-->
बुश पर्वाची अखेर

बुश पर्वाची अखेर

सोमवार दि. 03 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
बुश पर्वाची अखेर
अमेरिकेचे माजी अध्यश जॉर्ज बुश (सिनीयर) यांच्या निधनामुळे बुश पर्वाची अखेर झाली असे म्हणता येईल. खरे तर जॉर्ज बुश यांना अध्यशपदाची एकच टर्म मिळाली होती. परंतु त्यांच्या चार वर्षाच्या अध्यशपदाच्या कारकिर्दीत जगात महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यांच्या कालखंडाला महत्व प्राप्त होते. अमेरिकन नौदलात पायलट असलेले व दुसर्‍या महायुध्दात सहभागी झालेले ते एकमेव अमेरिकन अध्यश ठरले. युध्द त्यांनी प्रत्यशात अनुभवले असल्याने त्याचे वाईट परिणाम पाहिले होते. परंतु अध्यशपदी आल्यावर त्यांनी जगातील युध्दखोरीला प्रोत्साहनच दिले. इराकचे युद्ध हे त्याचे एक उत्तम उदाहरण होते. इराकने कुवैतवर चाल केल्यावर बुश यांनी जगातील लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावा केला आणि 90 साली अमेरिकन दोस्त राष्टांची फौज उभारुन इवल्याश्या इराकला संपविण्या घाट घातला. यामागे त्यांचे लोकशाही प्रेम नव्हते तर तेथील तेल विहिरींवर डोळा होता. त्याचा हा छुपा अजेंडा जगापासून काही लपून राहिला नाही. बुश यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. अमेरिकन संसदेत त्यांनी प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर अमेरिकेचे संयुक्त राष्ट संघटनेचे अँम्बेसिडर, अमेरिकेचे चीनमधील प्रतिनिधी, सी.आय.ए.चे संचालक, दोन टर्म अमेरिकेचे उपाध्यश व एकदा अध्यशपद अशी अनेक पदे भूषविली. त्यांनी चीनमध्ये काम केलेले असल्यामुळे त्यांना आशिया खंडाची भौगोलिक व राजकीय माहिती होती. चीनची वाढत जाणारी ताकद त्यांनी पाहिली होती. परंतु उपराष्टाध्यश  व राष्टाध्यशपदी असताना भारताला कधीच झुकते माप दिले नाही. नेहमीत पाकिस्तानच्या बाजूने ते राहिले. त्याष्टीने पाहता ते भारताचे कधीच मिञ नव्हते. अर्थात तेव्हाच्या शीतयुध्दाच्या काळात याहून वेगळी भूमिकाही अमेरिकेकडून अपेशीत नव्हती. त्यांनी शीत युध्द पाहिले व या कालखंडातील ते अमेरिकेचे शेवटचे अमेरिकन अध्य श ठरले. शीतयुध्दानंतरचा त्यांना फारसा कालावधी मिळाला नसला तरीही त्यांनी शीतयुध्द संपविण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत युनियनशी वाटाघाटी केल्या व एका नव्या पर्वाची नांदी केली. त्यासंदर्भात त्यांचे कार्य एतिहासिकच होते. 1988 साली बुश अध्यशस्थानी आल  त्यावेळी भारतीय राजकारणाचा पोत बदलत चालला होता. बोफोर्सच्या वादानंतर काँग्रेसचे सरकार सत्तेवरुन बाहेर फेकले गेले होते. मंदीर व मंडलच्या राजकारणात्या पार्श्‍वभूमीवर नँशनल फ्रंटचे सरकार सत्तेत आले होते. हे सरकार काही स्थीर नाही याची कल्पना बुश यांना पूर्णपणे होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अमेरिकन सरकारचे प्रतिनीधी म्हणून ते अंत्यविधीला हजरही होते. सोव्हिएत फौजांची अफगाणिस्तानातून माघार सुरु झाल्यावर त्यांनी पाकिस्तानला सर्वतोपरी पाठिंबा दिला