-->
नोकियाचे डी. शिवकुमार आता जागतिक पटलावर

नोकियाचे डी. शिवकुमार आता जागतिक पटलावर

 नोकियाचे डी. शिवकुमार आता जागतिक पटलावर
 Published on 08 Oct-2011 PRATIMA
जगातली सर्वांत मोठी हँडसेट उत्पादन करणारी कंपनी नोकियाच्या भारतातील उपकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. शिवकुमार यांच्यावर आता कंपनीने जागतिक पातळीवरील जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आता डी. शिवकुमार हे नोकिया या फिनलंडच्या कंपनीच्या जागतिक पटलावर चमकणार आहेत.डी. शिवकुमार यांच्याकडे भारतातील कंपनीचा भार असेलच मात्र त्या जोडीला मध्यपूर्व व आफ्रिका या देशातील कंपन्यांचा कारभार पाहावा लागणार आहे. नोकियाच्या दृष्टीने अमेरिका व युरोपातील बाजारपेठ संकुचित होत चालली असताना त्यांचा या देशातील खपही घसरत आहे. अशा वेळी मध्यपूर्व व आफ्रिका या देशात नोकियाचा खप झपाट्याने वाढत आहे. आता शिवकुमार यांचे मुख्यालय दुबई हे असेल. 
नोकिया इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी एका नव्या व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे. या नव्या व्यवस्थापकीय संचालकाला डी. शिवकुमार यांच्यांशी सतत संपर्क ठेवावा लागेल. नोकियाचा कारभार जगात व्यापला असून त्यांना संपूर्ण जगाला चार विभागात वाटून घेतले आहे. एशिया पॅसिफिक, अमेरिका, युरोप, मध्यपूर्व व आफ्रिका असे चार हे विभाग आहेत. सध्या महागड्या व कमी किमतीच्या बाजारपेठेत नोकियाला फार मोठी स्पर्धा असली तरीही कंपनीने जगात व भारतातही आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. 
भारतातील आघाडीचे स्थान कायम राखण्यात डी.शिवकुमार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच कंपनीने आता त्यांना बढती देऊन मूळ कंपनीत सामावून घेतले आहे. 2006 मध्ये डी.शिवकुमार हे नोकियात आले. तेव्हापासून त्यांनी नोकियाला विक्रीत आघाडीचे स्थान मिळवून दिले आहे. नोकियात येण्यापूर्वी ते हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत होते. पाच वर्षांपूर्वी ते नोकियात दाखल झाले आणि त्यांनी कंपनीचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात केली. त्यावेळी नोकियाला मोठी स्पर्धा करण्याची पाळी आली होती. 

नोकिया ही देशातील हँडसेट बाजारात सुरुवातीपासून आघाडीवर होती. त्यांची सुरुवातीला विक्री दर वर्षी 100 टक्क्य़ांनी होत होती. त्यानंतर त्यांची विक्री 70 टक्क्य़ांवर खाली घसरली. त्यातच बाजारात आलेल्या स्मार्टफोनचा त्यांचा फटका बसला आणि विक्री घसरू लागली. मात्र, डी.शिवकुमार यांनी नवीन उत्पादने बाजारात आणून या स्पर्धेला यशस्वीरीत्या तोंड दिले आणि कंपनीला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून दिले. 
ग्राहकांना नेमके काय पाहिजे याची त्यांनी नाडी ओळखली आाणि त्यानुसार उत्पादने बाजारात आणली. याचा नोकियाला फार मोठा उपयोग झाला. त्यांच्या या अनुभवाचा फायदा कंपनीला आफ्रिकेत व मध्यपूर्वेतील देशांना व्हावा यासाठी त्यांच्याकडे या देशातील कंपनीचा चार्ज देण्यात आला आहे. कारण जगातल्या सध्या या बाजारपेठा झपाट्याने वाढत आहेत आणि याचा फायदा नोकियाला उठवायचा आहे. फिनलंडच्या या कंपनीने डी. शिवकुमार यांना बढती देऊन भारतीय बुद्धिमत्तेचा अशा प्रकारे गौरवच केला आहे. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "नोकियाचे डी. शिवकुमार आता जागतिक पटलावर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel