संपादकीय पान गुरुवार दि. १० मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
औषध उद्योगातील नवा सुर्योदय
-----------------------
औषध उद्योगातील नामवंत कंपनी रॅनबक्सी ताब्यात घेण्याचा निर्णय सन फार्माने जाहीर केला त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. १९८३ साली केवळ दहा हजार रुपयाच्या भांडवलावर दिलीप संघवी यांनी सुरु केलेली ही कंपनी आता जगातील पाचवी आघाडीची कंपनी झाली आहे. खरे तर जपानच्या डाय ईची या कंपनीने २००८ साली ताब्या घेतली त्यावेळी ही कंपनी एका भारतीय प्रवर्तकांकडून एका विदेशी कंपनीच्या ताब्यात गेल्याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. मात्र उद्योगात अशा प्रकारच्या देशप्रेमाला काहीच अर्थ नसतो. इकडे व्यवहार महत्वाचा ठरतो. कारण केवळ सहा वर्षातच ही कंपनी पुन्हा एकदा भारतीय प्रवर्तकाने विकत घेतली. औषधाच्या गुणवत्तेवरून अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाच्या कारवाईचे धनी बनलेल्या औषध निर्मिती क्षेत्रातील या दोन आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्या. रॅनबॅक्सी लॅबोरेटरीवर ताबा मिळवीत सन फार्मास्युटिकल ही भारतातील पहिली मोठी औषध उत्पादक कंपनी बनली आहे. तर ३.२ अब्ज डॉलरमधील या व्यवहारामार्फत जगातील पाचवा मोठा औषध निर्मिती उद्योग उदयास आला आहे.
सन फार्माने रॅनबॅक्सीचे सर्व समभाग १८ टक्के अधिक रक्कम मोजून म्हणजेच अधिमूल्याने खरेदी केले आहेत. रॅनबॅक्सीच्या समभागाचे मूल्य ४७५ रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आले. व्यवहारानंतर रॅनबॅक्सीच्या भागधारकांना सन फार्माचे प्रत्येकी ०.८ समभाग मिळतील. या दोन्ही कंपन्यांचे विलीनिकरण जाल्यावर जपानच्या डायची या कंपनीचे नऊ टक्के भांडवल राहिल. उभय कंपन्या अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाच्या कारवाईवरून गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होत्या. यामध्ये रॅनबॅक्सीच्या भारतातील चारही प्रकल्पांचा समावेश होता. सन फार्माच्या करखाडी प्रकल्पातील औषधांवरही अमेरिकेत निर्यातबंदी आहे. एकत्रित कंपनीमध्ये आता ६२९ औषधांचा समावेश असेल. यामुळे एकत्रित कंपनीच्या महसुलाचा आकडा आता ४.२ अब्ज डॉलरवर गेला आहे. या ताबा व्यवहारामुळे सन फार्माचे कार्यक्षेत्र ६५ देशांत उपलब्ध होईल. यामध्ये तिच्या ४७ निर्मिती प्रकल्पांचाही समावेश असेल. याचबरोबर विकसनशील ब्रिक देशांमध्ये अस्तित्व राखण्यास सनला सहकार्य मिळेल. उभयतांची या देशांमध्ये १० कोटी डॉलरपेक्षाही अधिक विक्री होईल. रॅनबॅक्सीमुळे सनला भारताच्या ग्रामीण भागातही पोहोचता येईल. दोघांचा एकत्रित बाजारहिस्सा ९ टक्के होईल. रॅनबॅक्सीवर यापूर्वी जपानच्या डायइची चे वर्चस्व होते. तिने रॅनबॅक्सीमधील मोठा हिस्सा २००८ मध्ये २२,००० कोटी रुपयांना खरेदी केला होता. या वेळी रॅनबॅक्सीचे प्रमुख प्रवर्तक सिंग बंधू बाहेर पडले होते. नव्या व्यवहारानंतर जपानच्या कंपनीचा रॅनबॅक्सीमध्ये असलेला ६३.४ टक्के हिस्सा आता सन फार्माचा असेल तर सनमध्ये डायइचीचा हिस्सा ९ टक्के राहील.
भांडवली बाजारातील व्यवहारापेक्षा अधिक मूल्य मोजून सन फार्माने रॅनबॅक्सीची खरेदी केली असली तरी यामध्ये सर्वाधिक फायदा जपानच्या डायइचीचा झाला आहे. अमेरिकन औषध नियामकाच्या सततच्या कात्रीतून या कंपनीची सुटका झाली आहे. सध्या हा त्रास रॅनबॅक्सीबरोबरच सन फार्मालाही सोसावा लागत आहे. तुलनेत सन फार्मामध्ये नाममात्र ९ टक्के अस्तित्व राखून डायइचीला आता अन्यत्र व्यवसाय, प्रदेशांत लक्ष केंद्रित करता येईल. देशातील हे औषध उद्योगातील एक सर्वात मोठे डील ठरले आहे. यामुळे देशातील औषध बाजारपेठेत देशी कंपन्यांची स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. अर्थातच त्याचबरोबर आपल्याकडे बहुराष्ट्रीय कंपनन्या आक्रमकरित्या वाटचाल करीत आहे. अलिकडेच ग्लॅक्सो स्मिथकिलाईनने आपला भारतीय कंपनीतील वाटा वाढवून ७५ टक्क्यांवर नेला आहे. याचा अर्थ बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत मोठा रस आहे. मात्र त्यात भारतीय कंपन्याही आपला वाटा शोधत आहे. सनच्या रुपाने भारतीय कंपन्याचा सुर्योदय आता औषध उद्योगात झाला आहे.
------------------------------------
-------------------------------------
औषध उद्योगातील नवा सुर्योदय
-----------------------
औषध उद्योगातील नामवंत कंपनी रॅनबक्सी ताब्यात घेण्याचा निर्णय सन फार्माने जाहीर केला त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. १९८३ साली केवळ दहा हजार रुपयाच्या भांडवलावर दिलीप संघवी यांनी सुरु केलेली ही कंपनी आता जगातील पाचवी आघाडीची कंपनी झाली आहे. खरे तर जपानच्या डाय ईची या कंपनीने २००८ साली ताब्या घेतली त्यावेळी ही कंपनी एका भारतीय प्रवर्तकांकडून एका विदेशी कंपनीच्या ताब्यात गेल्याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. मात्र उद्योगात अशा प्रकारच्या देशप्रेमाला काहीच अर्थ नसतो. इकडे व्यवहार महत्वाचा ठरतो. कारण केवळ सहा वर्षातच ही कंपनी पुन्हा एकदा भारतीय प्रवर्तकाने विकत घेतली. औषधाच्या गुणवत्तेवरून अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाच्या कारवाईचे धनी बनलेल्या औषध निर्मिती क्षेत्रातील या दोन आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्या. रॅनबॅक्सी लॅबोरेटरीवर ताबा मिळवीत सन फार्मास्युटिकल ही भारतातील पहिली मोठी औषध उत्पादक कंपनी बनली आहे. तर ३.२ अब्ज डॉलरमधील या व्यवहारामार्फत जगातील पाचवा मोठा औषध निर्मिती उद्योग उदयास आला आहे.
भांडवली बाजारातील व्यवहारापेक्षा अधिक मूल्य मोजून सन फार्माने रॅनबॅक्सीची खरेदी केली असली तरी यामध्ये सर्वाधिक फायदा जपानच्या डायइचीचा झाला आहे. अमेरिकन औषध नियामकाच्या सततच्या कात्रीतून या कंपनीची सुटका झाली आहे. सध्या हा त्रास रॅनबॅक्सीबरोबरच सन फार्मालाही सोसावा लागत आहे. तुलनेत सन फार्मामध्ये नाममात्र ९ टक्के अस्तित्व राखून डायइचीला आता अन्यत्र व्यवसाय, प्रदेशांत लक्ष केंद्रित करता येईल. देशातील हे औषध उद्योगातील एक सर्वात मोठे डील ठरले आहे. यामुळे देशातील औषध बाजारपेठेत देशी कंपन्यांची स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. अर्थातच त्याचबरोबर आपल्याकडे बहुराष्ट्रीय कंपनन्या आक्रमकरित्या वाटचाल करीत आहे. अलिकडेच ग्लॅक्सो स्मिथकिलाईनने आपला भारतीय कंपनीतील वाटा वाढवून ७५ टक्क्यांवर नेला आहे. याचा अर्थ बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत मोठा रस आहे. मात्र त्यात भारतीय कंपन्याही आपला वाटा शोधत आहे. सनच्या रुपाने भारतीय कंपन्याचा सुर्योदय आता औषध उद्योगात झाला आहे.
------------------------------------
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा