-->
संपादकीय पान मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
बिल गेटस् व गडकरींची मिसळीपलिकडची चर्चा
------------------------------------------
मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा व जगातील सर्वात श्रीमंत बिल गेटस् यांनी ग्रामविकास तसेच वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्यांशी केलेली चर्चा प्रसिध्दी माध्यमातून गाजली ती गडकरींनी गेटस्‌ना खाऊ घातलेल्या मिसळीबद्दल. गडकर्‍यांची खवय्येगिरी सर्वांना ज्ञात आहेच. बिल गेटस् आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांच्या या खवय्येगिरीचा आस्वाद भारतीय मिसळ खाऊन लुटला. परंतु या मिसळीपलिकडे जी उभयतांमध्ये चर्चा झाली त्याला देशाच्या दृष्टीने फार महत्व आहे. बिल गेटस् हे जसे जगातील सर्वात श्रीमंत आहेत तसेच सर्वात मोठे दानशूर व्यक्ती म्हणूनही ओळखले जातात. अमेरिकन भांडवशाहीचे हेच वैशिष्ट्य आहे. अमेरिकेत जगाला गवसणी घालणारे उद्योगपती आहेत त्याचबरोबर त्यांची दानशूरपणाबाबतही ख्याती आहे. बिल गेटस् यात पहिल्या क्रमांकावर आहेत. आता ते पिण्यासाठी पाणी, स्वच्छता आणि ग्रामीण भागातील कौशल्याचा विकास करण्यासाठी बिल गेटस् फाऊंडेशन केंद्रीय ग्रामविकास मंत्रलयाला मदत करणार आहे. तब्बल तासभर या दोघांची ग्रामीण विकासावर चर्चा झाली. यावेळी बिल यांच्या पत्नी मिलिंडा व गडकरी यांच्या पत्नी कांचन उपस्थित होत्या. गडकरींच्या कार्यशैलीबद्दल आपण जाणून आहोत. त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज जगाला आहे. त्यांना आदरातीथ्याबद्दल जेवढी जाण आहे, त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना ग्रामीण जीवनाबद्दल असलेली आस्था, ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून सुरू असलेली धडपड लक्षवेधक आहे. आम्ही अनेकदा भारतात आलो; पण आज गडकरींच्या धडाडीचा परिचय सुखावून गेला, अशा शब्दांत बिल व मिलिंडा यांनी माध्यमांना सांगितले. तर गडकरी म्हणाले, गेटस् दाम्पत्य अत्यंत संवेदनशील आहे. त्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून भारतात लोकोपयोगी काम करायचे आहे. सरकार त्यांना पूर्ण मदत करेल. त्यांना ग्रामीण योजनांची पूर्ण माहिती आपण दिली आहे. त्यातील काही योजनांवर ते काम करतील. जिथे अडेल तिथे आपण राजदूत समजून स्वत: लक्ष घालू. पहिल्या टप्प्यात स्वच्छता, पिण्याचे पाणी, हातमाग व या विषयांवर आम्ही लक्ष केंद्रित करू. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम व ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या ग्रामीण भागातील कौशल्य व नैपुण्याला चालना मिळावी म्हणून तयार होत असलेल्या बँक ऑफ आयडियाच्या इंडिया इनोवेशन फाऊंडेशनची गेटस् यांना माहिती देण्यात आली. बिल यांना ती खूप आवडली. अशा चौकटीबाहेरील कल्पनांना सोबत काम करून मूर्तरूप देऊ असे आश्‍वासन त्यांनी दिले. गडकरी यांनी पुराचे व्यवस्थापन, हवेतून पाण्याची निर्मिती, स्वच्छतेसाठी नव्या तंत्रची तयारी, गंगा प्रकल्प, आदिवासींसाठी रोजगार, नक्षल्यांचे विकासात येणारे अडथळे याबाबतची माहिती दिली. दूषित पाण्यामुळे होणा:या आजारातून लोकांची सुटका करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर लक्ष वेधले. गेटस् यांच्या फाऊंडेशनने भारतात विविध प्रकल्पांवर आजवर विविध कामे केली आहेत. आता बिल गेटस् यांनी भारतात स्वच्छेवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला बिल यांनी हात घातला आहे. आपल्याकडे देशातील प्रत्येक जण स्वच्छतेकडे फारसा लक्ष देत नाही. रोगराईला आटोक्यात ठेवण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची असते. स्वच्छता मग ती आपल्या घरातली असो किंवा घराबाहेरची त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. याविषयी बेल गेटस् यांनी पावले उचलली आहेत त्याला केंद्र सरकारची जोड लाभल्यास देशात एक नवीन वातावरण तयार होईल. आपल्याकडे अशा प्रकारे बिल गेटस् यांच्या धर्तीवर उद्योजकांना पुढे येण्याची गरज आहे. आता कंपन्यांना नफ्याच्या दोन टक्के रक्कम ही समाजसेवेसाठी वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारे सक्ती करुन काहीी होणार नाही. प्रत्येक उद्योगपतीने स्वत: हून पुढे येऊन अशा प्रकारच्या समाजसेवेच्या कामात हातभार लावला पाहिजे. देशात असे हजारो बिल गेटस् तयार व्हायला पाहिजेत.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel