संपादकीय पान शनिवार दि. २९ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अष्टपैलू व्यक्तिमत्व
----------------------------------
अलिबागच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींशी गेली सात दशके एकरुप झालेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, ज्येष्ठ वकिल दत्ताजीराव खानविलकर उर्फ भाऊ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने अलिबागनेच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याने एक संयंमी, सालस नेतृत्व गमावले आहे. गेली सात दशके ते अलिबागशी विविध अंगाने जोडले गेले असले तरी त्यातील पाच दशके ते सक्रिय होते. भाऊंनी अनेक राजकीय वादळे पाहिली, अनेक लाटा पाहिल्या. स्वातंत्र्याचा संग्राम, त्यानंतरची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणीबाणीचा काळ त्यानंतर आलेली जनता राजवट, कॉँग्रेसमध्ये पडलेली फूट, इंदिरा गांधींचा झालेला उदय आणि अलिकडे ९९ मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस हे सर्व टप्पे त्यांनी अतिशय जवळून पाहिले. केवळ हे पाहिले नाहीत तर त्याचे ते अतिशय जवळचे साक्षिदार होते. गेल्या पाच दशकात राजकारण ज्या प्रकारे बदलले हे त्यांनी पाहिले. त्यामुळेच सध्याच्या भ्रष्ट राजकारण्याना पाहून ते व्यथीत होत. राजकारण हे स्व:तच्या स्थार्थासाठी करणारे सध्याचे नेते पाहून त्यांना वाईटही वाटे. त्यातूनच त्यांनी ऐवढी वर्षे ज्या पक्षात काढली त्या कॉँग्रेस पक्षावर टीका करीत. शेकापच्या पुढार्यांची तारीफ करीत. अनेकांना असे वाटे की, दत्ताजींना कॉँग्रेस पक्षाने नंतरच्या काळात काही न दिल्याने त्यांच्यात नैराश्य आले आणि त्यातून ते शेकापच्या पुढार्यांची स्तुती करीत आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी नव्हती. त्यांना भ्रष्ट राजकारणाची चीड होती. त्यातूनच ते शेकापच्या नेत्यांची तारीफ करीत. त्यांना अशी स्तुती करुन कोणतेही पद मिळवायचे नव्हते किंवा कोणती सत्तेची लालसा नव्हती. कारण त्यांनी ज्या काळात सक्रिय राजकारण केले तो काळ अतिशय वेगळा होता. यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी त्यांनी कोणाचीही चमचेगिरी केली नव्हती की सध्याच्या भाषेत बोलायचे तर लॉबिंग केेले नव्हते. त्यांचा यशवंतरावांचा परिचय चांगला होता. त्यातून यशवंतरावांनी त्यांच्यातील अभ्यासू गूण बरोबर हेरला आणि त्यांना मंत्री होण्यासाठी आमंत्रण दिले होते. आजच्या काळात असे घडत नाही आणि ज्या दिशेने राजकारण, अर्थकारण चालले आहे त्याची त्यांना नेहमी खंत वाटे. सध्याच्या राजकारण्यांचे भ्रष्टाचाराचे आकडे पाहून त्यांचा आश्चर्य वाटे आणि आपण या राजकारणात सक्रिय नाही त्याचा आनंदही वाटे. दत्ताजीरावांचा जन्म रत्नागिरीतील पावस येथील असला तरी त्यांची कर्मभूमी ही रायगड ठरली. ते ज्या तेली समाजातून आले होते त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना कुणी राजकारणात ओळखत नव्हते. कारण खर्या अर्थाने त्यावेळचे राजकारण हे जातीपासून अलिप्त होते. वकिलीची त्यांना आवड असल्याने त्यांनी शिक्षण झाल्यावर अलिबागमध्ये वकिली सुरु केली. वकिली करताना त्यांनी प्रामाणिकपणे केली आणि खर्याचे खोटे केले नाही. जे त्यांच्या मनाला पटले त्यांचीच कामे घेतली. अनेकदा ज्यांना पैसे देणे शक्य नव्हते त्यांचे खटले फुकट लढविले. अशा प्रकारे त्यांनी वकिलीतही नाव कमविले. मात्र त्यांच्यासारख्या राजकीय माणसाला काही स्वस्त बसता येत नव्हते. त्यातून ते हळूहळू कॉँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी जिल्ह्यात कॉँग्रेस आणि शेकाप हेच दोन प्रमुख पक्ष होते. भाऊ हे कॉँग्रेसचे वकिल तर दत्ता पाटील हे शेकापचे वकिल असे एक सूत्रच तयार झाले होते. त्याकाळी उभय पक्षात संघर्ष जबरदस्त होता. मात्र वैयक्तिक दुष्मनी नव्हती. तो दोन राजकीय मतप्रवाहांचा संघर्ष होता. ती लढाई वैचारिक होती. त्यात कधी जनमत कॉँग्रेसच्या बाजूने तर कधी शेकापच्या बाजूने झुके. दत्ता खानविलकरांनी रायगड जिल्ह्यात मात्र कॉँग्रेसची सर्वात प्रथम जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यात यश मिळविले होते. एवढेच कशाला अलिबाग नगरपालिका झाल्यावर १२ वेळा नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला होता. अशा प्रकारे दत्ताजींनी कॉँग्रेसचे बस्तान जिल्ह्यात चांगल्या प्रकारे बसविण्यात यश मिळविले होते. मात्र ते जसे सक्रिय होण्याचे थांबले तसे कॉँग्रेसचे अनेक भागातले वर्चस्व कमी होऊ लागले. आपली वैचारिक लढाई समर्थपणे करण्यासाठी त्यांनी निर्धार साप्ताहिक सुरु केले. नंतर ते दैनिकात रुपांतरीत केले. मात्र ते जेमतेम सहा महिने टिकले आणि नंतर बंदच पडले. अर्थात या निमित्ताने भाऊंनी आपली पत्रकारितेची हौसही भागवून घेतली. मी पण एक पत्रकार आहे असे ते मोठ्या अभिमानाने सांगत. जिल्ह्यातले त्यांच्यापेक्षा वयाने थोडे लहान असलेले बॅरिस्टर अंतुले यांच्याशी त्यांनी मैत्री व दुरावा असा लपंडाव चाले. अंतुले मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले, मात्र भाऊंना एकदा मिळालेल्या मंत्रीपदाव्यतिरिक्त फारसे काही मिळाले नाही. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्यावर अंतुलेंनी बाजी मारली आणि दत्ताजीराव राजकारणात मागे पडत गेले. असे असले तरीही त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. कार्यकर्त्यांची मोठी उठबस त्यांच्याकडे असायची. शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांनी आपला कौल शरदरावांबरोबर दिला आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्ह्यात जाळे विणण्याचा पाया त्यांनी घातला. मात्र नंतर पक्षात आलेल्यांनी त्यांच्यावर बाजी मारली आणि हळूहळू दत्ताजीरावांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. असे असले तरी त्यांचा जिल्ह्यातील प्रत्येक बारीकसारिक घटनांवर अभ्यास असे. राजकारणी माणूस कधीच निवृत्त होत नसतो, त्याप्रमाणे ते एक पिताहम म्हणून राज्यातील राजकारणाकडे गेली दोन दशके पाहात होते, वेळ पडेल तेव्हा भाष्य करीत होते. असा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले जिल्ह्यातील एक नेतृत्व आता काळाच्या ओघात संपले आहे. असे राजकीय नेते होणार नाहीत, असेच म्हणावे लागेल. कृषीवलची त्यांना श्रध्दांजली.
-------------------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा