संपादकीय पान गुरुवार दि. १० जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
भाजपाचे नवे शहेन शहा
---------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले गेलेले व नेहमीच वादाच्या भोवर्यात आसणारे अमित शहा यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. याची घोषणा मावळते अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीत एका पत्रकारपरिषदेत केली. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपमध्ये दाखल होत असलेले राम माधव आणि संघाचे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रचारक शिवप्रकाश यांनांही पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. माधव यांना पक्षाचे महासचिव पद मिळेल अशी एक चर्चा आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने भाजपावर आपली पक्कड घट्ट केली आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राम माधव हे संघातून आलेले पहिले नेते नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मानली जाते. त्यामुळे वेळोवेळी संघातील लोक भाजपमध्ये पाठविले जातात. स्वतः नरेंद्र मोदी, कुशाभाऊ ठाकरे, के.एन.गोविंदाचार्य, मुरलीधर राव, रामलाल, आणि संजय जोशी तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांसारख्या अनेक नेत्यांनी संघातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, या सर्वांनी प्राथमिक स्तरावर पक्षात प्रवेश केला आणि नंतर ते मोठे नेते झाले. ही पहिली वेळ आहे, की संघातील एखादा राष्ट्रीय स्तरावरील नेता त्याच समान पदावर भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यातील अमित शहा हे संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. अर्थात संघाचा यापूर्वीही भाजपावर पूर्णपणेे वरचश्मा राहीला होता. आता मात्र सत्ता आल्यावर भाजपाचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याविषयी विशेष उत्सुकता होती. कारण त्या पदावर नियुक्ती कोणाची होते त्याला महत्व होते. राजनाथ सिंग हे केंद्रात गृहमंत्री झाल्याने त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पदावर आपल्या विश्वासातील माणूस नेमावयाचा होता. तसे त्यांनी करणे यात त्यांच्या दृष्टीने काही चूक नाही. कारण पक्ष आणि सरकार यात योग्य समन्वय साधाण्यासाठी तसे आवश्यक आहे. अमित शहा हे मोदींच्या पूर्ण विश्वासातील तर आहेतच तसेच त्यांची संपूर्ण हायात संघाच्या सेवेत गेलेली असल्याने त्यांच्यासाठी फार मोठी जमेची बाजू ठरली. मात्र असे असले तरी नवीन अध्यक्ष नियुक्त करावयास भाजपाला एक महिन्यांहून जास्त काळ गेला. त्यामुळे अमित शहांच्या नावावर एकमत तयार करण्यासाठी मोदींना ऐवढा वेळ खर्ची घालावा लागला असावा. असो. पंन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले अमितभाई अनिलचंद्र शहा हे बायोकेमिस्ट्रीतील पदवीधर आहेत. शालेय जीवनापासून ते संघाच्या वर्तुळात वाढलेले होते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते म्हणून त्यांनी आपल्या नेतेपदाची कारकिर्द सुरु केली. एक गुजराती माणूस असल्याने अर्थातच त्यांचा सुरुवातीपासून कल हा व्यापार उदीमाकडे होता. शेअर ब्रोकर म्हणून त्यांनी आपला व्यवसाय एकीकडे फुलवित असताना भाजपाचे काम करण्यास सुरुवात केली. कालांतराने ते शेअर दलालीच्या व्यवसायाला रामराम ठोकून सक्रिय राजकारणात उतरले. नरेंद्र मोदींच्या काळात त्यांच्याकडे सर्वात प्रथम गुजरात वाणिज्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलल्यावर ते मोदींच्या गळ्यातील ताईत झाले. २००२ मध्ये गुजरात मंत्रिमंडळात शहांकडे १० महत्त्वाची खाती होती. त्यात गृह, कायदा आणि सुव्यवस्था, तुरुंग प्रशासन, गृहनिर्माण, संसदीय कार्य आणि सीमा सुरक्षा यांचा समावेश होता. नरेंद्र मोदींनतर गुजरातमध्ये अमित शहा यांचेच नाव घेतले जाई. नरेंद्र मोदी यांच्या विश्वासतले असल्याने त्यांच्यावर उत्तरप्रदेशच्या प्रभारीपदाची महत्वाची जबाबदारी निवडणुकीच्या अगोदर जेमतेम एक वर्ष अगोदर टाकण्यात आली होती. उत्तर प्रदेशात अमित शहा यांनी त्यांच्यातील संघटन प्रमुखाची गुणवैशिष्ट्ये दाखवली आणि सिद्धही केली आहेत. त्याठिकाणी पक्षाला अंतर्गत बंडाळीनेच पोखरलेले होते. एवढेच नाही तर, उत्तर प्रदेशात पक्षाला नावाजलेला चेहरा देखील नव्हता. संघटनशक्ती क्षीण झालेली होती. शहा यांना हे सर्व व्यवस्थित करण्यासाठी केवळ एक वर्ष लागले. एकेकाळी भाजपाची उत्तरप्रदेशात सत्ता होती. परंतु त्यानंतर तेथे पक्षाची ताकद कमी झाली होती. मात्र शहा यांनी हिंदु मते कशी कशी एकवटतील यादृष्टीने काम केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. उत्तरप्रदेशासारख्या मोठ्या राज्यात भाजपाला ८०पैकी ७१ जागा मिळून कधी नव्हे एवढे जबरदस्त यश मिळाले. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात जो ऐतिहासिक विजय मिळाला तो अमित शहा यांच्या रणनीतीमुळे असे पक्षातील दिग्गज मान्य करू लागले आहेत. त्यामुळेच आता निवडणूक रणनीतीत ते प्रमुख ठरत आहेत. मोदी आणि शहा ही भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकारणातील जोडी क्रमांक एक मानली जात आहे. गुजरातमध्ये या दोघांनी हिंदुत्ववादी राजकारण केले आणि आता राष्ट्रीय पातळीवर विकासाचा मुलामा देऊन हेच राजकारण करण्यास निघाले आहेत. गुजरातमध्ये गाजलेल्या इशरत जहॉँ या मुस्लिम तरुणीच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई अमित शहा यांच्याकडेच होती. अजूनही यासंबंधीचे संशयाचे धुके साफ झालेले नाही. आता याच अमित शहांना झेड् प्लस सुरक्षितता दिली गेली आहे. यापूर्वीच्या सरकारने प्रियांका गांधी व तिचे पती रॉबर्ट वद्रा यांना अशीच झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यावर त्यावेळी भाजपाने जोरदार टीका केली होती. आता मात्र कोणतेही सरकारी पद नसताना अमित शहा यांना अशी सुरक्षा देण्यामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित होतो. अमित शहा यांच्यासाठी कारगृह हीच सुरक्षित जागा आहे, अशी कडवट टीका आपचे प्रशांत भूषण यांनी केली आहे. या टीकेमागचा इतिहास तपासला गेला पाहिजे तरच भाजपाच्या या नव्या शहनशहाचे खरे स्वरुप उघड होईल.
------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा