-->
संपादकीय पान सोमवार दि. २१ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
भ्रष्टाचार्‍यांना संपविण्याची संधी
------------------------
रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी केलेल्या भ्रष्टाचारातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची माजा जमविली आहे. ही माया कशी जमविली, त्यासाठी कशा पर्कारे बोगस कंपन्या स्थापन केल्या आणि विविध कंपन्या दाखवून भ्रष्टाचारातून कमविलेला पैसा कशा प्रकारे पचविण्याचा प्रयत्न केला याचे सविस्तर विवेचन करणारी पुस्तिका प्रसिध्द झाली आहे. रोह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या शनिवारी झालेल्या जंगी सभेमध्ये तटकरे यांच्यावरील या श्‍वेतपत्रिका शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. ही शेतपत्रिका प्रकाशित झाल्यावर रायगडमधील जनतेने तिचे उर्त्फुतपणे स्वागत केले असून याची मागणी गावागावतून येत आहे. यावरुन तटकरे यांनी भ्रष्टाचार कसा केला याची माहिती जाणून घेण्यास मतदार कसा उत्सुक आहे ते स्पष्ट दिसते. ही शेतपत्रिका प्रत्येक मतदारांच्या हाती कशी पोहोचेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुनिल तटकरे यांनी सरकारी कामांतून भ्रष्टाचार करुन हा पैसा कमविला व हा पैसा पचविता येईल असे गृहीत धरुन शेकडो कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांनी पैसा रिचविण्यासाठी विविध नामी युक्त्या रचल्या. त्यासाठी तटकरेसाहेबांनी सी.ए.ची फौज कामाला लावली होती. या कंपन्यांच्या संचालकपदी केवळ तटकरे कुटुंबियच नव्हे तर घरातील नोकरांनाही संचालक केले आहे. म्हणजे उद्या तटकरेंबरोबर हे नोकरही जेलमध्ये जाणार आहेत. बिचार्‍या नोकरांनी आपल्या मालकांच्या सांगण्यावरुन कागदांवर सह्या केल्या असतील, पण त्यांना कुठे माहित होते की आपण एका मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगार ठरणार आहोत. असो. तटकरेंनी ज्या विविध कंपन्या स्थापन केल्या त्यात त्यांनी मल्टीव्हेंचर ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीच्या नावाने म्हसळा तालुक्यातील दिवेआगर येथे ५,३९४ चौरस फूटाचा दीड एकरचा बागायती जमीन असलेला बंगला रेहाना उंडरे यांच्याकडून खरेदी केला. याची कागदावरची किंमत केवळ ५० लाख रुपये आहे. मात्र त्याचे बाजारमूल्य १० कोटी रुपयांहून जास्त आहे. हा बंगला त्यांनी ऍग्रो टुरिझमच्या नावाखाली त्यांनी मल्टीव्हेंचरच्या नावाने विकत घेतला आणि या कंपनीत अनिकेत तटकरे हे २००७ पासून संचालक आहेत. सदर कंपनीच्या ताळेबंदात हा बंगला रजिस्टर खरेदी खताव्दारे विकत घेतला असला तरी मालमत्ता म्हणून कुठेही दाखविलेला नाही. तटकरेंची आणखी एक कंपनी मल्टीव्हेचर ऍग्रो इन्फ्राचे भागभांडवल फक्त ३३ लाख ५० हजार रुपये आहे. कोणताहा व्यवसाय नसलेल्या व त्यामुळे उत्पन्नही नसलेल्या या कंपनीने २०-३-२००९ ला ३ लाख २५ हजार शेअर्स ९० रुपये अधिमूल्याने यश व्ही ज्वेलर्स व इतर कंपन्यांना विकले. अशा प्रकारे भ्रष्टाचारातून कमविलेले २ कोटी ९२ लाख रुपये त्यांनी या कंपनीच्या पुस्तकात उघडपणाने आणले आणि त्यावर आयकरही भरलेला नाही. अधिमूल्याने विकलेल्या ३ लाख २५ हजार शेअर्सपैकी १ लाख ७५ हजार शेअर्स परत १० रुपये या मूल्याने त्यांच्याच ऍपलबेरी व बेट्री या कंपन्यांना पुन्हा विकत घेतले. थोडक्यात आयकर न भरता भ्रष्टाचारातून मिळालेले १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये त्यांनी खिशात घातले. या कंपन्यांचे बाजारमूल्य काढल्यास ते १०० कोटी रुपयांच्या घरात जाईल. ऍपलबेरी या कंपनीचे भांडवल फक्त एक लाख रुपये आहे. त्यात आदिती व सुनिल तटकरे हे संचालक आहेत. या कंपनीकडे ५१ लाख रुपये बिनव्याजी असुरक्षित कर्जे आहेत. त्यातून वर नमूद केलेले १ कोटी २० लाख किंमतीचे शेअर्स केवळ १ लाख २० हजाराला घेतले आहेत. या ही कंपनीत कोणताही व्यवसाय नाही. माझदा कन्स्ट्रक्शन कंपनी ही आणखी एक भ्रष्टाचाराची खाण ठरलेली कंपनी आहे. ही कंपनी ऑर्बिट या मोठ्या बिल्डर समूहाची कंपनी आहे. या बिल्डरांचे व तटकरे यांचे संबंध काय हा प्रश्‍न कधीच कोणाला सुटणार नाही. अर्थातच त्यांचे आर्थिक लेन-देन असल्यामुळेच या कंपनीत करोडो रुपयांचा व्यवहार झाला. माझदा या कंपनीचेे ऑगस्ट क्रांती मैदान येथील पांडे हाऊस या प्रस्तावित टॉवर होणार्‍या इमारतीत दोन फ्लॅट आहेत. या इमारतीचे पुर्नविकासाचे सर्व अधिकार मझदा कडे आहेत. या मालमत्तेची २००९ सालची किंमत किमान १०० कोटी रुपये आहे. त्यातील ३३ टक्के हिस्सा तटकरे यांच्या मल्टीव्हेंचर कंपनीने फक्त ५,५०,००० रुपयांना मिळविला. म्हणजे ३३ कोटी रुपयांची ही मालमत्ता फक्त पाच लाख रुपयात देण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे. तटकरेंना अन्य रक्कम भ्रष्टाचाराच्या रुपाने देण्यात आली. या इमारतीच्या पुर्नबांधणीनंतर त्याचे मूल्य एक हजार कोटी रुपयांवर पोहोचेल. म्हणजे तटकरेंचा हिस्सा ३३० कोटी रुपयांवर पोहोचेल. म्हणजे पहा भ्रष्टाचारातून कमविलेला तटकरेंचा पैसा किती झपाट्याने वाढत चालला आहे तो. तटकरेंच्या सी.ए.च्या फौजेनी मात्र त्यांच्या विविध कंपन्यांचे आर्थिक हिशेब व ताळेबंद ३१-३-२०११ च्या नंतर सादर केलेलेच नाहीत. कारण हे जर सादर केले तर जगजाहीर होणार व आपण भ्रष्टाचाराच्या रुपाने कसा पैसा कमविला ते लोकांपुढे उघड होणार. हे होऊ नये यासाठी तत्यांनी कंपन्यांचे अहवाल सादर करणे टाळले आहे. कदाचित निवडणुका होण्याची ते वाट पहात असतील. निवडणुका झाल्यावर आपण जिंकू व नंतर सादर करु असा त्यांचा विचार असावा. परंतु यावेळी तटकरेंच्या या भ्रष्टाचारी रावणाला गाढण्याचे रायगडकरांनी ठरविले असून यावेळी त्यांचा पराभव नक्की आहे.
--------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel