इस्त्रोची सेंच्युरी
बुधवार दि. 17 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख-
------------------------------------------------
इस्त्रोची सेंच्युरी
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) स्वदेशी बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपणाची नुकतीच सेंच्युरी पूर्ण केली. आजवर इस्त्रोने अनेक विक्रम केले व आपली यशाची पताका सतत झळकत ठेवली. अंतराळ संशोधनात इस्त्रोने अनेक महत्वाचे पल्ले पार केले आहेत, त्यातील हा एक मैलाचा पल्ला ठरावा. याबाबत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन सर्वात प्रथम केले पाहिजेत. काही महिन्यांपूर्वी इस्त्रोला अपयश आले होते, मात्र त्यातूनही सावरुन इस्त्रोच्या संशोधकांनी पुन्हा एकदा उत्तुंग भराऱी घेतली आहे. भारताचा व पूर्णपणे देशात बनविलेला शंभरावा उपग्रह असलेला कार्टोसॅट-2 मुळे स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीला अधिक बळ मिळणार आहे. लष्करी आणि नागरी अशा दोन्ही सेवांसाठी हा उपग्रह वापरण्यात येऊ शकेल. भारताचा अवकाशातील डोळा म्हणून हे उपग्रह काम करीत असतात. या उपग्रहामुळे 500 किलोमीटर अंतरावरून सीमाभागात भागात नेमके किती शत्रू सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात आहेत, याचीही माहिती मिळू शकणार आहे. इस्त्रोने याआधी एकाच वेळी 104 उपग्रह सोडण्याची विक्रमी कामगिरी पार पाडली आहे. भारताची अवकाश संशोधनाची तरतूद सुमारे चार अब्ज डॉलर आहे. जपान, जर्मनी, इटली आणि चीनची अवकाश संशोधनाची तरतूद यापेक्षा जास्त आहे. शास्त्रज्ञांच्या संख्येची तुलना करायची झाली तर इस्रोकडे केवळ 16 शास्त्रज्ञ आहेत, तर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाकडे साडेसतरा हजार व रशियाकडे सुमारे 24 हजार शास्त्रज्ञांना ताफा आहे. भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी केली होती. अमेरिकेला पहिली मंगळमोहीम यशस्वी करण्यासाठी पाच आणि रशियाला आठ प्रयत्न लागले होते. त्याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेच्या मंगळ मोहिनेच्या एकूण खर्चापेक्षा अर्ध्या किंमतीत ही मोहिम भारतीय शास्त्रज्ञांनी पार पाडली आहे.
आता या मोहिमेला आणखी बळ लाभणार आहे. गेल्या वर्षी इस्त्रोने अवकाशात एकाचवेळी भारतीय उपग्रह कार्टोसेट-2 डीसह 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करुन विश्वविक्रम केला होता. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रातील स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या मदतीने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या मिशनमध्ये भारताच्या तीन आणि अमेरिकेतील खासगी संस्थेच्या 96 उपग्रहांचा समावेश होता. याशिवाय इस्त्राइल, कझागिस्तान, नेदरलंड स्विर्त्झलंड आणि यूएईचा प्रत्येकी एक उपग्रह यात होता. यापूर्वी रशियाने 37 उपग्रह एकावेळी प्रक्षेपित करून विक्रम स्थापित केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या नासाने 29 उपग्रह एकावेळी प्रक्षेपित केले होते. मात्र आता भारताने या सर्वांचा विक्रम मोडून 104 उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा एक नवा विक्रम केला. भारताने उपग्रह स्वबळावर अवकाशात सोडण्याचे तंत्रज्ञान विकसीत करुन आता त्याला दोन दशकाहून जास्त काळ लोटला आहे. त्यानंतर यात सुधारणा करीत इस्त्रोने यात उत्तंग भरारी मारली आहे. पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपणाचा खर्च 100 कोटी रूपये आहे. इस्त्रोनेे या उपग्रहांंसाठी 200 कोटी रूपयांचा करार केला होता, त्यामुळे जवळपास 100 कोटींची बचत झाली. एकूण वार्षिक नफ्याच्या ही 50% रक्कम होती. आजवर एकाच वेळेस 100 उपग्रह प्रक्षेपित करण्याचे धाडस जगातील कोणत्याच देशाने केलेले नाही. उपग्रह लहान असो वा सुक्ष्म. पण त्याला त्याच्या कक्षेत स्थापन करणे हे खूप कठीण असते. पी. एस. एल. व्ही.ने आपल्या उदरातून 101 उपग्रह अवघ्या 600 सेकंदात प्रक्षेपित केले. तब्बल 27000 किमी प्रति तास म्हणजे एखाद्या विमानाच्या 40 पट वेगाने प्रवास करताना हे सगळे उपग्रह एकमेकांना टक्कर होऊ न देता प्रक्षेपित करणे किती गुंतागुंतीच आणि किती कौशल्य त्यात लागू शकते ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. परंतु इस्त्रोने ही अवघड बाब शक्य करुन दाखविली आहे. आता मंगळ मोहीमेच्या पाठोपाठ आता दुसरी मोहीम शुक्राची हाती घेण्यात येणार आहे. शुक्र या ग्रहाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. यासाठी नासाचे एक शिष्टमंडळ भारताच्या दौर्यावर येऊन गेले होते व त्यांनी या मोहिमेबाबत भारताशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या या वाढत्या दबदब्यामुळे अमेरिकेतील अनेक प्रक्षेपण करणारे खासगी उद्योजक चिंतेत पडले आहेत. कारण त्यांच्या अत्यधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही इस्राकडून घेण्यात येणारा उपग्रह प्रक्षेपण खर्च निम्म्याहून कमी आहे. ज्या पद्धतीने इस्रो एकामागून एक वेगळ्या मोहिमा आखत आहे त्यातून तब्बल 135 बिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या बाजारपेठेतील भारताचा हिस्सा झपाट्याने वाढतो आहे. आजच्या मोहिमेतून अर्धा खर्च आधीच प्रक्षेपणातून इस्रोने वसूल केला आहे. ह्यामुळे राष्ट्रीय संपत्तीची खूप मोठी बचत झाली आहे. आता या घटनेमुळे इस्त्रोमध्ये एक नवा विश्वास, उत्साह व नव्या जोमाने काम करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. इस्त्रो भविष्यात असे अनेक उपक्रम हाती घेऊल व देशाचे नाव जगात या क्षेत्रात अग्रस्थानी नेऊन ठेवेल यात काहीच शंका नाही.
--------------------------------------------------------------

0 Response to "इस्त्रोची सेंच्युरी"
टिप्पणी पोस्ट करा