संपादकीय पान शनिवार दि. ५ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
डोहाळे मुख्यमंत्रीपदाचे
--------------------------------
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त रंग भरला जाण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. दिवाळीपूर्वी निवडणुकीचा बार उडविला जाण्याची शक्यता असल्याने आता जवळजवळ प्रत्येक पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात सत्तेत असलेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत बेबनाव माजला आहे. गेली पंधरा वर्षे सत्तेची फळे चाखलेल्या या आघाडीला यावेळी पुन्हा सत्ता मिलाल्यास काही तरी चमत्कार झालाच असे म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींच्या लाटेने या सत्ताधारी आघाडीच्या पार ठिकर्या उडविल्या गेल्या. अर्थात ही लाट आता धुसर होऊ लागली आहे हे सत्य असले तरीही राज्यातील यावेळचा सत्ताबदल हा मोदींच्या लाटेमुळे होणार नाही तर त्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे तसेच सत्ताधार्यांची नाळ ही जनतेपासून तुटल्यामुळे होणार आहे. असे असले तरीही कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आपण एकदीलाने लढू व पुन्हा सत्ता मिळवू असे काही वातावरण नाही. कॉँग्रेस पराभवाच्या दणक्यातून अजून सावरलेली नाही. केंद्रातील कॉँग्रेसचे नेतृत्व सत्ता गेल्यामुळे दुबळे झाले आहे. अशा स्थितीत राज्यात आता शेवटच्या चार महिन्यांसाठी का होईना मुख्यमंत्री बदलावा असे गार्हाणे कॉँग्रेसमधील बंडखोरांनी केंद्रीय नेतृत्वाकडे घालून पाहिले. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेने त्यांना तारले आहे. सध्या कॉँग्रेसकडे त्यांची स्वच्छ प्रतिमा हेच एकमेव भांडवल ठरले आहे. कोकणातील नेते नारायण राणे यांनी आपल्या चिरंजीवाचा झालेला पराभव खूपच मनाला लावून घेतल्याने त्यावर मार्ग म्हणजे राष्ट्रवादीला धडा शिकविणे याची त्यांची खूणगाठ पक्की बांधली आहे. यातून त्यांनी भाजपाचे दरवाजेही ठोठावून पाहिले. परंतु त्यांच्यासाठी कुणी दरवाजा किलकिलाही केला नाही. त्यानंतर शेवटी त्यांनी कॉँग्रेसच्या दिल्ली दरबारी आपले वजन खर्ची घालून मुख्यमंत्री बदल करुन आपली वर्णी लागेल का त्याची चाचपणी केली. पण कोकणाचे पुन्हा एकदा दुदैव ठरले आणि राणेसाहेबांच्या पदरी निराशाच आली. मात्र राणेंच्या बरोबरीने पतंगरावांपासून जे नेहमीचे मुख्यमंत्रीपदाचे जे चार नेहमीचे इच्छुक कॉँग्रेसचे मोहोरे आहेत ते देखील यावेळी होते. मात्र दिल्लीश्वरांनी त्यांची काही हाक एैकलीच नाही. कॉँग्रेसमधील मुख्यमंत्री बदलाचे वारे थंडावले असताना तिकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रु कॉँग्रेसच असल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक कशी लढविता येईल व राज्यात काही नवी समिकरणे मांडता येईल याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने आपल्याला जास्त जागा पाहिजेत अशी मागणी कॉँग्रेसकडे केली आहे. माऊंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी उद्योगपती अदानी यांच्याशी शरद पवार यांचे झालेले गुफ्त गू व त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठून नरेंद्र मोदींची घेतलेली भेट, या सर्व घडामोडी म्हणजे काही योगायोग नव्हता. पवारांच्या डोक्यात कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अन्य कुणी नवा साथीदार पक्ष मिळतो का हे सतत चालूच असते. आता केंद्रात कॉँग्रेसची सत्ताही नाही, राज्यातही सत्ता जाणार आहे, अशा वेळी स्वबळावर निवडणूक लढवून नवी गणिते पवार मांडू शकतात. मात्र ते भविष्यात जी मोर्चेबांधणी करतील ती अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नसतील तर आपली कन्या मुख्यमंत्रीपदावर कशी बसेल यासाठी असतील. कॉँग्रेस-राष्ट्रवादीतली ही खदखद वाढत असताना भाजपा-शिवसेना यातील नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. युतीतील पूर्वीपासूनच्या अलिखीत खलित्यानुसार मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे जायला पाहिजे. मात्र यावेळी भाजपाच्या आशा-आकांक्षा नरेंद्र मोदींच्या विजयामुळे वाढल्या आहेत. परंतु शिवसेना आपला मुख्यमंत्रीपदाचा दावा काही सोडणार नाही. त्यामुळे युती तोडण्यापासून ते मुख्यमंत्रीपदाचा कालावधी वाटून घेण्यापर्यंतच्या सर्व पर्यायांचा विचार करण्यास भाजपा शिवसेनेला भाग पाडते आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची मनिषा काही लपवून ठेवलेली नाही. खरे तर शिवसेनेतही मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेले अर्धा डझन नेते आहेत मात्र उध्दवजी या स्पर्धेत आहेत म्हटल्यावर आपली इच्छा त्यांना दाबून ठेववी लागली आहे. युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच होणार आणि खरे तर त्याची उमेदवारी अगोदर जाहीर करण्याची तीव्र्र इच्छा शिवसेनेची होती. मात्र भाजपाने त्यात खो घातल्याने शिवसेनेला पहिल्यात टप्प्यात ररोखण्यात भाजपाला यश आले आहे. केंद्रात सत्ता आल्यावर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाला राज्यात मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागणे स्वाभाविकच आहे. गोपीनाथ मुंडे यांचा खरे तर या पदावर दावा व अधिकारही होता. परंतु त्यांच्या निधनानंतर आता अनेकांना मुख्यमंत्रीपदी बसण्याचे वेध लागले आहेत. यात नितीन गडकरींना दिल्ली सोडून पुन्हा राज्यात परतणे केव्हांही आवडेल. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांना आपण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत का बसू नये असे वाटणे स्वाभाविकच आहे. सध्या मोदींच्या लाटेत आपली सत्ता येणारच आहे, असे गृहीतक मांडून भाजपा नेत्यांना सत्तेची स्वप्ने पडत आहेत. सत्ता येणारच आहे तर शिवसेनेचे लोढणे गळ्यात अडकवून घेऊन कशाला सत्तेत वाटेकरी करायचे, अशी लालसा भाजपा नेत्यांना वाटणे काही चुकीचे नाही. कारण दरवेळी शिवसेनेकडून अपमान किती काळ सहन करायचा? बाळासाहेब असताना वेगळी परिस्थीती होती. आता सुध्दा मोदींच्या यशाला योग्य मान द्यायला शिवसेना तयार नाही. त्यापेक्षा स्वबळावर लढणे व मानाने सत्तेत येणे हाच त्यावरील मार्ग आहे असा विचार भाजपाला शिवणे काही चुकीचे नाही. अशी ही मानापमान नाटके प्रत्येक पक्षात, प्रत्येक युतीत, आघाडीत आहेत. त्यात डझनभर नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत... अर्थात त्यांना डोहाळे कितीही लागोत... जनतेच्या हाती फैसला आहे हे त्यांनी विसरु नये.
--------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा