संपादकीय पान शनिवार दि. ५ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
मिनीबुलेट ट्रेनची बुलेट घाई कशासाठी?
--------------------------------------
आग्रा या दोन शहरांमधील अंतर ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणार्या सेमी हाय स्पीड रेल्वेगाडीची चाचणी गुरुवारी पार पडल्यानंतर भारतात जलदगती रेल्वेगाड्यांच्या संदर्भात विविधांगी चर्चा सुरू झाली आहे. बुलेट ट्रेन आपल्या देशात सुरु होणे ही बाब सध्यातरी बरीच दूर आहे. मात्र निदान मिनी बुलेट ट्रेन सुरु करावी या विचाराने रेल्वे मंत्रालयाला पछाडलेले दिसते आहे. कारण सध्या खरे तर अनेक सुविधांचा अभाव असतानाही मिनी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, हे सर्व अनावश्यक आहे. ज्या देशांत बुलेट ट्रेन सुरू आहे, त्यांची रेल्वे वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम आहे. भारत त्यात अद्याप बराच पिछाडीवर आहे. आपल्याकडे अजूनही आरक्षणाचा गोंधळ होतो. गाड्या वेळेवर पोचत नाहीत. गाड्यांचा आवाज अतिशय जास्त आहे. प्रवाशांना शुद्ध पाणी व भोजन देण्याची सार्वत्रिक सोय नाही. या सार्या गोष्टी प्रशासकीय स्तरावर कठोर निर्णय व अंमलबजावणी करून साध्य केल्या जाऊ शकतात. ते साध्य झाल्यावर बुलेट ट्रेनचा विचार व्हावा. मात्र, या सुधारणा न करता रेल्वे प्रशासन ही रेल्वे सुरु करण्याचा घाट घालीत आहे. भारताची सद्यःस्थिती बुलेट किंवा हाय स्पीड ट्रेन सर्वत्र चालवता येण्याजोगी नाही. लोहमार्गावर जनावरे येतात, पूल असतात, रखवालदार विरहित क्रॉसिंग्ज असतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हाय स्पीड रेल्वेचे जाळे उभारणे ही अत्यंत खर्चिक बाब आहे. भारतात सध्याचे जे लोहमार्ग आहेत, त्यावरून हाय स्पीड ट्रेन धावू शकत नाही. देशात सुमारे ६५ हजार किलोमीटर लोहमार्गाचे जाळे आहे. त्यातील केवळ १७-१८ टक्के मार्गांवर ताशी १६०-१७० किलोमीटरच्या वेगाने गाड्या धावू शकतील. नवे लोहमार्गांचे जाळे विणायचे तर त्यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. शिवाय, अतिरिक्त जागा आणि वेळही लागणार आहे. जपानने अलीकडे ताशी ५०० किलोमीटर वेगाने धावणार्या बुलेट ट्रेनची चाचणी घेतली. त्या देशात ५० वर्षांपासून हाय स्पीड ट्रेन आहेत. परंतु, तेथे आतापर्यंत जेमतेम दोन हजार किलोमीटर एवढाच लोहमार्ग त्यांना हाय स्पीडच्या दृष्टीने तयार करणे शक्य झाले आहे. भारतात सध्या गाड्या ज्यावर धावतात, ते लोहमार्ग उभारण्याचा प्रतिकिलोमीटर खर्च तीन कोटी रुपये आहे. बुलेट ट्रेनचा एक किलोमीटरचा मार्ग तयार करण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपये खर्च होतात. सध्या जपान, चीन या देशांसह फ्रान्स, जर्मनीसारख्या युरोपीय देशांत बुलेट ट्रेन्स धावतात. चीनने बुलेट ट्रेन्सच्या बाबतीत भरीव प्रगती केलेली आहे. चीनमध्ये जगातील सर्वांत मोठे म्हणजे १० हजार किलोमीटरचे हाय स्पीड रेल्वेचे जाळे आहे. जर्मनीत सुमारे १०० वर्षांपूर्वी हाय स्पीड ट्रेनच्या दृष्टीने काम सुरू झाले. बुलेट ट्रेनचा सर्वसाधारण वेग ताशी ३०० किलोमीटर असतो. त्यामुळे दीडशे किमी वेगाने धावणारी भारतीय गाडीला सेमी बुलेट ट्रेन म्हटले जाते. गाडीच्या वेगात अडथळा येऊ नये म्हणून २७ किलोमीटर लांबीचे कुंपण टाकण्यात आले आहे. एवढा सर्व खटाटोप करुन प्रवाशांचा केवळ अर्धा तएासच प्रवासाचा वाचणार आहे. मध्यंतरी एकदा कोकण रेल्वेने मुंबई-गोवा हाय स्पीड रेल्वे सुरु करण्यासाठी चाचणी घेतली होती. परंतु हा नाद त्यांना सोडून घ्यावा लागला. दिल्ली-आग्रा खरे तर अलीकडेच महामार्गही कार्यान्वित झाला आहे. अशा वेळी या मिनी बुलेट ट्रेनचा घाट घालण्यात काय अर्थ? त्यापेक्षा रेल्वेने आपल्या सध्याच्या सोयी-सुविधा चांगल्या करण्यावर भर देणे अधिक गरजेचे आहे.
----------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा