-->
बदलत्या जीवनशैलीचे रोग

बदलत्या जीवनशैलीचे रोग

संपादकीय पान शनिवार दि. ९ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बदलत्या जीवनशैलीचे रोग
अनुवंशिकता, बदलत्या जीवनशैलीबरोबरच वाढते प्रदूषण यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे संशोधनातून स्पष्ट असून बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्च या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, २०१४-१५ या वर्षात भारतात सात कोटी लोकांमध्ये मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आढळली होती, तर सहा कोटी लोकांना मधुमेह जडला होता. मधुमेहींच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. अर्थात आपली लोकसंख्या मोठी असल्यामुळे ही संख्या जास्त वाटते. परंतु हा रोग झपाट्याने वाढत असून २०३०पर्यंत भारत मधुमेहींची राजधानी बनेल, अशी शक्यता डॉक्टर मंडली व्यक्त करतात. वाढत्या प्रदूषणामुळे मधुमेहाच्या रुग्णांवर किंवा साखर नियंत्रणावर नेमका कोणता परिणाम होतो, यासंदर्भात मेट्रोपॉलिस हेल्थकेअर या संस्थेच्या वतीने अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणात मेट्रोपॉलिस हेल्थकेअर संस्थेने एक लाख ६५९ रुग्णांचा अभ्यास केला. यात रुग्णाच्या घराजवळील प्रदूषणाची पातळी व रक्तातील साखरेची मात्रा किती आहे? हे तपासून पाहण्यात आले. त्यावेळी हवेतील प्रदूषण अधिक असणार्‍या भागात राहणार्‍या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे नियंत्रण सुटते व मधुमेह वाढत जातो. हवेच्या प्रदूषणात धुळीचे कण व दूषित वायूचा समावेश असतो. हवेतील धूलिकण मधुमेह वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने शरीरातील इन्शुलिन वापरता येत नाही. त्यामुळे मधुमेह वाढतो. मधुमेहाचा आजार असलेल्यांमध्ये साखर वाढतेच. पण मधुमेहाने त्रस्त नसलेल्यांनाही प्रदूषणामुळे मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. २० ते ८० वर्षे वयोगटातील एकूण १ लाख ६५९ जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची केलेल्या तपासणीतून २१,५२० जणांना मधुमेह झाल्याचे निदान झाले. तर एकूण २० हजार १८० नमुन्यांमध्ये मधुमेहपूर्व स्थिती आढळली आहे. एस.बीआयचे जनरल एन्शुरन्सकडे दाखल होणार्‍या दाव्याच्या तपशीलानुसार मधुमेहाचे ६४ टक्के पुरूष तर ३४ टक्के महिला असतात. आपल्याकडील जीवनशैली मग ती शहरातील असो की ग्रामीण भागातील झपाट्याने बदलत चालली आहे. जंक फूडचा वापर खाण्यातून वाढल्यामुळे अनेक रोग बळावत चालले आहेत. लहान मुलांना मैदानी खेळाऐवजी घरात बैठे खेळ खेलण्याकडे किंवा तासन तास संगणक किंवा टी.व्ही बघण्याकडे कल वाढत चालला आहे. अशा या जीनवशैलींमुळे मधुमेहासारखे रोग लहान वयातच जडावतात. यावर उपाय म्हणून आपल्याला आपली जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "बदलत्या जीवनशैलीचे रोग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel