-->
संपादकीय पान सोमवार दि. ५ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
अल निनो परिणाम नेमका काय असतो?
------------------------------------------
उन्हाळी मोसमात अवकाळी पाऊस येणे, पावसाच्या वेळापत्रकांमध्ये फेरबदल होणे या हवामानातील बदलांचा सर्वात पहिला व मोठा फटका हा बळीराजाला बसतो.  महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षांत साधारण बरा पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी अल निनोच्या परिणामांमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे जेमतेम ९५ टक्क्‌यांपर्यंत होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हे अर्थातच अंदाज आहेत. अशा अंदाजांनी यापूर्वीही हुलकावणीही दिलेली आहे. त्आपल्याकडे शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पाऊस समाधानकारक होणार नसेल तर त्याचा थेट परिणाम हा यंदाच्या एकूण कृषी उत्पादनावर होतो. पुरेसा पाऊस न झाल्यास दुष्काळ, पाणी, गुराढोरांच्या चा-याची टंचाई असे अनेक प्रश्न त्यातून उभे राहतात. भारतामध्ये यंदा पुरेसा पाऊस न होण्यास जो घटक कारणीभूत ठरणार आहे, त्या अल निनोचा फटका दर चार ते पाच वर्षांनी सहन करावा लागतो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील इक्वेडोर व पेरू या देशांनजीक असलेल्या सामुद्री क्षेत्रात दर पाच ते सात वर्षांनी अल निनोचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रशांत महासागरातील पाण्याच्या सामान्य तापमानामध्ये ०.५ सेल्सियस इतकी वाढ होते. अल निनोचा हा परिणाम नऊ महिने ते दोन वर्षांपर्यंत टिकून राहतो. एकसारखा पृष्ठभाग नसलेल्या पृथ्वीवर वारे उच्च दाबाकडून न्यून दाबाकडे वाहताना दिसतात. कोरिओलॉस प्रेरणेच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धात ते उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात ते डावीकडे वळतात. त्यामुळे विषुववृत्त ते अक्षांश ३० उत्तर या भागात वा-याची दिशा ईशान्य असते, तसेच विषुववृत्त ते दक्षिण अक्षांश ३० या भागात ती आग्नेय असते. या दोन्ही वा-यांना ङ्गव्यापारी वारेफ असे म्हटले जाते. नियमितपणे वाहणारे व्यापारी वारे प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाहांना दक्षिण अमेरिकेच्या किनार्‍यापासून दूर ऑस्ट्रेलिया तसेच फिलिपाइन्स या देशांच्या किनारपट्टीच्या दिशेने वळवतात. गेल्या काही दशकांमध्ये अल निनो परिणामांची तीव्रता वाढलेली दिसते. याचा थेट संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी आहे. प्रशांत महासागराच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणार्‍या अल निनो या हवामान स्थितीमुळे दुष्काळी भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढते, पावसाचे प्रमाण अधिक असलेले प्रदेश दुष्काळी होतात, थंड हवामानाच्या ठिकाणांचे उष्णतामान वाढते, तर उष्ण प्रदेशांमध्ये थंडीचा कडाका वाढायला लागतो. अल निनोमुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत असल्याने मान्सून वार्‍यांच्या वहनावर तसेच पाऊस पडण्यासाठी नितांत गरजेच्या असलेल्या बाष्पावरही परिणाम होत असतो. या स्थितीच्या प्रभावामुळेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार्‍या वार्‍यांच्या प्रवाहाची दक्षिण सीमा ३० अंश उत्तरेपासून खाली सरकून १५ अंश उत्तरेपर्यंत आली आहे. म्हणूनच साधारणपणे उत्तर-वायव्य भारतातून (पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर) वाहणारे थंड वारे महाराष्ट्रापर्यंत खाली सरकले आहेत. अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळमध्ये पाऊस सरासरी प्रमाणात पडेल. भारतातील काश्मीर खोरे, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीचा भाग, आंध्र आणि पूर्वोत्तर राज्यांत सरासरीइतका पाऊस पडेल. मात्र देशाचा उर्वरित भाग आणि श्रीलंकेमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. अशी स्थिती उद्भवल्यास देशात यंदा प्रामुख्याने तांदूळ, गहू, सोयाबीन, कापूस, मका या पिकांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. अल निनोमुळे देशातील पावसाचे प्रमाण कमी होईल हा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज काही हवामान शास्त्रज्ञांना मान्य नाही. त्यासाठी १९९७ चे उदाहरण ते देतात. या वर्षी त्या शतकातला सर्वात मोठा अल निनो परिणाम दिसून आला होता.
-----------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel