संपादकीय पान सोमवार दि. १२ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
कृषी क्षेत्रात मुलींची पिछाडी का?
--------------------------------------------
आपला देश हा कृषी अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून आहे. कृषी क्षेत्राव्दारे जवळपास ६० टक्के रोजगार आपल्याला उपलब्ध होतो. ही वस्तुस्थिती असली तरीही कृषी क्षेत्राकडे आपण मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले आहे. अन्य उद्योगांप्रमाणे कृषी क्षेत्राकडे एक उद्योग म्हणून पाहत नाही. त्यामुळे यात व्यवसायिकतेचा अभाव निर्माण झाला आहे. कृषी क्षेत्रात आपण सध्यापेक्षा बरेच काही करु शकतो. मात्र त्यासाठी तरुणांनी याकडे वळणे जरुरीचे आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याच्याशी असलेल्या जोड धंद्यांवर लक्ष केंद्रीत केल्यास चांगला लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर शेतीतही अत्याधुनिक तत्रंज्ञानाचा वापर होणे गरजेचे झाले आहे. असे असले तरी त्यासाठी तरुणांनी या क्षेत्राकडे वळण्याची आवश्यकता आहे. मात्र याबाबत निराशेचेच चित्र आपल्याला दिसते. देशातल्या एक-दीड दशकात कृषी शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढले असले तरी प्रत्यक्षात या मुलींना शेती नकोशी असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुणे कृषी महाविद्यालयातील एल. निकिता या विद्यार्थिनीने एम.एस्सी ऍग्री अभ्यासक्रमाच्या संशोधन प्रबंधासाठी केलेल्या संशोधनातून पुढे आला आहे. निकिताने कृषी पदवीपूर्व विद्यार्थिनींच्या महत्त्वाकांक्षा या विषयावर डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. यात पुणे, अकलूज व बारामती येथील कृषी महाविद्यालयांमध्ये पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेणार्या राज्यभरातून आलेल्या १२० मुलींच्या महत्त्वाकांक्षांचा अभ्यास करण्यात आला. यांपैकी एका मुलीने कृषी व संलग्न क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा व्यक्त केली असून, उर्वरित ९९ टक्के मुलींनी शेती व संलग्न क्षेत्रात उतरण्यास नापसंती दाखवली आहे. राज्यात कृषी शिक्षणाची पाळेमुळे विस्तारून १०० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यात पहिली नऊ दशके प्रामुख्याने मुलांचीच मक्तेदारी राहिली. वर्गात मुली शोधाव्या लागत, इतपत त्यांची उपस्थिती असे. हे चित्र १९९० च्या दशकात हळूहळू बदलले. २००० नंतर मुलींची संख्या अधिक वाढली. सध्या दर वर्षी सुमारे दोन ते अडीच हजार विद्यार्थिनी कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. मात्र यांपैकी बहुतेक विद्यार्थिनी या शिक्षणाकडे एम.पी.एस.सी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचे साधन म्हणूनच पाहत असल्याचे चित्र या संशोधनाने अधोरेखित झाले आहे. या पाहणीत तब्बल ८३ टक्के मुलींनी सरकारी नोकरी करण्याची मनीषा व्यक्त केली. अवघ्या सात टक्के मुलींनी स्वयंरोजगाराची व तीन टक्के मुलींनी खासगी क्षेत्रात काम करण्याची तयारी दर्शविली. यातही सर्वाधिक ६८ टक्के पसंती एम.पी.एस.सी.ला, प्रत्येकी १३ टक्के कल यू.पी.एस.सी व बँकिंगकडे, तर अवघ्या दोन टक्के मुलींनी संशोधनात काम करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. पुढील शिक्षणाच्या बाबतीत ८३ टक्के मुलींनी कृषीमध्येच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याची मनीषा व्यक्त केली. सुमारे नऊ टक्के विद्यार्थिनींनी पीएच. डी., तर आठ टक्के विद्यार्थिनींनी व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याचा मनोदय व्यक्त केला. माहिती व मार्गदर्शनाचा अभाव, ही कृषीच्या विद्यार्थिनींसमोरील सर्वांत मोठी अडचण असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय शिक्षण घेताना आर्थिक चणचण, दुर्गम भागातील वास्तव्य व कुटुंबाची पारंपरिक मानसिकता या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वसाधारणपणे ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्राचे वा व्यवसायाचे शिक्षण घ्यावे, असा प्रघात आहे. शेतीच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती उलट असल्याची बाब आता संशोधनातूनही स्पष्ट होऊ लागली आहे. शेतीतून बाहेर पडण्याचे साधन म्हणजे कृषी शिक्षण असा पायंडा अधिक रूढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. हा अहवाल पाहता कृषी क्षेत्रात व्यवसायिक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून पुढे येणारी तरुण पिढी आपल्याला नव्याने घडवावी लागेल. यात मुलींचा वाटा महत्वाचा ठरणार आहे.
-------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा