संपादकीय पान मंगळवार दि. ६ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
धावता मृत्यूचा सापळा
----------------------------
कोकण रेल्वेच्या मार्गावरील दिवा-सावंतवाडी ही पॅसेंजर गाडी रोह्या जवळील भिसे बोगद्यातून बाहेर पड असताना रुळावरुन घसरल्याने झालेल्या दुदैवी अपघातात मृतांची संख्या आता २५ वर पोहोचली आहे. तर १५० प्रवासी जखमी झाले आहेत. अलिकडच्या काळातील कोकण रेल्वेच्या मार्गावरील हा तिसरा अपघात आहे. यापूर्वी दोन माल गाड्यांचे अपघात झाल्याने त्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र रविवारच्या या अपघातात मनुष्यहानी झाल्याने रेल्वेच्या बेपरवाईचे व दुर्लक्षाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी रेल्वेने एक समिती स्थापन केली आहे. परंतु अपघात झाला त्या ठिकाणी रेल्वेचा रुळ तुटलेला आढळला आहे. लाईनमनने हे न पाहिल्यामुळेच त्यावरुन ही रेल्वे गेली व हा अपघात झाला असावा असा संशय आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर एक लाईनमन ठेवण्यात आलेला आहे. त्याच्याकडून ओके रिझल्ट आल्यावरच रेल्वे पुढे धावते. मात्र लाईनमनने हे तपासले नसावे किंवा त्याकडे दुर्लक्ष केले असावे. इंजिन चालकाच्या लक्षात ही बाब शेवटच्या क्षणी आली असण्याची शक्यात आहे. कारण त्यामुळे त्याने तातडीचा ब्रेक लावला. त्यामुळे मोठे धक्के देत ही गाडी थांबली. परंतु वेगात असलेली ही पॅसेंजर गाडीचे रेल्वे इंजिनासह चार डबे रुळावरुन घसरले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रवाशांचा एकदम आक्रोश व किंकाळ्या सुरु झाल्या. आपल्या गावाकडे सुट्टीत किंवा लग्नसराईच्या निमित्ताने चाललेल्या या गावकर्यांना अशा प्रकारे रेल्वेच्या बेपरवाईने मृत्यूचा सामना करावा लागेल असे कुणासही वाटले नव्हते. अपघात स्थळ हे रोह्यापासून सुमारे सहा कि.मी. दूर जंगलात असल्याने तेथे मदत व बचावकार्यात अनेक अडचणी होत्या. परंतु तेथील परिसरातील गावकर्यांनी रेल्वेची टीम पोहोचण्यापूर्वीच तातडीने मदतकार्य सुरु केले. त्याबद्ल गावकर्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या अपघाताच्या निमित्ताने रेल्वेने आपल्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा व प्रवाशांना देत असलेल्या सुविधांचा फेरविचार करण्याची वेळ आता आली आहे. गेल्या चार वर्षात रुळावरुन गाड्या घसरणे, डब्यांना आगी लागण्याच्या किमान दहा घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षात देशभरात एकूण १५ हजार प्रवाशांचा रेल्वेच्या प्रवाशात मृत्यू झाला आहे. हा आकडा भीषण आहे. त्यातील साडेतीन हजार लोक मुंबईतील अपघातात मरण पावले. त्यामुळे मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूक किती भयानक झाली आहे त्याच अंदाज येतो. एकूणच आपल्या देशातील रेल्वे म्हणजे धावता मृत्यूचा सापळा ठरावा अशी तिची भयाण अवस्था आहे. वाढते रेल्वेचे अपघात पाहता अपघात रोखण्यासाठी मोठा गाजावाजा करुन सुरु झालेली रेल्वे सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे फोल ठरली आहे. देशभरात रेल्वेचे जाळे सुमारे ६४ हजार किसोमीटर पसरले असून दररोज दोन कोटी लोक प्रवास करतात. मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीने दररोज प्रवास करणार्यांची संख्या ७० लाखाहून अधिक आहे. रेल्वेचे हे जाळे लक्षात घेता तिच्या संरक्षणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. आज रेल्वे ही २२ लाख लोकांना रोजगार पुरविणारी सरकारी आस्थापना असली तरीही त्यातील सुरक्षिततेसाठी कमी प्रमाणात कर्मचारी आहेत. अनेकदा रेल्वे दुरुस्ती कारखान्यात सुट्या भागांची कमतरताही मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे दुरुस्ती प्रलंबित करुन रेल्वे इंजिने तशीच चालविली जातात. रेल्वमंत्री दरवेळी अर्थसंकल्पात मोठ्या मोठ्या गर्जना करतात व सुरक्षिततेची हमी देतात. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडत नाही. रेल्वे खर्चात कपात करण्यासाठी प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याऐवजी अनेक सुविधा काढून घ्यायला लागले आहे. प्रवाशांना बसायची जागा कमी करुन त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी नवीन कोचची बांधणी केली जात आहे. त्यामुळे जएागा वाढल्या, मात्र प्रवासी संकोचलेल्या स्थितीत प्रवास करतात. एवढेच कशाला एसी डब्यातील पडदे देखील आता गायब झाले आहेत. अशा प्रकारे प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याऐवजी सुविधांची अधोगती चालू झाली आहे. त्याचबरोबर प्रवाशांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा आहे. कोकण रेल्वेवरचा हा अपघात जर लाईनमनच्या दुलर्क्षामुळे झाले असेल तर त्याची जबाबदारी पूर्णपणे रेल्वेने स्वीकारुन संबंधीतांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कोकण रेल्वेचा हा मार्ग एकेरी असल्यामुळे तसेच दर्याखोर्यातून व जंगलातून हा मार्ग जात असल्यामुळे याच्या सुरक्षिततेसाठी खास उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पगरंतु आपल्याकडे मनुष्यहानी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिली की आपली जबाबदारी संपली असे रेल्वेला व सरकारला वाटते. त्यामुळे गेलेला जीव काही परत येत नाही. मुळातच आपल्याकडे मनुष्याच्या जीवाला कवडीमोलाची किंमत आहे. त्यामुळे सरकारलाही प्रवासी मृत्यूमुखी पडल्यास त्याची विषण्णता वाटत नाही. खंत तर कधीच वाटत नाही. कोकण रेल्वे उभारणे हे तांत्रिकदृष्ट्या कठीण काम होते. ते आव्हान आपण पेलले आणि आपल्या या कार्याची विकसीत देशानेही दखल घेतली. परंतु आता त्याच्यावर खूष राहाण्यात अर्थ नाही. आता ही रेल्वे अपघात न करता चालविणे हे एक मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. ते पेलण्याची गरज आहे. अन्यथा रेल्वे हा धावता मृत्यूचा सापळा ठरेल.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा