-->
रेल्वेचा फसलेला प्रयोग

रेल्वेचा फसलेला प्रयोग

संपादकीय पान शुक्रवार दि. 16 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रेल्वेचा फसलेला प्रयोग
शताब्दी, राजधानी आणि दुरांतोसारख्या प्रीमिअर रेल्वेच्या जागा गेल्या काही दिवसांपासून रिकाम्या जात असल्यामुळे रेल्वे फ्लेक्सी फेअर तिकिट दरात बदल करणार आहे. त्यामुळे शेवटच्या मिनिटालाही तिकिट बुक करणार्‍या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे. फ्लेक्सी फेअरच्या सध्याच्या रचनेमुळे तिन्ही रेल्वेच्या तिकिट दराच्या मूळ किमतीत 50 टक्के वाढ झाली असती. या योजनेत अंतिम क्षणी तिकिट काढण्यार्‍यांना जादा पैसे द्यावे लागत होते. या योजनेमुळे रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याचा रेल्वे प्रशानसाचा उद्देश होता. यासाठी 9 सप्टेंबरपासून या योजनेचा प्रारंभ झाला होता. परंतु, आता या योजनेत बदल केला जाणार आहे. लवकरच नवी सूचना काढण्यात येणार असून यात प्रवाशांना 50 टक्के ऐवजी 40 टक्के मूळ तिकिटावर अधिक रक्कम द्यावी लागेल. चार्ट केल्यानंतर रिकाम्या सीट मूळ तिकिटावर दराच्या 14 अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. सध्या अशापद्धतीने 15 टक्के जादा रक्कम वसूल केली जाते. रेल्वेने फ्लेक्सी फेअर सुरु केल्यापासून 9 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान राजधानी, शताब्दी आणि दुरांतो रेल्वेमध्ये 5871 जागा रिकाम्या राहिल्या. जर एखाद्या प्रवाशाला चार्ट बनवल्यानंतर प्रवास करायचे असेल तर त्याला 40 टक्के जास्त पैसे देऊन तिकिट मिळू शकते. फ्लेक्सी तिकिट दरामुळे वाचलेल्या 10 टक्के जागंवर 10 टक्के वाढ होते. हा नियम स्लिपर, 2 एसी, एसी चेअर आणि 3 एसीला लागू होतो. प्रथम श्रेणी एसी आणि एक्जिक्यूटिव्ह श्रेणीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रेल्वेच्या अंदाजानुसार फ्लेक्सी फेअरमुळे 42 राजधानी, 46 शताब्दी आणि 54 दुरांतो रेल्वेमुळे 500 कोटींची कमाई होईल. विमानाचे तिकिट अशा प्रकारे विकून विमान कंपन्या चांगला पैसा कमवितात. मात्र रेल्वेतील हा प्रयोग फसला आहे. कारण यात दोन्ही ठिकाणी प्रवास करणारा प्रवाशी वेगळा आहे. जर रेल्वेचे तिकिट महाग मिळत असेल तर जेव्हांचे कमी दरातील तिकिट मिळत असेल त्यावेळी जाणारा प्रवासी रेल्वेत सापडतो. मात्र विमानात जाणारा प्रवासी हा बरेच वेळा कॉर्पोरेट असतो व वेळ पडल्यास त्याची जास्त खर्च करण्याची तयारी असते. अर्थात रेल्वेला या निमित्ताने हे वास्तव समजले हे बरेच झाले.
-----------------------------------------------------

0 Response to "रेल्वेचा फसलेला प्रयोग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel