-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १६ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------------
वेध विश्‍वचषकचा
देशात आता पुन्हा एकदा क्रिकेटचे वारे जोरदार घुमू लागणार आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंडमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना कोणाचा समावेश केला जाईल या विषयी क्रीडा रसिकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्या विषयी वेगवेगळे अंदाजही बांधले जात होते. अखेर विश्‍वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, आर. अश्‍विन, अक्षर पटेल, भुवनेश्‍वरकुमार, महंमद शमी, इशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि उमेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी सेकंड विकेटकीपरचा पर्याय ठेवलेला दिसत नाही. त्या जागी पार्थिवला घेतले असते तर अधिक उपयोग झाला असता असे वाटल्याशिवाय राहत नाही. यावेळी अंबाती रायुडूला संधी देण्यात आली आहे. तो उत्तम विकेटकीपींग करू शकतो हे खरे असले तरी त्याचा त्याला सराव नाही. सलग काही सामन्यांमध्ये त्याला विकेटकीपींगची संधी मिळाली असेही झालेले नाही. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेत विकेटकीपींगबाबत त्याच्यावर किती भिस्त ठेवायची हा प्रश्‍न आहे. वास्तविक विकेटकीपींग हेसुध्दा मोठे जबाबदारीचे काम आहे. त्यामुळे ती जबाबदारी कसलेल्या खेळाडूवर टाकणे हिताचे ठरते. असे असले तरी या वेळचा विश्‍वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ तरूण तडङ्गदार आहे. कारण यात सर्वाधिक तरूण खेळाडू आहेत. याचा क्षेत्ररक्षणासाठी बर्‍यापैकी उपयोग होणार आहे. विश्‍वचषक स्पर्धेत क्षेत्ररक्षणाचे महत्त्व मोठे असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे तरूण खेळाडूंना अधिक संख्येने वाव हा भारतीय संघासाठी निश्‍चित दिलासा ठरणार आहे. अर्थात, आपल्याकडे विश्‍वचषक स्पर्धेत खेळू शकणार्‍या ऑलराऊंडर खेळाडूंची अजुनही वानवा आहे. अशा खेळाडूंचे गोलंदाजी, ङ्गलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांमध्ये काही ना काही योगदान असते. त्याचा संघाला ङ्गायदा होतो. त्यामुळे यापुढे ऑलराऊंडर खेळाडू तयार करण्यावर भर द्यायला हवा. या संघामध्ये रवींद्र जडेजाचाही समावेश करण्यात आला आहे. जडेजा अजून दुखापतीतून सावरत आहे. त्याने ङ्गीट होऊन काही सामने खेळायला हवे आहेत. थोडक्यात, त्याचा सराव व्हायला हवा. तशी संधी त्याला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी मिळणार का, हा महत्त्वाचा भाग असणार आहे. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ङ्गिजीकल ङ्गिटनेस हा मैदानाबाहेरचा असतो आणि मैदानावरील ङ्गिटनेस वेगळा असतो. त्यामुळे जडेजाने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी काही सामने खेळणे महत्त्वाचे ठरणार आहे. भुवनेश्‍वरला बर्‍याच दिवसांनी सामन्यांमध्ये खेळण्यासाठी घेतले होते. परंतु तो अजुनही ङ्गीट नाही. असा प्रकार संघासाठी हानीकारक ठरतो. परंतु विश्‍वचषक स्पर्धा सुरू होण्यास अजून एक महिन्याचा अवकाश आहे. तोपर्यंत पूर्णपणे ङ्गीट होण्याच्या आशेतून त्याला संघात संधी दिली असावी. स्टुअर्ट बिन्नीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. तो आता ३० वर्षांचा आहे. मध्यमगती गोलंदाजीच्या दृष्टीने तयार करून त्याचा कितपत उपयोग होेईल हा प्रश्‍नच आहे. त्याऐवजी उथप्पाला घेतले असते तर अधिक उपयुक्त ठरले असते असे वाटते. या वेळच्या विश्‍वचषक क्रिकेट    स्पर्धेत कोणत्या देशांचे संघ तुलनेने आव्हानात्मक ठरतील याचाही विचार करायला हवा. मागील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आङ्ग्रिका हे संघ तुल्यबळ होते. या वेळीही अशीच परिस्थिती आहे. यावेळी पाकिस्तानचेही आव्हान बर्‍यापैकी असणार आहे. अर्थात, त्यांनी हाङ्गीज आणि अजमल या दोन ऑङ्ग स्पीनर्सना संघाबाहेर बसवले आहे. त्यामुळे हा संघ काही प्रमाणात दुबळा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शिवाय इंग्लंड, न्यूझिलंड या देशांचे संघही उत्तम कामगिरी करू शकतील असे आहेत. शेवटी समोरचा संघ कसाही असला तरी सामन्याच्या दिवशी आपले खेळाडू कसे खेळतात यावरच आपल्या संघाची कामगिरी ठरणार आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूंना प्रत्येक सामना डोळ्यात तेल घालून खेळावा लागणार आहे.यावेळी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधारपद यशस्वीपणे निभावण्यात, विशेषत: एकदिवसीय सामन्यात संघाकडून उत्तम कामगिरी करून घेण्यात धोनी तरबेज आहे. त्याचा एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाला निश्‍चित ङ्गायदा होईल असा विश्‍वास आहे. शिवाय त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकदा विश्‍वचषक जिंकला आहे. त्यामुळे तोही अनुभवत्याच्याकडे आहे. आणखी एक बाब म्हणजे या वेळचे एकदिवसीय विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचे सामने न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशामंध्ये खेळले जाणार आहेत. या दोन्ही देशांमधील खेळपट्‌ट्यांचा आपल्या ङ्गलंदाजांना ङ्गारसा अनुभव नाही. शिवाय दोन्ही देशांमधील हवामान, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्याच्याशी आपले खेळाडू किती जुळवून घेतात यावरही त्यांची खेळातील कामगिरी बर्‍यापैकी अवलंबून असणार आहे. या सार्‍या बाबींचा विचार करता यावेळी भारतीय संघात एखादा लेग स्पीनर घेतला असता तर बरे झाले असतेे. कारण आजवर शेन वॉर्न तसेच शिवरामकृष्णन यासारख्या लेग स्पीनर्सचा त्या त्या संघांना मोठा ङ्गायदा झालाआहे. ते लक्षात घेऊन भारतीय संघात लेग स्पीनरची निवड व्हायला हवी होती. एकंदरित, काही उणिवांसह आताचा भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय  विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यास सज्ज झाला आहे. या संघाकडून भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. क्रिकेट रसिकांच्या या अपेक्षांची पूर्तता आपला संघ व खेळाडू करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.  
----------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel