-->
संपादकीय पान मंगळवार दि. १५ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
संजय बारु यांच्या नजरेतून डॉ. मनमोहनसिंग 
---------------------------------
विद्यमान पंतप्रधान व निवृत्तीच्या वाटेवर असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांना कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे सरकार चालवण्यात अडचणी येत होत्या असा आरोप पंतप्रधानांचे माजी प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांनी केला आहे. संजय बारू यांनी लिहिलेल्या द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर द मेकिंग ऍण्ड अनमेकिंग ऑफ़ मनमोहन सिंह या पुस्तकातून पंतप्रधान कशाप्रकारे कॉंग्रेस श्रेष्ठींना शरण गेले होते, या सगळ्याचा परिणाम मनमोहन सरकारच्या निर्णयक्षमतेवर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयातील आपल्या काही सहकार्‍यांंशी बोलताना मनमोहनसिंह यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला असल्याची भावना व्यक्त केली होती. संजय बारू यांनी मागील आठवड्यातच आपल्या या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना पाठविली होती. तसेच पुस्तकाच्या प्रतीबरोबर पाठविलेल्या संदेशात २००९सालातील काही घटनांमुळे आपल्यालासुद्धा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले. मनमोहनसिंह यांनी सरकार चालवताना घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये सोनिया गांधींकडून कशाप्रकारे हस्तक्षेप केला जात होता या सगळ्यावर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. अणुकरारासारखे काही मुदद्दे वगळता अन्य गोष्टींबाबत निर्णय घेताना मनमोहनसिंहाना निर्णय स्वातंत्र्य दिले जात नव्हते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर ते अक्षरक्ष: नतमस्तक झाले होते. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांचे श्रेय राहुल गांधी यांना दिले जात असल्याचेसुद्धा या पुस्तकात संजय बारू यांनी म्हटले आहे. संजय बारु हे एकेकाळी पत्रकार होते व आपली इंग्रजी वृत्तपत्रातील संपादकपदाची नोकरी सोडून डॉ. मनमोहनसिंग यांच्या वैयक्तीक मैत्रीपोटी पंतप्रधानांचे प्रसिध्दी प्रमुख म्हणून दाखल झाले होते. संजय बारु हे आर्थिक पत्रकारितेत असल्याने त्यांचे डॉ. मनमोहनसिंग रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्यापासून चांगले संबंध होते. त्यामुळे बारु हे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना केवळ त्यांचे प्रसिध्दी प्रमुख म्हणून काम करीत असल्यापासून ओळखत नव्हते तर त्यापूर्वीपासून त्यांचा चांगलेच ओळखत होते. मनमोहनसिंग यांचा शांत व अभ्यासू वृत्तीचा त्यांनी अनुभव घेतलेला होता. सहसा मनमोहनसिंग हे कुणाशी भांडण करण्यात वा वाद उकरुन काढण्यास कधीच इच्छुक नव्हते. अर्थमंत्री म्हणून त्यांना पी.व्ही. नरसिंहरावांनी देश आर्थिक संकटात असताना आमंत्रित केले. तोपर्यंत देशाच्या अर्थमंत्रीपदी बहुतांशी वेळा राजकारणी व्यक्तीच होती. मनमोहनसिंगांनी आपल्या विचारांशी प्रमाणिक राहात व राजकारणापासून अलिप्त रहात अर्थमंत्री म्हणून काम केले. देशात उदारीकरणाची पायाभरणी ही त्यांनीच केली. तत्यांच्यावर अनेकांनी त्यावेळी वर्ल्ड बँकेचे एजंट अशी टीका केली परंतु अगदी निश्‍चलपणे ते आपले काम करीत होते. त्यानंतर २००९ साली देखील सोनिया गांधीनी पंतप्रधानपद नाकारुन निर्माण झालेल्या एका अपवादात्मक परिस्थितीत डॉ. मनमोहनसिंग यांनी हे पद स्वीकारले. त्यावेळी प्रणब मुखर्जींपासून ते अनेक दिग्गज कॉँग्रेसच्या नेत्यांची नाराजी स्वीकारुन सोनिया गांधींनी हे पद त्यांना दिले. डॉ. मनमोहनसिंग यांना हे पद देण्यामागे सोनिया गांधींचा उद्देश हाच होता की, या जागी बसलेला माणूस हा कॉँग्रेस अध्यक्षाच्या मर्जीतला हवा, त्याने आपले एैकले पाहिजे. सोनिया गांधींच्या दृष्टीकोनातून ही बाब काही चुकीची नव्हती. मनमोहनसिंग यांच्या शांत व अभ्यासू स्वभावाची सोनिया गांधींना पूर्ण कल्पना होती. त्याचबरोबर त्यांच्याकडे आणखी एक गुण होता तो म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा. रिझर्व्ह बँकेतील सर्वोच्च पद उपभोगूनही त्यांनी कोणत्याही उद्योगसमूहाचा आपल्यावर शिक्का मारुन घेतला नव्हता. मनमोहनसिंग यांनी आपल्याला हे पद केवळ सोनियां गांधींमुळे मिळाले आहे आणि आपण त्याचे पक्षांचे आदेश म्हणून एैकले पाहिजे अशी समजूत करुन त्यांच्याशी कधीच पंगा घेतला नाही. अर्थात ते तसे करतील असेही शक्य नव्हते. एक तर ते काही मास लिडर्स नव्हते. त्यांना राज्यसभेत पाठविण्याची वेळ कॉँग्रेसवर आली होती. बारु यांनी या पुस्तकात फारसे काही नवीन सांगितलेले नाही. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना वाकविले किंवा शरण गेले असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारम वेळ आलीच असती तरी डॉ. सिंग यांच्याकडे सोनियांच्या विरोधात सर्ंष करण्याची ताकद नव्हती. त्यांना जनमानसात कुणी समर्थक नव्हते तर त्यांना पक्षातही फारसे कुणी समर्थक नव्हते. ते ज्या पदावर गेली दहा वर्षे होते ते केवळ सोनिया गांधींमुळेच होते. याची सर्व कल्पना मनमोहनसिंग यांना होती. त्यामुळे त्यांनी कधीही संघर्ष न करता मुकाट्याने सोनियांचे एैकून घेऊन काम केले. हे वास्तव बारु यांना एक पत्रकार म्हणून व त्यांच्या सोबत काम केलेले असल्याने त्यांना सुध्दा माहित होते. असे असूनसुध्दा त्यांनी या पुस्तकात काय नवीन मांडले असा प्रश्‍न निर्माण होतो. प्रामुख्याने कॉँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत पराभव दृष्टीक्षेपात असताना त्यांनी हे पुस्तक लिहिणे म्हणजे कॉँग्रेस विरोधक प्रामुख्याने भाजपाकडून सुपारी घेतली असण्याची शंका व्यक्त होऊ शकते. तसेच पंतप्रधानासारख्या एकेकाळी सल्लागार असणार्‍या व्यक्तीने एक संकेत म्हणून अशा प्रकारच्या आठवणी किमान वीस वर्षे लिहू नयेत असा एक जगात संकेत आहे. असे असताना देखील बारु यांनी पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी फारसे काही नवीन सांगितलेले नाही. इतिहासाच्या एका कप्प्यात याची नोंद जरुर होईल एवढेच.
-----------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel