-->
काळ्या पैशाचे बिंग फुटले

काळ्या पैशाचे बिंग फुटले

संपादकीय पान बुधवार दि. ६ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
काळ्या पैशाचे बिंग फुटले
आजवर आपल्याकडे काळा पैसा कुठे आहे असा सवाल अनेक जण करीत होतो. मात्र काळा पैसा विदेशात बेकायदेशीररित्या पाठविणार्‍यंाच्या व त्यासाठी परदेशात कंपन्या स्थापन केल्या असल्याची माहिती आता प्रसिध्द झाली आहे, त्यामुळे काळ्या पैशाचे हे बिंग आता फुटले आहे. भारतातील सुमारे ५०० उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा पडून असल्याची धक्कादायक बाब पनामा पेपर्समध्ये उघड झाली आहे. पनामामधील लॉ फर्म मोसॅक फॉन्सेकाची ११ लाख गोपनीय कागदपत्रे उघड झाली आहेत. मोसेक फोन्सेका परदेशात कंपन्या स्थापन करुन देण्यास मदत करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक नागरिकांनी आपला कर चुकवण्यासाठी मोसेन फोन्सेकाला पैसै देऊन टॅक्स हॅवन्समध्ये कंपन्या स्थापन केल्या. मोसॅक फॉन्सेकाच्या यादीत प्रसिद्ध भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफ कंपनीचे के. पी. सिंग व त्यांचे कुटुंबीय, गौतम अदानींचे जेष्ठ बंधू विनोद अदानी, इंडियाबुल्सचे प्रवर्तक समीर गेहलोतसह इतर अनेकांचा समावेश आहे. शिवाय, पश्चिम बंगालमधील नेते शिशिर बाजोरिया आणि दिल्ली लोकसत्ता पार्टीचे माजी अध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे. भारतीयांना परदेशात कंपन्या स्थापन करण्याचा अधिकार नाही. परंतु २००४ साली २५,००० डॉलरपर्यंत रक्कम परदेशात पाठवण्याची परवानगी नागरिकांना देण्यात आली होती. परंतु ही परवानगी मिळण्याआधीच अनेक भारतीयांनी परदेशात कंपन्या स्थापन केल्याचे समोर आले आहे. पनामामध्ये कंपन्या स्थापन करण्यासाठी २३४ भारतीय पासपोर्ट सादर करण्यात आले आहेत. जगभरातील पत्रकारांनी विविध देशांमध्ये असलेल्या काळ्या पैशाविषयी तपास केला. तपासाअंती भारतासह जगभरातील अनेक बड्या कंपन्या, राजकारणी आणि उद्योजकांचा काळा पैसा परदेशात असल्याचे आढळून आले आहेत. पनामा पेपर्समध्ये गेल्या ४० वर्षांचे (१९७७ ते डिसेंबर २०१५) व्यवहारांचा तपशील उघड झाला आहे. जगभरातील सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचेही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसेच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, अभिनेता जॅकी चेन यांच्या काळ्या पैशाबाबतदेखील पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे. केवळ भारतीयच नव्हे तर अनेक विदेशातील राजकीय नेते, उद्योजक यांचा या यादीत समावेश आहे. आता त्यांच्यावर कारवाई करुन हा पैसा परत देशात आणण्याचे धाडस मोदी सरकार दाखविणार का, असा सवाल आहे. यापूर्वी कॉँग्रेसच्या काळात काळा पैसा देशाबाहेर गेला अशी बोंब भाजपातर्फे केली जात असताना आता हा पैसा कसा जातो हे समजल्यावर तो मायदेशी आणण्याचे काम भाजपाने करावे.

0 Response to "काळ्या पैशाचे बिंग फुटले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel