संपादकीय पान सोमवार दि. १५ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
दिवाळीपूर्व राजकीय धमाका
------------------------------
गणपती विसर्जनानंतर सगळ्यांचेच लक्ष लागलेली विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर शुक्रवारी झाली. १५ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी या वेळापत्रकामुळे दिवाळीपूर्व राजकीय धमाका होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात १५ ऑक्टोबरला मतदान होईल, तर १९ ऑक्टोबरला निकाल घोषित होईल. शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू करण्यात आली. महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व मतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी जोरदार लढत विविध राजकीय पक्ष त्यांच्या आघाड्या देतील. यावेळची निवडणूक ही राजकीयदृष्टया फार महत्वाची ठरणार आहे. कारण केंद्रात भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने आता राज्यातही भाजपा व त्यांचे मित्र पक्ष सत्ता स्थापनेसाठी आत्तापासूनच दावा करु लागले आहेत. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी त्याचा फटका शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांना बसणार आहे. निवडणूक कालावधीतच नियोजित सत्र परीक्षांबरोबरच दहावी, बारावी आणि पदवीच्या परीक्षा होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशीच बारावीचे दोन पेपर आहेत. मतदानामुळे हे पेपर पुढे ढकलावे लागणार असून, त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रकच कोलमडणार आहे. त्याशिवाय निवडणुकांच्या कामांसाठी शिक्षकांचा वापर केला जातो. मात्र त्याबाबत शिक्षकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक कामांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना तीन दिवस खर्ची करावे लागत असल्याने त्यांना शैक्षणिक कामे करण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक कामांतून वगळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबरला संपत आहे. त्यादृष्टीने गेल्याच आठवडयात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार होता. मात्र गणेशोत्सवाच्या धामधुमीत घोषणा करण्याचे निवडणूक आयोगाने टाळले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात विजयादशमी तर अखेरच्या आठवडयात दिवाळी असल्याने मतदानाच्या तारखा निश्चित करण्यास विलंब झाला. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड व जम्मू-काश्मीर या चारही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा इरादा होता. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे महाराष्ट्र व हरयाणामध्येच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. काश्मीर व झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नंतर घोषित करण्यात येणार आहे. आता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, युती आणि आघाडीत रंगविले गेलेले धुसफूसनाटय संपत आले असून हाती असलेल्या मोजक्या कालावधीत मैदानात उतरण्याची आखणी करावी लागणार आहे. जागावाटपाच्या मुद्दयावरून अडलेले घोडे लगेचच मार्गी लावण्यासाठी सेना-भाजप-घटक पक्षांची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तंबूत आता गांभीर्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभेच्या २८८ जागांपैकी निम्म्या जागांसाठी शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतरही संपली नव्हती. अमित शहा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासमवेत रात्री उशीरा चाय पे चर्चा कार्यक्रमही पार पाडला. यामुळे जागावाटपाच्या वादातून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली तेढ संपली, पण वादाचा मुद्दा मात्र कायमच राहिल्याने, तिढा सुटला नव्हता. युती टिको वा तुटो या बाण्याने आपापल्या निवडणूक नीतीची आखणीदेखील दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे करून ठेवली. कामाला लागा असा आदेश भाजपने आपल्या पक्षांच्या इच्छुकांना दिला, सेनेच्या इच्छुकांनी तर प्रचार साहित्यदेखील वाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये सेना-भाजपचे इच्छुक आमने सामने आहेत. त्यामुळे उद्दभवणारे प्रश्न आगामी काळात प्रकर्षाने जाणवतील. तिकडे दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही जागावाटपाचा घोळ संपलेला नाही. मात्र, स्वबळाची भाषा मवाळ झाली असून, दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढणार हे स्पष्ट झाल्याने, आघाडीतील धुसफूसनाटयावरही पडदा टाकला जाणार आहे. जागावाटपाचा तिढाही लवकरच सुटेल आणि संयुक्तपणे प्रचाराची आखणी केली जाईल, असे दोन्ही कॉंग्रेसचे नेते बोलू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच राज्यात होऊ घातलेल्या या निवडणुकीमुळे सत्ताधारी आघाडीला आपले स्थान टिकविण्याकरिता प्रचंड मेहनत करावी लागणार असून मतविभागणी टाळण्याकरिता एकत्रपणे निवडणुकीस सामोरे जाण्याखेरीज पर्याय नाही, हे केव्हाच स्पष्ट झाले असले, तरी निवडणुकीत स्वपक्षाचे बळ अधिक राहील यासाठी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आखणी सुरू आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार एकत्र होणार असला, तरी कॉंग्रेसचे केंद्रीय नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांकरिता प्रचारात उतरणार किंवा नाही याबाबत मात्र अद्याप संदिग्धताच आहे. युती व आघाडीच्या बरोबरीने तिसर्या डाव्या सममितीनेही आता जोर धरला आहे. सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपा-शिवसेना यांच्यात तसे पाहता फारसा फरक नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळेे यावेळी डाव्या पक्षांनी एकत्र येऊन एक चांगला पर्याय जनतेपुढे सक्षमपणाने उभा केला आहे. आज जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी डाव्या आघाडीव्यक्तीरिक्त अन्य कुणाचा पर्याय नाही. केंद्रात सत्तास्थानी आलेला भाजपाबाबत अनेक जण मोठ्या अपेक्षा बाळगून होते. मात्र जनतेची सफशेल निराशा भाजपा व नरेंद्र मोदींनी केली आहे. महागाई, भ्रष्टाचार या दोन प्रश्नांबाबत जनतेला दिलासा देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र गेल्या शंभर दिवसात दिलासा सोडा महागाईला हातभारच भाजपाच्या सरकारने लावला आहे. राज्यात सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीबदादल जनतेत असंतोष खदखदत आहे. अशा वेळी तिसरी आघाडी महत्वाचा पर्याय ठरणार आहे. दिवाळीपूर्वी होणार्या या राजकीय धमाक्यात सलव४ चित्र शअफष्ट होईल.
-------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा