-->
संपादकीय पान शनिवार दि. १० मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
संपत चाललेली खिलाडूवृत्ती
------------------------------------
कोणत्याही खेळाला ज्यावेळी युध्दभूमीचे स्वरुप येते त्यावेळी तो खेळ राहात नाही. खेळ मग क्रिकेट असो किंवा कबड्डी किंवा बुध्दीबळासारखा बसून खेळावयाचा असो त्यात खिलाडूवृत्ती जोपर्यंत जोपासली जाते तोपर्यंत त्या खेळात मरा उरते. मात्र खिलाडूवृत्ती ज्यावेळी संपते आणि खेळाडू हमरीतुमरीवर येतात त्यावेळी मात्र खेळातील खर्‍या अर्थाने चार्म संपतो. क्रिकेटमधील खिलाडूवृतीत तर कधीच संपली ाहे. कारण या खेळात व्यवसायिकतेने पाऊल टाकले आहे. अलीकडेच
आयपीएल स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिशेल स्टार्कने, फलंदाज क्रीझमध्ये नसतानाही रागाने चेंडू टाकला तर प्रत्युत्तरादाखल फलंदाज पोलॉर्डने बॅट गोलंदाजाच्या दिशेने भिरकावली. क्रिकेटमध्ये शाब्दिक चकमकींचे प्रसंग वारंवार घडतात. मात्र, शरीरवेधी हल्ले होतात त्या वेळी या खेळाचा अध:पात होत असल्याची जाणीव व्हायला लागते. बॉक्सिंगसारख्या खेळात तर एकमेकांच्या अवयवाचे लचके तोडण्यापर्यंत मजल जाते. तेथे अर्वाच्य भाषेतील शेरेबाजी, शिव्या आणि आदळआपट फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. जावेद मियॉंदाद आणि डेनिस लिली यांच्यातील मारामारीचा क्षण जेव्हा तमाम विश्वाने पाहिला होता. या घटनेनंतरही चार दशकांनी क्रिकेटची प्रतिमा सद्गृहस्थांचा खेळ अशी बर्‍यापैकी टिकून राहिली. डेनिस लिलीने लाथ मारल्यानंतर जावेद मियॉंदादने डेनिस लिलीला मारण्यासाठी बॅट उगारली होती. पंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत झिनेदिन झिदानसारख्या खेळाडूचा हल्ला रोखण्यात पंच अपयशी ठरले होते. सुदैवाने क्रिकेटमध्ये खेळाडूंचे एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत अजून तरी मजल गेलेली नाही. मात्र, खेळाडूंमधील प्रकरणे हातघाईवर आल्याची अनेक उदाहरणे सापडतात. ऑस्ट्रेलियन खेळाडू जेव्हा शेरेबाजी करताना काही मर्यादा ओलांडतात त्या वेळी संघर्षाचे अधिक प्रसंग उद्भवतात. खेळाडूंच्या शारीरिक व्यंगावरून किंवा आकारावर अनेकदा शेरेबाजी होते. त्या शेरेबाजावर चिडून न जाता हसतखेळत प्रत्युत्तर दिल्यानंतर प्रकरण चिघळत नाही. स्टीव्ह वॉ आपली अखेरची कसोटी खेळत असताना भारताचा कुमार यष्टिरक्षक पार्थिव पटेल यष्टीमागून ओरडला,स्टीव्ह, क्रिकेट सोडण्याआधी तुझा एक पॉप्युलर स्लॉग स्वीप शॉट होऊ दे! त्यावर रागाने मागे वळून स्टीव्ह वॉ म्हणाला होता, वडीलधार्‍यांंचा आदर कसा करायचा ते आधी शीक. मी कसोटी पदार्पण केले तेव्हा तू रांगत होतास. त्यावर प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने ड्रेसिंग रूममध्ये पार्थिव पटेलला लहान मुलाचा गणवेश घालून तयार केले होते. अशा शेरेबाजी आणि प्रत्युत्तरांनी क्रिकेटच्या रंगाचा बेरंग केला नाही. विरंगुळा म्हणून अशा प्रसंगांकडे खेळाडू, क्रिकेट प्रशासक आणि प्रेक्षकांनी पाहिले. मात्र सध्याच्या अतिस्पर्धात्मक युगात ही शेरेबाजी उग्र स्वरूप धारण करण्याचा धोका आहे. जोपर्यंत या शेरेबाजीचे स्वरूप विनोदापुरते मर्यादित राहते तोपर्यंत संघर्ष होत नाही. मात्र, खिलाडूवृत्तीपेक्षाही यशस्वी होण्यासाठीची हाव सध्या वाढल्यामुळे क्रिकेटमधील संघर्षाचे हे क्षण नियम आणि नीतिमत्तेची सीमारेषा कधी ओलांडतील हे सांगता येत नाही. टेलिव्हिजन प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या या युगात अनेक क्रीडाप्रकारांमध्ये वेगवेगळ्या युक्त्या आणि कल्पना राबवल्या जात आहेत. क्रिकेट या खेळाच्या मूळ संकल्पनेत आणि व्याख्येमध्ये न बसणार्‍या चिअर गर्ल्स, मूव्हिंग कॅमेरे, स्टम्प व्हिजन, स्टम्प मायक्रोफोन, खेळाडूच्या तोंडाजवळ मायक्रोफोन ठेवणे आदी प्रयोगही करून पाहिले गेले. दोन षटकांच्या मधल्या वेळेत पॉप व रॉक संगीताच्या कर्णकर्कश आवाजात क्रिकेट या खेळापेक्षाही करमणूक या संकल्पनेचाच अधिक विकास करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ कुस्त्यांप्रमाणे आयपीएलमध्ये आणखी नाटकीपणा जोडण्याची गरज आयोजकांना भासली नाही. त्यामुळेच आतापर्यंत श्रीशांत-हरभजन यांच्यातील संघर्षासारखे फारसे प्रसंग उद्भवले नाहीत. एकूणच काय खेळांमधली खिलाडूवृत्ती संपत चालली आहे.
---------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel