-->
संपादकीय पान गुरुवार दि. २४ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
मतदानाला चला; राजकीय प्रगल्भता वाढण्याची गरज
--------------------------------
सोळाव्या लोकसभेसाठी देशात मतदाराने मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला हक्क बजावला आहेे. अत्यंत रखरखत्या उन्हातही रांगा लावून मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदान व त्याचे प्रमाण उत्तम आहे, पण तिसर्‍या टप्प्यात हे प्रमाण थोडे घटले आहे. महाराष्ट्रात एकूण तीन टप्प्यांत या वेळी मतदार मतदान करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तिसर्‍या टप्प्याचे मतदान २४ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्रात १९ मतदारसंघांत होणार आहे. यात शहरी मतदानाचे प्रमाण जास्त आहे. उच्च मध्यमवर्गीय, उच्चभ्रू वर्ग व झोपडपट्टीत राहणारा, मध्यमवर्गीय अशा सर्व स्तरांतील मतदार मतदान करणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत मतदानाचे प्रमाण चांगले होते. महाराष्ट्रातले ६० ते ६५ टक्क्‌यांच्या दरम्यान होते.
गेल्या सहा दशकांत मतदानाचे प्रमाण क्वचितच एवढे वाढले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, आणीबाणी संपल्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा म्हणजेच १९७७ मध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. त्यानंतर १९८९ व १९९१ मध्ये प्रमाण बर्‍यापैकी होते. त्यानंतर आता मतदानाचे प्रमाण वाढले आहे. नवमतदारांचे प्रमाण वाढले आहे, हे खरे आहे. त्यांच्यात लोकशाहीच्या जाणिवा वाढल्या आहे, हेही खरे आहे. पण या जाणिवा आणि लोकशाहीचे प्रेम हे आत्ताच वाढले असे नव्हे. आज वाहिन्यांवरून ज्या चर्चा घडताहेत, भूमिका मांडल्या जात आहेत, त्या ना सत्तारूढ पक्षाच्या बाजूने आहेत ना भाजपच्या बाजूने आहेत, हे कोडे कायम आहे. म्हणजेच खर्‍या अर्थाने हा संभ्रम आहे. मतदारांना काय हवे आहे? लोकसभा निवडणुकीत नेमके काय दिले पाहिजे, काय सांगितले पाहिजे, याची राजकीय पक्षांनी तयारीच केली नाही. ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, विधानसभा या सर्वांचे विषय वेगळे आहेत. लोकसभा सदस्यांकडून ती अपेक्षा करता येत नाही. गावातला पाणीपुरवठा लोकसभेचा खासदार पुरवत नाही. तो गावचा सरपंचच करतो हे जोपर्यंत मतदाराच्या मनावर बिंबवले जात नाही तोपर्यंत या निवडणुकीतला भेदाभेद त्यांच्या लक्षात येणार नाही.
बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, अनागोंदी या सगळ्यांना कंटाळून मतदार मतदान करतो आणि त्यातून अधिक मतदान होते व ते सकारात्मक आहे, अशी भूमिकाही   काही जण मांडत आहेत. मतदार राजा जागा झाला आहे. तरुणाई देशात जागृत झाली आहे आणि ती मतदान यंत्राद्वारे समोर येणार आहे. लोकसभेच्या या निवडणुका घोषित झाल्यापासून महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती पाठ सोडत नाही. सतत शेतकर्‍यांना संकटांना सामोरे जावे लागते, तरीही मतदार मतदानाला जातो. म्हणजेच तो एक प्रकारे आपला तात्कालिक संताप कदाचित मतदान यंत्राद्वारे व्यक्त करत असावा, अशी संभावना नाकारता येत नाही. एकूणच १६ व्या लोकसभेचे चित्र स्पष्ट होण्यास आणखी कालावधी असला तरीही महाराष्ट्रात मात्र आजच्या मतदानातून मतदाराचा कौल समजून येणार आहे.
या तीन टप्प्यांतल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत राज्यातली नवी राजकीय समीकरणे समोर येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरचे बदलते राजकारण कळणार आहे. या पाच वर्षात झालेल्या विविध आंदोलनांचा परिणाम व ठरावीक विचारसरणीच्या पक्षांनी जाहिरातीच्या माध्यमाने मतदारांच्या मनावर घातलेले गारूड, याचा परिणाम मतदानात झालेले बदल या सगळ्या बाबी राजकीय अभ्यासकांना गांगरून टाकणार्‍या आहेत. एकीकडे मतदान वाढत आहे मात्र जनतेचे प्रश्‍न काही मांडलेच जात आहेत असे नव्हे. भ्रष्टाचाराचा मुद्दा असो किंवा महागाई हे प्रश्‍न मांडून त्यावर प्रत्येक पक्ष सत्तेवर आल्यास कसा उपाय योजणार त्याविषयी कोणी बोलत नाही. एकप्रकारे लोकांना, मतदारांना गृहीत धरुन राजकीय पक्ष आपला प्रचार करतात. आपली लोकशाही प्रगल्भ होत चालली आहे परंतु तिला अधिक व्यापक स्वरुप कालांतराने आल्यास ती प्रगल्भता वाढेल.
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel