संपादकीय पान शनिवार दि. १४ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
इन्फोसिसमधील सत्तांतर नवीन आव्हाने पेलेल काय?
---------------------------------------
देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)पदी एस.एपी. या सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी विशाल सिक्का यांची नियुक्ती झाल्याने, इन्फोसिसच्या नव्या नेतृत्वाचा शोध अखेर संपुष्टात आला आहे. एक प्रकारे इन्फोसिस या कंपनीत अशा प्रकारे सत्तांतर झाले आहे. कारण या कंपनीत आजवर सी.ई.ओ. या पदी कंपनीत असलेल्यालाच या पदी बसविण्याची प्रथा होती. मात्र आता या प्रथेला मुरड घालून नारायणमूर्ती यांनी बाहेरुन या पदी माणूस आणला आहे. आज या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून, त्यापूर्वीच कंपनीच्या भागधारकांना आणि कर्मचार्यांना आश्वस्त करणारा हा निर्णय कंपनीचे संस्थापक आणि विद्यमान कार्यकारी अध्यक्ष नारायणमूर्ती यांनी जाहीर केला आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीची पायाभरणी करून ती नावारूपाला आणण्यात नारायण मूर्ती आणि त्यांच्या पाच सहकार्यांचे योगदान निश्चितच मोठे आहे. या सहकार्यांमध्ये बहुतेक जण मूर्तींचे निकटवर्ती होते; परंतु विशिष्ट टप्पा ओलांडून एखादी संस्था वा कंपनी जेव्हा स्वयंगतीने आणखी पुढे जाते, तेव्हा बदलत्या परिस्थितीत आणि स्पर्धात्मक वातावरणात वाटचाल करण्यासाठी तिला नव्या दमाच्या, नव्याने विचार करू शकणार्यांची गरज असते. सिक्का यांच्या नेमणुकीचा निर्णय घेऊन मूर्ती यांनी ती गरज ओळखली, हे स्पष्ट होते. निवृत्ती घेतल्यानंतर नारायणमूर्ती गेल्या वर्षी जूनमध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून इन्फोसिसमध्ये परतले. पण तेव्हापासून समूहातील वरिष्ठ अधिकार्यांनी राजीनामे देण्याचे जणू सत्रच सुरू झाले होते. याच मालिकेत कंपनीचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य बी. जी. श्रीनिवास यांनी पंधरा दिवसांपूर्वी अचानक दिलेला राजीनामा हा मोठा धक्का होता. त्याच वेळी कंपनीची सूत्रे आता समूहाबाहेरील व्यक्तीकडे जातील हेही निश्चित झाले होते. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एस. डी. शिबुलाल यांनी मुदतीआधीच निवृत्त होण्याचे जाहीर केल्यानंतर, नव्या सीईओसाठी गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचा शोध सुरू होता. या प्रक्रियेदरम्यान किमान बारा वरिष्ठ आणि जुन्या अधिकार्यांनी राजीनामे दिल्याने कंपनीत नेतृत्वाबाबत पोकळी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवाय या गळतीचा परिणाम कर्मचार्यांच्या मनोबलावर होत असल्याची चर्चा होती. सिक्का यांच्या नियुक्तीने ही अनिश्चितता संपुष्टात आली आहे. सिक्का यांनी सूत्रे हाती घेताच असतानाच नारायणमूर्ती कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवत आहेत. त्यामुळे एका अर्थाने इन्फोसिसमध्ये आता एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. कंपनीच्या संस्थापकांच्या आणि जुन्या, अनुभवी अधिकार्यांच्या राजीनाम्यांमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे, हे सिक्का यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. या क्षेत्रातील उद्योगांचा महसूल २०२० पर्यंत तीनशे अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. नव्या संधींचा फायदा घेण्यासाठी गरज आहे ती सर्जनशीलतेची. सिक्का यांची कारकीर्द लक्षात घेता त्यांना चौकटीबाहेरचा विचार करावा लागणार आहे. आय.टी. उद्योगात आता इन्फोसिसने जगात आपले एक स्थान निर्माण केले असले तरीही स्पर्धेच्या युगात ही कंपनी गेल्या दोन वर्षात मागे पडली आहे. त्यासाठी कंपनीत तरुण रक्ताला वाव देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण या उद्योगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी टी.सी.एस. ही झपाट्याने पुढे जात आहे. गेल्या पाच वर्षात युरोप, अमेरिकेतील मंदीच्या वातावरणाचा फटका देशातील आय.टी. कंपन्यांना बसणे स्वाभाविक होते. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी नवीन बाजारपेठा शोधण्याचे जसे काम टी.सी.एस.ने केले व मंदीवर मात केली तसे आव्हान इन्फोसिसच्या नव्या सी.ई.ओ.वर आहे. कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती व त्यांच्या साथीदारांनी कंपनीची झपाट्याने प्रगती केली हे खरे असले तरीही आता भविष्यातील नवी आव्हाने पेलण्याची जबाबदारी सिक्का यांच्यावर आहे.
--------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा