संपादकीय पान सोमवार दि. ७ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-----------------------------------------------
करोडपती विरुध्द रोडपती
---------------------------
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नॅशनालिस्ट कॉँग्रेस पार्टी (एन.सी.पी.)चे उमेदवार असलेल्या सुनिल तटकरे यांना त्यांचेच नाव व आडनाव असलेल्या एका सामान्य वडापाव विकणार्या माणसाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आव्हान एखाद्या तत्वासाठी द्यावे यातच एन.सी.पी.च्या तटकरेंचा नैतिक पराभव ठरावा. शरद पवारसाहेबांनी सोनिया गांधीच्या विदेशी मुद्याचा प्रश्न उपस्थित करीत आपल्या पक्षाची वेगळी चूल मांडली. त्यात त्यांना कॉँग्रेस शब्द हवा होताच. तसेच आपण राष्ट्रवादी म्हणजे नॅशनालिस्ट आहोत (म्हणजे सोनिया गांधींना विरोध) असेही दाखवायचे होते. त्यासाठी त्यांनी नॅशनालिस्ट कॉँग्रेस पार्टीची देशव्यापी (?) म्हणजे खरे तर महाराष्ट्रापुरतीच स्थापना केली. पवारसाहेबांशी एकनिष्ठ असलेले त्यावेळचे कॉँग्रेसजन या दिंडीत सामिल झाले. शेवटी ज्या पक्षाला विरोध केला व त्याच्यापासून वेगळी चूल मांडली त्यांच्याशीच सत्तेची चूल मांडली. अशा या एन.सी.पी.चे भाषांतर म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अशी सर्वांचीच समजूत होती. परंतु ही समजूत निवडणूक आयोगाने खोटी ठरविली आणि ठाण्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. अशा या राष्ट्रवादीने रायगड जिल्ह्यातून आपला उमेदवार सुनिल तटकरे उभा करावा हा एक योगायोग नव्हे. कारण राष्ट्रवादीचा हा उमेदवार सुनिल तटकरे काही जमीनी लाटलेल्या करोडपती तटकरेप्रमाणे नाही. तर तो एक मुंबईतील उपनगर असलेल्या मीरारोड येथे वडापाव विकून आपला उदरनिर्वाह करतो. मुळचा श्रीवर्धन तालुक्यातील रहिवासी असलेला हा सुनिल तटकरे काबाडकष्ट करण्यासाठी मुंबईस गेला व तेथे त्याने वडापावचा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. यातून तो शहरात चांगला स्थिरवला. असे असले तरी आपण ज्या मातीत जन्मलो त्या रायगड जिल्ह्याला व तो ज्या समाजाचा आहे त्या गवळी समाजाला विसरला नाही. आज रायगड जिल्ह्यात शेतकर्यांच्या जमिनी पालकमंत्र्यांकडूनच लुबाडल्या जात आहेत. खरे तर पालमंत्र्यांनी पालकांसारखे वागून येथील जनतेचे, शेतकर्यांचे हित साधणे गरजेच असताना कुंपणच शेत खाते या म्हणीप्रमाणे पालकमंत्रीच शेतकर्यांना देशोधडीला लावण्यास प्रारंभ केल्यावर आपण याविरुध्द आवाज उठविला पाहिजे, लोकशाहीच्या माध्यमातून आपण याचा निषेध करुन लोकांमध्ये जागृती केली पाहिजे असे लक्षात घेऊन वडापाव विकणार्या या सर्वसामान्य रोडपती माणसाने करोडपती उमेदवाराशी टक्कर देण्याचे ठरविले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी हा काही निव्वळ योगायोग नाही. तर नियतीने आपल्याकडील लोकशाही कशी आहे हे सागंण्याचा केलेला प्रयत्न आहे. आपल्याकडे धनशक्ती विरुध्द श्रमशक्तीचा नेहमीच मुकाबला झाला आहे. आता रायगडातही करोडपती विरुध्द रोडपती असा सामना रंगणार आहे. अशा या लढ्यामध्ये धनशक्तीचा नेहमीच पाडाव झाला आहे अशी इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. वडापाव विकणार्या या तटकरेंच्या सोबत उमेदवारी अर्ज भरावयास आलेल्या तरुणांमध्ये एक वेगळा जोश होता. यातील बहुसंख्य लोक श्रीवर्धनमधील गवळी समाजाचे होते. आपल्याला जमिनी हिसकावून घेतल्याचे शल्य त्यांच्याकडे होते. आपल्याच माणसाने आपल्या जमीनी लाटल्याचे दु:ख त्यांना वाटणे सहाजिकच आहे. याविरुध्द आपण लोकशाही मार्गाने लढा द्यावयाचा असेल तर मतपेटीचा आधार घेऊन ही लढाई लढावी अशी ठाम समजून झाल्याने ही निवडणूक लढविली जाते आहे. श्रीवर्धनचा रहिवासी असलेला हा वडापाव विकणारा तटकरे पेटून उठला आहे त्याच भूमीत आज अनेक जणांना रोजगार नसल्याने मुंबईची वाट धरावी लागली आहे. हाच जर रोजगार त्यांना आपल्या तालुक्यात मिळाला असता तर त्यांना आपले कुटुंब घरी ठेवून मुंबईची वाट धरावी लागली नसती. असे या जिल्ह्यात हजारो लोक आहेत. पालकमंत्री म्हणून तटकरे यांनी जर येथे उद्योगधंदे आणले असते तर येथील तरुणांच्या हाताला काम मिळाले असते आणि त्यांना मुंबईला रोजगारासाठी जाण्याची गरज राहिली नसती. परंतु जिल्ह्यात रोजगार निर्माण व्हावा, येथील शेतकर्यांनी आपल्या जमीनीतून नवीन पिके घ्यावीत यासाठी तटकरेंनी काहीच केले नाही. विकासाच्या योजना नाहीत, अनेक पाटबंधारे प्रकल्प अर्ध्यावर सोडून दिलेले, त्या प्रकल्पांसाठी आलेले पैैसे हडप करण्यात समाधान मानणार्या या पालमंत्र्यांना यावेळी जनता धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही. एक सर्वसामान्य रोडपती माणूस त्यांच्याविरुध्द पेटून उठून उमेदवारी अर्ज भरतो यात बरेच काही आले. एकूणच पाहता यावेळची निवडणूक ही तटकरेंसाठी दिल्लीत जाण्यासाठी नाही तर घरी बसण्यासाठी आहे. ज्यावेळी जनता पेटून उठते त्यावेळी क्रांतीचा बिगु फंकला जातो. छत्रपती शिवाजी महाराज व सी.डी. देशमुख यांच्यासारख्या महान नेत्यांचे जन्मस्थान असलेल्या या भूमीतील जनता फार काळ अन्याय सहन करीत नाही. पालकमंत्र्यांनी आता भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. यातूनच जनता त्यांच्या विरोधात गेली आहे. परंतु सत्तेची धुंदी असलेल्या या नेत्यांना आपल्याला भोवती असलेले भाट जी स्तुतीसुमने आवळत असतात त्याचेच कौतुक वाटते आणि जनतेच्या मनातील रोष समजत नाही. आज तटकरेंचे असेच झाले आहे. आपल्याविरोधात असलेल्या लोकांच्या रोषाची त्यांना कल्पना नाही. रोडपती तटकरे कसलीही तमा न बाळगता त्यांच्या विरोधात उभा राहतो यातच त्यांचा पराभवाची बिजे रोवली गेली आहेत.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा