-->
संपादकीय पान बुधवार दि. २३ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
रमेश कदमांचे पारडे जड
------------------------------
रायगड लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांचे आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पारडे जड झाले आहे. विद्यमान पालकमंत्री सुनिल तटकरे व विद्यमान खासदार अनंत गिते यांच्या विरोधात टक्कर देताना रमेश कदम यांच्या नाकीनऊ येणार असे चित्र सुरुवातीपासून रंगविले जात होते. परंतु कॉँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजपा यांच्या उमेदवारांना आता पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे. रायगड जिल्ह्यात शेकापची सुमारे अडीज लाख मते आहेत. ही मते खास शेकापचीच आहेत. म्हणजे ती पक्षाची निष्ठावान मते आहेत. उमेदवार कोणही असो, शेकापच्या कपबशीवर जो उभा राहाणार त्याला त्याच्या पदरात ही मते पडणारच असे हे नेहमीचेच गणित आहे. विघ्यमान खासदार अनंत गिते यांनी गेल्या पाच वर्षात आपले तोंड मतदारांना दाखविलेच नाही. आपले खासदार कोण असा प्रश्‍न मतदारांना पडला होता. त्यामुळे मतदारांची त्यांच्याबाजूने स्पष्टपणे नाराजी होती. तसेच सुनिल तटकरे यांनी केलेला २५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पाहता पुन्हा या भ्रष्टाचारी माणसाला का निवडून घ्यायचे असा प्रश्‍न रायगडवासियांना पडला आहे. सुनिल तटकरे यांच्यावरील प्रसिध्द झालेली त्यांच्या भ्रष्टाचारावरील श्‍वेतपत्रिकेमुळे सर्व जनतेला वास्तव समजले. आम्ही या श्‍वेतपत्रिकेतील बहुतांशी भाग लोकांना वास्तव समजावे या हेतूने छापला आणि आमच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले. रायगडच्या जनतेपुढे वास्तव खुले केल्याबद्दल कृषीवलच्या कार्यालयात अभिनंदनाचा वर्षाव करणारे फोन खणखणत आहेत. सध्याच्या पेड न्यूजच्या काळात अशा प्रकारे वास्तव जनतेपुढे येणे ही बाब दुर्मीळ झाली आहे. ही बाब आम्ही जनतेपुढे आणली. त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरल्यावरच आपण जिंकलो या थाटात वावरणारे सुुनिल तटकरे यांचे विमान धाडकन जमिनीवर कोसळले आणि आता त्यांच्या बाजूने विरोधात जनमत गेले आहे. एकीकडे कुटुंबात सुरु झालेला कलह (याची विशेष बातमी कालच्या अंकात केवळ आम्हीच प्रसिध्द केली आहे.) तर कार्यकर्त्यांमधील नाराजी यामुळे तटकरे यांच्या बाजूने राहाणार्‍यां कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तटकरे यांनी खरे तर आपण पालकमंत्री व जलसंपदामंत्री म्हणून कोणती कामे केली याची जंत्री प्रसिध्द करावी. आम्हाला खात्री आहे की ते पूर्ण झालेल्या अशा ठोस दहा कामांची यादी ते सादर करु शकणार नाहीत. आजच्याच अंकात त्यांनी भूमीपूजन केलेली व पूर्ण काम न झालेल्या काही कामांची छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत. ही केवळ उदाहरेण म्हणून आम्ही नाममात्र कामे प्रसिद्द केली आहेत. अशी अनेक कामे दाखविता येतील. खरे तर सलग एक तप एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यावर त्या विभागाचा विकास झपाट्याने करणे शक्य आहे. परंतु रायगडमध्ये उलटेच झाले आहे. जेवढा जास्त काळ तटकरेसाहेब इकडे पालकमंत्री म्हणून राहिले आहेत तेवढ्या जास्त प्रमाणात त्यांचा भ्रष्टाचार वाढत चालला आहे. जिल्ह्याच्या विकासाची अनेक चांगली कामे करुन दाखविण्याची संधी तटकरे यांनी गमावली आहे. हे वास्तव आता रायगडातील जनतेला समजले आहे. त्यामुळेच यावेळी तटकरे यांच्या बाजूने जनमताचा कौल लागणार नाही. अर्थातच त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर राहिल. एक ङतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विस्तार करीत असताना कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावल्याने त्यांनी आघाडीची धर्म पाळलेला नाही. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यातच बॅ. अंतुलेंनी जाहीर पाठिंबा शेकापचे उमेदवार रमेश कदम यांना दिल्याने कॉँग्रेसमधील अंतुले समर्थकांचा एक गट एकगठ्ठा मतदान कदम यांना करणार हे नक्की आहे. अंतुले यांचे समर्थक केवळ मुस्लिम समाजातच आहेत असे नव्हे तर सर्व जाती धर्मांमध्ये आहेत. अंतुलेंनी त्यांची कामे वेळोवेळी सत्तेत असताना केली आहेत, विविध योजना आणल्या, विकासाची गंगा जनतेपर्यंत कशी पोहोचेल हे पाहिले आहे, याची जाण अतुंले समर्थकांना आहे. त्यामुळे अंतुलेंचा आदेश शिरसावंध्य मानून ता मतदार शेकापला मतदान करेल. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा शेकापच्या उमेदवारांना लाभल्याने कदम यांचे बळ वाढले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाडमध्ये घेतलेल्या सभेमुळे सर्व वातावरण बदलले आहे. त्याचच रमेश कदम यांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू म्हणजे शिवसेनेने प्रचारापासून अलिप्त केलेले रत्नागिरीतील धडाडीचे नेते व शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले गेलेले रामदास कदम यांनी छुपा पाठिंबा रमेश कदम यांना दिला आहे. शिवसेनेमध्ये रामदासभाईंची घुसमट होत आहे. अर्थात सेनेचे नेतृत्व व गिते त्यांना डोके वर काढायला देत नाही. अशा वेळी सध्यातरी शांतपणे बसून कदमांना सहकार्य करण्याचे धीमे चलो धोरण रामदासभाईंनी अवलंबिले आहे. या सर्व जमेच्या बाजू असल्यामुळे रमेश कदम यांचे पारडे चांगलेच जड झाले आहे. शेकापची पारंपारिक मते, मनसेची मते, अंतुलेसमर्थकांची मते व रामदासभाईंची मते हे सर्व गणित पाहता रमेश कदम हेच विजयी होणार अशी रायगडात आज चर्चा सुरु आहे. शेकापचा लाल बावटा हाती घेऊन यावेळी रमेश कदम व लक्ष्मण जगताप असे दोघे खंदे वीर यावेळी संसदेत धडका देणार आहेत.
-----------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel