शेतकर्याचे उत्पन्न दुपट्ट होईल?
संपादकीय पान बुधवार दि. ६ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शेतकर्याचे उत्पन्न दुपट्ट होईल?
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतकर्याचे उत्पन्न पुढील पाच वर्षात दुपट्ट करण्याचा संकल्प सोडला आहे. वरकरणी पाहता ही इच्छा चांगलीच आहे. मात्र हे उत्पन्न कसे दुपट्ट करणार त्याची आखणी सरकारने केलेली नाही. सध्या देशाच्या एकूण उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. त्यानंतर उद्योग व शेती क्षेत्राचा वाटा येतो. आपल्याकडे दारिद्राची सर्वात मोठी लोकसंख्या शेती क्षेत्रात मोडते. सध्या शेतकर्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न हे सात हजारांच्या घरात आहे. हे दुपट्ट करणे हे अवघड नाही, मात्र त्यासाठी तशा प्रकारची आखणी करुन शेती उद्योगात गुंतवणूक केली गेली पाहिजे. सरकार तिकडेच कमी पडते आहेे. यंदा केंद्र सरकारने शेतीसाठी ३६ हजार कोटी रुपये व राज्य सरकारने शेतीसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम खूप मोठी वाटते, परंतु एकूण शेतीवर जगणारी लोकसंख्या तसेच एकूण असलेला अर्थसंकल्प याचा विचार करता ही रक्कम फारशी मोठी नाही. राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागातील दुष्काळ यंदा भयानकच आहे. त्यातच विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा वेळी सरकारची मदत वेळेत पोहोचत नाही. ज्या योजना आहेत त्या नोकरशाहीच्या विळख्यात अडकल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात गरीब शेतकर्याला कोणतीच मदत पोहोचत नाही. त्यामुळे योजना या कागदावरच राहातात. जलयुक्त शिवार ही योजना खरे तर चांगली आहे. मात्र त्याची कामे चांगल्या कार्यक्षमतेने झाली तरच यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा साठा त्यात होऊ शकतो. व पुढील वर्षी त्याचा दिलासा शेतकर्यांना मिळू शकतो. मात्र या योजनेतील कामे अत्यंत धीमेगतीने चालली आहेत. त्यामुळे या योजना असून नसून सारख्याच आहेत. शेतकर्याला त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा पुरविणे हे सरकारचे काम आहे. त्यासाठी पाटबंधारे योजना उभारणे, तसेच उपलब्ध पाण्याचा साठा कशा प्रकारे नियोजनबध्दरित्या वापरला जाईल हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे जे जलसिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत त्यांच्यावर पैसा घालून ते त्वरीत गतीने पूर्ण करावे लागणार आहेत. जल व्यवस्थापन हे आजवर सरकारला कधीच जमले नाही, त्यामुळे पाण्याचे अनेक प्रश्न आपण भोगत आहोत. उपलब्ध पाण्याचा कमीत कमी वापर करुन आपण जास्त पीक कसे काढू शकतो याचा विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकर्याने विभागानुसार कोणते पीक घ्यावे याचेही त्याला प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. अनेकदा शेतकरी एखाद्याचे चांगले उत्पन्न आले की, तेच पीक घेण्यास सर्व जण धावतात, त्यात अनेकदा नुकसान होते. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न दुपट्ट होऊ शकते मात्र त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. हे नियोजन सरकार करणार आहे का, हा सवाल आहे.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "शेतकर्याचे उत्पन्न दुपट्ट होईल?"
टिप्पणी पोस्ट करा