हे वास्तव आपण मान्य केले तरी त्यांनी पाकिस्तानच्या हाती अण्वीक शस्ञे लागणार नाहीत याची खाञी बाळगली. परंतु भारताच्या सांगण्यानुसार, त्यावेळी खूप उशीर झाला होता. कारण त्यापूर्वीच पाकन  अणू तंञऩ्यान हस्तगत केले होते. रेगन प्रशासनाच्या काळापासून भारत-अमेरिकेचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली होती. शीतयुध्दानंतर भारताला ते संबंध आणखी सुधारण्यात रस होता. परंतु बुश सरकारने त्याला फार मोठी काही चालना दिली नाही. बुश प्रशासनाने पाकला आर्थिक मदत तसेच शस्ञसज्ज करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. 89 साली भारत-पाकमधील संबंध ताणले गेले असताना बुश प्रशासनाने दिल्ली व इस्लामाबादला आपला प्रतिनीधी पाठवून तणाव निवळण्याचा जरुर प्रयत्न केला होता. अमेरिकेने अशा प्रकारे थेट केलेला हा उभय देशातील पहिला हस्तशेप होता. आखाती युध्दाच्यावेळी त्यावेळी असलेल्या व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांच्या सरकारने अमेरिकन लढाऊ विमानांना मुंबईतून तेल भरण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी भारत सरकारने दिलेल्या या परवानगी बद्दल बरेच काहूर उठणे त्या काळात स्वाभाविकच होते. परंतु ही परवानगी मिळविल्याने बुश सरकारचा हा एक मोठा राजकीय विजय म्हटला गेला. अलिप्त राष्ट चळवळीचे एके काळी नेतृत्व करणार्‍या भारताने अशा प्रकारे अमेरिकन विमानांना परवानगी देणे चुकीचेच होते. परंतु त्यावेळी भारतात राजकीयदृष्ट्या दुबळ्या असलेल्या विरोधकांच्या सरकारकडून अमेरिकाविरोधी ठाम भूमिका घेणे अपेशीतच नव्हते. बुश सीआयएचे संचालक असताना तसेच अध्यशपदी असताना त्यांनी अनेक देशात थेट हस्तशेप केले. इराकवरील कारवाई ही त्यांच्या काळातील सर्वात काळीकुट्ट घटना ठरावी. सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यश मिखाईल गोर्बोचेव्ह यांच्यासोबत त्यांनी हस्तांदोलन करुन 91 साली शीतयुध्द संपविण्याचा केलेला करार ही दशकातील एक महत्वाची घटना ठरली. एवढा महत्वाचा करार करुनही त्यांचा लगेचच पुढच्या वर्षी 92 साली अध्यपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी कर कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. ते पाळले नाही, उलट करवाढ केली त्यामुळे अमेरिकन जनतेने त्यांना घरी बसवले. शेवटी त्यांना एकच टर्म सत्ता गाजविता आली. हे त्यांचे सर्वात मोठे अपयश. आपल्याकडे 50 वर्षे राज्य करण्याची घोषणा करणार्‍या भाजपाच्या सत्ताधार्‍यांनी हे उदाहरण जरुर पहावे व यातून बोध घ्यावा. बुश हे कुटुंबवस्तल अध्यश म्हणून ओळखले गेले. त्यांच्या पत्नी बार्बारा यांच्या समवेत तब्बल 73 वर्षे संसार केला. तसेच त्यांचा मुलगाही पुढे अमेरिकेचे अध्यश झाले. अशा प्रकारे बाप-मुलगा या पदावर पोहोचणारे ते दुसरे अध्यश. बुश यांच्या जाण्याने एका महत्वाच्या पर्वाचा अस्त झाला आहे.
----------------------+---------------

0 Response to "बुश पर्वाची अखेर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel