-->
संपादकीय पान शनिवार दि. २६ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पडद्याआड
---------------------------------
निवृत्तीचे वेध लागलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यावेळी कॉँग्रेसच्या प्रचार सभेत फारसे दिसलेे नव्हते. बहुदा त्यांना आता निवृत्तीचे वेध लागलेले असल्याने राजकारणातून त्यांनी अगोदरच निवृत्ती स्वीकारली असावी. त्याचबरोबर कॉँग्रेसजनांनाही समजून चुकले असावे की, डॉ. मनमोहनसिंग जर एखाद्या सभेस आले तर ते फारसा काही मतदारांवर प्रभाव पाडू शकणार नाहीत. कॉँग्रेसजनांच्या मते सोनिया गांधी व राहूल गांधी हे गर्दी खेचणारे नेते आहेत. त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षणही आहे. त्यांच्यामुळे मते मिळतात असे शंभर टक्केही म्हणता येणार नाही. परंतु आता सोनिया गांधी आजारी पडल्याने बहुदा कॉँग्रेसने सिंग यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला असावा. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देशभरात सुमारे ५० हून अधिक सभा घेतल्या होत्या. भारत-अमेरिका अणुकरार दरम्यान समर्थनाची भूमिका घेतल्यामुळे व शेतकर्‍यांंना कर्जमाफी केल्यामुळे देशभर त्यांची प्रतिमा उजळली होती. या प्रतिमेच्या जोरावर कॉंग्रेसला २०६ लोकसभा जागा मिळाल्या होत्या. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. मनमोहनसिंग कॉंग्रेसच्या प्रचारासाठी फारसे फिरताना दिसले नाहीत. पक्षानेही त्यांच्या सभांसाठी विशेष आग्रह धरलेला नाही. कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. मनमोहनसिंग यांच्या सभा घेण्यास उत्सुक नाहीत, अशीही कुजबुज होती. तरी त्यांच्या काही सभा आसाम व केरळमध्ये झाल्या आहेत. त्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता निवडणुकांच्या पुढच्या टप्प्यासाठी ते पक्षाचा प्रचार करण्यासाठी हैदराबाद येथे जाणार आहेत. स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती कॉंग्रेसच्या कार्यकाळात झाली, या मुद्द्यावर ते तेथे जोर देणार आहेत. डॉ. मनमोहनसिंग उत्तर प्रदेश व पंजाबमध्येही सभा घेणार आहेत. या सभाही निवडक ठिकाणीच असतील. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कारभाराबद्दल अधिक न बोलता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दंगलीमधील कथित सहभागावर आपला प्रचार केंद्रित केल्यामुळे डॉ. सिंग यांची कारकीर्दीवर फारशी चर्चाच झाली नाही. अखेरच्या काही टप्प्यांत डॉ. मनमोहनसिंग अमृतसर येथे सभा घेणार आहेत. फाळणीनंतर डॉ. सिंग यांचे कुटुंबीय अमृतसर येथे आले होते. या शहराच्या आठवणींना त्यांनी पुन्हा उजाळा द्यावा व अमरिंदरसिंग यांचा प्रचारही करावा यासाठी स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील होते. अमृतसरमध्ये सध्या कॉंग्रेस व भाजपमधील प्रचार स्थानिक शीख विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशा पातळीवर गेला असल्याने शीख मतदारांचा पाठिंबा डॉ. सिंग यांच्या सभेमुळे होईल, असे कॉंग्रेसला वाटते. तसेच या मतदारसंघात अरुण जेटली यांच्यासाठी मोदीही सभा घेणार असल्याने त्यांना प्रत्युत्तरही देता येईल, असा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु आता डॉ. सिंग यांनी कितीही सभा घेतल्या तरी यावेळी त्यांच्या सभांचा कॉँग्रेसला फारसा काही लाभ होईल असे वाटत नाही. डॉ. मनमोहनसिंग यांनी आता आपल्याला सुखाने निवृत्त जीवन जगायचे आहे असे गृहीत धरुन आपली योजना आखली आहे. सध्याच्या सरकारी निवासस्थानातून ते बहुदा निकाल लागण्यापूर्वीच बाहेर पडून स्वत:च्या खासगी निवासस्थानी हलणार असल्याची दिल्लीत चर्चा आहे. त्यामुळे अशा प्रकारे मनाने निवृत्त झालेल्या या खेळाडूला सभांमध्ये उतरवून कॉँग्रेस पक्षाला फारसा काही लाभ होईल असे वाटत नाही. गेल्यावेळीच २००९ साली खरे तर निवृत्त होण्याची तयारी ठेवली होती. मात्र गेल्यावेळी कॉँग्रेसला लॉटरी लागली आणि पुन्हा सत्ता आली. यावेळी मात्र ही शक्यता देखील नाही. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग आता दिल्लीच्या राजकीय पटलावरुन दूर होणार हे नक्की.
----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel