संपादकीय पान सोमवार दि. १५ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
विधानसभेलाही तरुणांच्या हाती चावी!
-----------------------------------
ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यात दीपावली पर्व सुरू होणार आहे, तत्पूर्वीच १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे फटाके फुटतील. ३५ दिवसांत महाराष्ट्रासह हरियानात नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची ८ नोव्हेंबर रोजी मुदत संपत असल्याने भारतीय निवडणुक आयोगाने शुक्रवारी निवडणुक कार्यक्रम येथे जाहीर केला. महाराष्ट्र आणि हरियाना राज्यांमध्ये एकाच टप्प्यात १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांची घोषणा आयुक्त संपत यांनी केली. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांसह बीड लोकसभा पोटनिवडणूकही याच तारखेला होणार आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनांनतर रिक्त झालेल्या या जागेकरिता पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रात ८ कोटीपेक्षा जास्त मतदार असून, ९० हजार ४०३ मतदान केंद्रे असणार आहेत. २८८ जागांपैकी २९ अनुसूचित जाती आणि २५ अनुसूचित जमातींकरिता राखीव असणार आहेत. राज्यात १५ ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत ९१ लाख ८२ हजार युवा म्हणजे १८ ते २४ वयोगटातील मतदार आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये प्रथमच राज्यातील १३ मतदारसंघांत व्ही.व्ही. पॅट म्हणजे (व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल) ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले हे समजणार आहे. राज्यातील १३ ठिकाणी व्हीव्ही पॅट पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर मतदाराला त्याने कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचे नाव समोरच्या मशिनमध्ये दिसणार आहे. त्याची माहिती असणारी पेपर स्लिप मतदाराला त्या यंत्रात दिसणार आहे, मात्र ती त्याच्या ताब्यात देण्यात येणार नाही. औरंगाबाद, अमरावती, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अहमदनगर, भंडारा येथील काही मतदारसंघांत ही व्हीव्ही पॅट यंत्रणा राबविण्यात येणार आहे.अनेकदा राजकीय पक्षांपासून विविध लोक इलेक्टॉनिक मतदान पध्दतीवर टीका करीत आले आहेत. यातील अनेकदा आरोप हे राजकीय हेतूने प्रेरितही असतात. गेल्या वेळी भाजपाचा लोकसभेत पराभव झाला त्यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मतदान पध्दतीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र यावेळी मोदींच्या नेतृत्वाखाली त्याच इलेक्ट्रॉनिक्स पध्दतीचा वापर करुन विजय झाल्यावर मात्र त्यांनी यावर टीका केली नाही. कोणाला मतदान केले तरी ठराविक पक्षालाच मत जाते असा त्यांचा दावा आहे. मात्र या आरोपात काही तथ्य नाही. या आरोपाला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने ही नवीन यंत्रणा प्रायोगीत तत्वावर उभारण्याचे ठरविले आहे. या व्ही.वीही. पॅट पध्दतीनुसार कोणाला आपण मतदान केले ते मतदाराला पाहता येईल. आपली लोकशाही व निवडणूक आयोग कशा प्रकारे परिपक्त अनुभवातून होत आहे त्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरावे. राज्यात ४ कोटी ३६ लाख २७ हजार ९५६ पुरुष, ३ कोटी ९६ लाख २ हजार ७९९ महिला, १०७१ इतर असे एकूण ८ कोटी २५ लाख ९१ हजार ८२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात एकाच दिवशी मतदान होणार असून ९० हजार ४०३ मतदान केंद्रे असणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती. निवडणूक आयोगाने या मतदारांना पत्रे पाठवून नावे नोंदविण्याचे आवाहन केले होते. यापैकी १ लाख ३ हजार मतदारांनी आपली नावे पुन्हा नोंदविली आहेत. आतादेखील मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसाच्या १० दिवस आधी म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नावनोंदणीचा अर्ज सादर करता येईल. अर्थात यावेळी देखील सत्तेची चावी तरुणांच्या हाती असणार आहे. ९१ लाख नवीन मतदार नोंदविला गेला आहे. त्याच्या जोडीला एकूण मतदारांत ४० वयाच्या खालील मतदारांची संख्या मोठी आहे आणि हा मतदार कोणाला मतदान करतो त्यावर सत्ता कोणाची येईल ते अवलंबून असेल.
--------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा