मंगळवार दि. २९ एप्रिलच्या संपादकीय पानासाठी चिंतन
-------------------------------------------------
निवडणूक याद्यातून नावे गायब, राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार
--------------------------------------------------
राज्यातील तिसर्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी मुंबई व परिसरातील सुमारे सात लाखाहून मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे आढळले होते. त्यामुळे एक मोठा हा हा कार माजला होता. मतदार याद्यातून नावे गाळली जाण्याचा प्रकार अर्थातच हा काही नवीन प्रकार नाहीय यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी मोठ्या संख्येने नावे गायब झाल्याने गहजब माजला. तसेच पेडर रोड येथील मतदारसंघावर उद्योगपती दीपक पारेख हे मतदानासाठी गेले असता त्याचे नाव गायब झालेले आढळले. एक तर पेडर रोडवासीय मतदानाबाबत अतिउत्साही असतात आणि आलेल्यांना मतदान न करता आल्याने त्याची फार बोंबाबोंब झाली. अर्थात यावेळी केवळ पॉश वस्तीतीलच नव्हे तर झोपडपट्यांपासून ब्लॉकमधील अशा सर्व वस्त्यांमध्ये नावे गायब होण्याचे प्रकार झाले होते. बरे ठराविक पक्षांचे म्हणजे प्रामुख्याने विरोधकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी मतदारयाद्यातून नावे गायब झाली असे नव्हे तर जवळजवळ प्रत्येक पक्षाला याचा फटका सहन करावा लागला आहे. उत्तर मुंबईतील मतदारसंघातील मोठया प्रमाणात मुस्लिम वस्ती असलेल्या भेंडीबाजारमधूनही अनेक नावे गायब होती. त्यामुळे कॉँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे नाराज झाले होते. म्हणजे केवळ सत्ताधार्यांनाच नाही तर सर्वच पक्षांना याचा फटका बसला आणि नाराजी व्यक्त झाली. शेवटी निवडणूक आयोगाला याची माफी मागणे भाग पडले. परंतु माफी मागितल्याने काही प्रश्न सुटणार नाही. परंतु झालेल्या या प्रकाराला निवडणूक आयोग जेवढा जबाबदार आहे तेवढाच जबाबदार राजकीय पक्षही आहे. आपल्याकडे राजकीय पक्षात सतर्कता नसल्याचे यावरुन स्पष्ट दिसते. राजकीय पक्षांच्या संघटना या सरकारला समांतर कार्य करीत असतात. प्रत्येक राजकीय पक्षाला मतदार यादी ही मिळते. त्यावरुन खरे तर त्यांनी मतदानापूर्वी छाननी करुन कोणती तृटी आहे का ते तपासणे अपेक्षित आहे. परंतु मतदार यादी घ्यायची परंतु फक्त चौकशी करायला येणार त्यांना त्याची माहिती द्यायची या पलिकडे राजकीय पक्ष काही काम करीत नाही हे त्यावरुन दिसते. अन्यथा एवढ्या मोठ्या संख्येने नावे गायब होतात हे राजकीय पक्षांच्या लक्षात मतदानापूर्वीच यायला पाहिजे होते. हे त्यांनी मतदान होण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या नजरेस आणून द्यायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे यादी ताब्यात असूनही पक्ष मतदानापर्यत कसे झोपले होते याचे दर्शन होते. मुंबई व परिसरात हे प्रामुख्याने झाले. रागडात हे झाले नाही किंवा अन्य मतदारसंघातही हे फारसे झालेले आढळले नाही. केवळ निवडणूक आयोगावर जबाबदारी टाकून राजकीय पक्ष आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. मात्र या घटनेने सर्वांनाच धडा दिला आहे. प्रामुख्याने निवडणूक आयोगाला त्यानिमित्ताने आपल्यात सुधारणा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आपल्यासारख्या ८० कोटी मतदार असलेल्या महाकाय देशात गुप्त पध्दतीने मतदान होणे व त्यासाठी अवाढव्य यंत्रणा उभारणे ही काही सोपी बाब नाही. आपल्या देशाचे ते एक मोठे यश आहे. काळाच्या ओघात आपण त्यात खुपच सुधारमा केल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. मतपत्रिकेवरुन आपण सुरुवात केली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांपर्यंत आपण येऊन ठेपलो. हा एक आपला मोठा टप्पा होता. आता नवीन जगाची हाक एकत आपल्याला काळाच्या ओघात आपल्याला इंटरनेटव्दारे गुप्त मतदान कसे करता येईल त्याची यंत्रणा उभारावी लागेल. यातून मतदारयाद्यांचे घोळ संपुष्टात येतील. पूर्वी आपल्याकडे मतमोजणी पूर्ण व्हायला किमान तीन दिवस लागत. त्यावरुन आपण वेळ कमी करीत बारा तासाच्या आत आणला. पुढील टप्प्यात निवडणूक झाल्यावर त्या संध्याकाळीच निकाल काही तासात लागेल अशी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी लागेल.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा