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे मनसेतून बाहेर पडणार्‍यांचा ओढा भाजपाकडे असणे साहजिक आहे. शिवाय आता भाजपाने स्व सामर्थ्य वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीनेही मनसेतून येणार्‍यांची भाजपाला मदत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने मात्र लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवातून सावरण्याचा  प्रयत्न चालवला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अलीकडेच एका परिपत्रकाद्वारे नेत्यांना, कार्यकर्त्यांना आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर यापुढे पक्ष नेतृत्त्वाची धुरा राहूल गांधी यांच्याकडेच जाणार असल्याचेही सूचित केले. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षाला आता दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी तयार व्हायचे आहे. गेल्या वेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष तिसर्‍या स्थानावर होता. यावेळीही खरी लढत भाजपा आणि आपमध्ये असली तरी कॉंग्रेसला  पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरावे लागणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्न आहे. त्यात वाराणसी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाने सातही जागा गमावल्या. लखनौमध्येही हीच परिस्थिती समोर आली. हे दोन्ही निकाल कॉंग्रेसच्या गोटात उत्साह निर्माण करणारे ठरले आहेत. अर्थात या दोन घटनांमुळे कॉँग्रेसला केवळ दिलासा मिळेल, पक्षाचे पुनरुज्जीवन होण्यास काही मदत होणार नाही. एकूणच पाहता विविध पक्षांना राजकीय धक्के सहन करावे लागत आहेत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही पक्षातून नेत्यांची निष्ठाबदलाची प्रक्रिया वेग घेईल असे दिसते.
--------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel