-->
संपादकीय पान सोमवार दि. २६ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
बिहारमध्ये नवी सत्तासमीकरणे
----------------------------
लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये संयुक्त जनता दलालाही मोदीलाटेचा ङ्गटका बसला. यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तडकाङ्गडकी राजीनामा देऊ केला. आता दलित नेते जीतनराम मांझी यांनी मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. याच वेळी लालूप्रसाद यादवांशी त्यांच्या पक्षाची युती होत असल्याने बिहारमध्ये नवी समीकरणे पहायला मिळणार आहेत. या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात देशभर कॉंग्रेसचे जसे पानीपत झाले  तशीच साडेसाती बिहारमध्ये संयुक्त जनता दलाच्याही वाट्याला आली. सत्ताधारी पक्ष असणार्‍या संयुक्त जनता दलाला या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील नैतिकता जागी झाली आणि अन्य कोणी मागणी करण्यापूर्वीच या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी तडकाङ्गडकी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या समर्थकांची पंचाईत झाली. नितीशकुमार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी त्यांच्यामागे लकडा लावण्यात आला. पण, नितीशकुमार कोणाच्या आग्रहाला बधले नाहीत. दरम्यान, जनता दलाचे नेते शरद यादव यांनी लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याचे जाहीर केले आणि या राज्यात नवे सत्तासमीकरण आकारला येत असल्याचे दिसत आहे. जीतनराम मांझी यांच्या निवडीने सध्या तरी मुख्यमंत्रीपदाचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. त्यांची निवड नितीशकुमार यांनीच केली आहे. जीतनराम मांझी हे अतिमागास समाजातील नेते असून त्यांना लालूप्रसाद यादव यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मांझी यांच्याकडे एससी/ एसटी कल्याण मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी गया येथून नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय जनता दलाचे रामजी मांझी आणि भाजपचे हरी मांझी यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी हरी मांझी तीन लाख २६ हजार मते मिळवून विजयी झाले आणि जतीनराम मांझी यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या रुपाने दीर्घ काळानंतर एक मुख्यमंत्री म़्हणून बिहारला दलित नेता मिळाला आहे. मांझी हे नितीशकुमार यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्याआधी १९६७ ते १९७२ या काळात भोलापासवान शास्त्री तर १९७९ ते ८० या काळात रामसुंदर दास हे दलित नेते या राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. पण, यांच्यापैकी एकही नेता मांझी यांच्याप्रमाणे अतिमागास नव्हता. या राज्यात दलितांचे प्रमाण १६ टक्के आहे. नितीशकुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हाही जतीनराम मांझी यांच्या नावाचा समावेश मंत्र्यांच्या यादीत होता. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर एका शिक्षण घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना पद गमवावे लागले. अर्थात, नंतर या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता होऊन ते राज्यमंत्री बनले. या राज्यात लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा असणार्‍या रामविलास पासवान यांनी आपला दलित पाया मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला असून नितीशकुमार यांनी मांझी यांच्या रुपाने दलित नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याने पासवान यांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे एके काळी घनिष्ठ मित्र होते. मात्र, नितीशकुमार यांनी भाजपशी संधान बांधून राज्याची सत्ता मिळवल्यावर त्यांच्यामध्ये शत्रूत्त्व निर्माण झाले. पण, आता लालूप्रसाद यांनी मांझी यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे या कट्टर शत्रूंना पुन्हा एकदा एकत्र आणले गेले आहे. या निवडणुकीत आपल्या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल याची नितीशकुमार यांनी कल्पनाही केली नसेल. पण, तसे घडल्याने त्यांची नैतिकता उङ्गाळून येऊन त्यांना तिचे दर्शन घडवण्यासाठी राजीनामास्त्र उपसावेसे वाटले. राजीनामा देण्यामागे त्यांची नैतिकता हे कारण सांगितले जात असले तरी त्याला इतरही काही पैलू आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. नितीशकुमार यांनी भाजपाची साथ घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी त्यांचा नरेंद्र मोदी यांच्या नावाला पहिल्यापासूनच कडवा विरोध राहिला. भाजपने मोदी यांच्याकडे प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्यावर मनातील मोदींच्या रागाचा स्ङ्गोट होऊन त्यांनी भाजपशी असलेली युती तोडून टाकली. आताच्या निवडणुकीनंतर भाजपला घवघवीत यश मिळून मोदींचा पंतप्रधानपदी बसण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर त्यांच्यासमोर जाणे टळावे यासाठी नितीशकुमार यांनी तडकाङ्गडकी राजीनामा दिला. भाजपला घवघवीत यश मिळाल्याने हे मंत्री त्या पक्षाच्या गोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी यांना पाठिंबा देऊन त्यांच्याशी सलगी केली तर राज्यातील मुस्लिमांची मते आपल्या झोळीतून गायब होतील अशी भीती त्यांना वाटत होती. नितीशकुमार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या  सरकारमध्ये मंत्रीपदावर राहून सत्ता उपभोगत होते. त्यानंतरही अनेक वर्षे त्यांची भाजपशी असणारी हातमिळवणी सुरु राहिली. पण, त्या काळात त्यांना कधी मुस्लिमांची मते गायब होतील याची भीती वाटली नाही. भाजप किंवा मोदी यांना मिळालेल्या देदीप्यमान यशाचा ङ्गटका केवळ आपल्याच राज्याला नाही तर देशातील सर्व राज्यांना बसला आहे. हे खरे तर नितीशकुमार यांच्यासारऱख्या राजकारणात अनेक वर्षे व्यतीत  केलेल्या ज्येष्ठ राजकीय नेत्याने समजून घेण्याची गरज होती. पण, दुर्दैवाने त्यांच्याकडून तसे घडले नाही. बिहारच्या शेजारीच असणार्‍या उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ७० जागा मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपने मिळवल्या आहेत हे तरी नितीशकुमार यांच्या लक्षात यायला हवे होते. पण, कडव्या हट्टाचे राजकारण करण्यास सुरुवात केली की ते कधी तरी अंगलट येऊन नामोहरम व्हावे लागते हे नितीशकुमार यांच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. आता त्यांची भिस्त नव्याने मुख्यमंत्री झालेल्या मांझी यांच्यावरच राहिल. नितीशकुमार व लालूप्रसाद यादव एकत्र आल्याने बिहारमधील सत्तासमीकरणे बदलणार आहेत.
--------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel