-->
संपादकीय पान सोमवार दि. ३१ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
आंध्रमध्ये जगन रेड्डी यांच्या कसोटीचा काळ
-----------------------------
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.आर. रेड्डी यांचे चिरंजीव वाय.एस.जगमोहन रेड्डी उर्फ जगन यांची आगामी लोकसभा निवडणुकीत मोठी कसोटी लागणार आहे. वाय.एस.आर. यांच्या अपघाती निवधनानंतर त्यांच्या चिरंजीवांचा हट्ट कॉँग्रेस श्रेष्ठींनी काही पुरविला नाही. त्यामुळे जगन रेड्डी यांनी आपली स्वत:चा पक्ष वाय.एस.आर. कॉँग्रेस काढला. खरे तर कॉँग्रेस पक्षात कोणताही हट्ट केल्यास पद मिळत नाही. श्रेष्ठींना आवश्यक वाटलेच तर पद उपभोगता येते, हे वास्तव जगन रेड्डी यांना समजण्याऐवढी त्यांच्याकडे मॅच्युरिटी नव्हती. जगन यांची समजूत अशी झाली की, आपले वडील विमान अपघातात गेल्याने जो दुखाचा डोंगर कोसळला होता व आपल्या वडिलांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपणाला मुख्यमंत्री केले जाईल. मात्र कॉँग्रेस संस्कृतीत असे बालहट्ट पुरविले जात नाहीत. त्यामुळे जगन यांनी आपला वेगळा पक्ष काढला. कॉँग्रेसला मोठ्या प्रमाणात खिळखिळे करण्यत ते जरुर यशस्वी झाले मात्र कॉँग्रसचे आमदार फोडून सरकार अल्पमतात आणण्याची त्यांची कुवत नव्हती. त्यामुळे त्यांचे हे बंड फुसकेच ठरले. उलट कॉँग्रसने त्यांच्या विरुध्द चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून जेलमध्ये टाकले व हैराण केले. अर्थात यात त्यांची लोकप्रियता वाढवून देण्यास कॉँग्रेसनेच हातभार लावला. आंध्रप्रदेशाचे प्रदीर्घ काळ रखडलेले विभाजन यावेळी निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसने केले व तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. या प्रस्तावाला जगन रेड्डी यांनी कडाडून विरोध केला होता. आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना कसे यश लाभते त्यावर या पक्षाचे व जगन रेड्डी यांच्या राजकीय कारकिर्दीचे भविष्य अवलंबून राहिल. २०१० साली पक्षातून बाहेर पडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला त्यावेळी ते फारसे काही आमदार आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाले नाहीत. जगन रेड्डी यांनी नुकतीच वयाची ४१ वर्षे पूर्ण केली आहेत आणि आपल्या वडिलांनी मुख्यमंत्रीपदी असताना ज्या लोककल्याणकारी योजना राबविल्या होत्या त्या राबविण्याचा संकल्प सोडला आहे. २०११ व त्यानंतरच्या वर्षी झालेल्या निवडणुका त्यांनी बर्‍यापैकी जिंकल्या. त्यावेळी ते खरे तर तुरुंगात होते. या निवडणुका जिंकल्यामुळे त्यांच्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात जगन रेड्डी व तेलगु देसम यांनी तेलंगणाच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र या दोघांनीही आपली बूमिका बदलली आणि एकसंघ आंध्रप्रदेशाच्या बाजूने कौल दिला. अशा प्रकारे आपण आपली भूमिका पूर्णपणे का बदलली याबाबत जगन रेड्डी स्पष्टीकरण देत नाहीत. सध्याचा आमच्या भूमिकेमुळे आमच्या मागे जनता आहे असे ते फक्त सांगतात आणि कॉँग्रेसवर टीका करतात. राहूल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी सोनियांनी आंध्रप्रदेश तोडला ही आपळी भूमिका मांडतात. पण आंध्र तोडल्यामुळे राहूल गांधी पंतप्रधान कसे होणार हे काही लोकांना पटत नाही. सध्या वाय.एस.आर. कॉंग्रेसकडे १८ आमदार, पाच विधान परिषद सदस्य व तीन खासदार आहेत. आता निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेसचे १२ व तेलगु देसमचे चार आमदार जगन रेड्डी यांच्या ताफ्यात सामिल झाले आहेत. जगन यांचे पिताश्री वाय.एस.आर. हे कॉँग्रेसचे अत्यंत लोकप्रिय नेते होते आणि त्यांची पुण्यायी, त्यांनी जमविलेला लोकसंग्रह आता जगन यांच्याकडे आला आहे. यात तरुणांपासून ते ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे. वाय.एस.आर. यांनी अनेक कल्याणकारी योजना आखल्या व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती. त्याच जीवावर ते दोनदा निवडून आले होते. आता देखील आपल्या वडिलांसारख्याच लोकप्रिय योजना आपण लोकांना पुन्हा निवडून आल्यास देऊ अशी घोषणा जगन यांनी केली आहे. जगन हे यात यशस्वी होती का, हा सवाल आहे.
-------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel