-->
संपादकीय पान शनिवार दि. २९ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
मोदींच्या विकासाचे वास्तव चित्रण
--------------------------
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जणू काही स्वर्गच उभा केल्याचे चित्र सध्या जाहीरातीतून व प्रसार माध्यमातून रंगविले जात आहे. मोदी जर पंतप्रधान झाले तर हेच गुजरातचे विकास मॉडेल ते संपूर्ण देशात नेणार आहेत. केवळ जाहीरातबाजीच्या जीवावर हे सर्व बेतले जात आहे. मोदींनी विकास जरुर केला आहे. परंतु या विकासाची जास्त फळे सर्वसामान्य गुजराती माणसांपेक्षा भांडवलदारांनी जास्त चाखली आहेत. विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने खरे तर मोदींचा नेमका विकास-विकास म्हणजे काय आहे, त्याचे वास्तव उघड करुन दाखवायला हवे. परंतु कॉँग्रेसचे नेते मंडळी नेमके हेच करीत नाहीत व मोदींवर पुराव्याशिवाय टीका करतात. याचा परिमाम असा होतो की, मोदींनी केलेला विकास देशातील जनतेला खरा वाटू लागतो. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात मात्र जोरदार आघाडी उभारली आहे. परंतु त्यांनी ही आघाडी उभारताना कॉँग्रेससारखी वरवरची टीका न करता मोदींचा विकास कसा नेमका भकास आहे त्याचे मुद्देसुद वर्णन केले आहे. यावर जर नजर टाकली तर ममोदींचा विकास कसा बेडगी आहे हे स्पष्ट दिसेल. केजरीवाल यांनी जमीन ताब्यात घेणे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या व रिटेल मधील थेट विदेशी गुंतवणुकीमुळे होणारे नुकसान या तीन मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. केजरीवालांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे तो म्हणजे, गुजरातमधील शेतकर्‍यांकडून जमीन जबरदस्तीने ताब्यात घेऊन कंपन्यांना प्रकल्प उभारण्यासाठी दिली आहे. गुजरात सरकारने मात्र या आरोपाचे खंडण केले असून खुल्या बाजारातील किंमतीवर आधारित या जमीनी खरेदी केल्याचे म्हटले आहे. परंतु याबाबतीत गुजरात सरकार खोटे बोलीत आहे. कारण गुजरातमध्ये अनेक प्रकल्पांसाठी जमीन देण्यासाठी शेतकर्‍यांनी विरोध करुन आंदोलने केली आहेत. भावनगर मध्ये निरमाच्या वतीने मोठा सीमेंट प्रकल्प उभारला जाणार होता. परंतु शेतकर्‍यांनी विरोध केल्याने हा प्रकल्प बारगळला. मंडल बेचारी या भागातही विशेष आर्थिक विभागासाठी जमीन  द्यायला शेतकर्‍यांनी विरोध केला होता. त्यासाठी मोठे आंदोलन झाले होते. केजरीवाल यांच्या संगाण्यानुसार, गेल्या दहा वर्षात शेतकर्‍यांच्या ५८७४ आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी जर सुखी आहेत तर आत्महत्या कशा झाल्या, हा प्रश्‍न विचारात घेण्यासारखा आहे. गुजरात सरकारच्या दाव्यानुसार, मात्र एकाच शेतकर्‍याची आत्महत्या झाली आहे. अर्थात वस्तुस्थिती अशी आहे की, नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्यरोच्या अहवालानुसार, आत्महत्यांचा हा आकडा बरोबर आहे. त्यामुळे आत्महत्या होऊनही गुजरात सरकार सफशेल खोटे बोलत आहे. केजरीवाल यांनी तिसरा मुद्दा मांडला आहे तो, एकीकडे भाजपा रिटेलमधील थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत असताना मात्र मोदी रिटेलमधील थेट विदेशी गुंतवणुकीची दारे गुजरातमध्ये उघडत आहेत. याचा परिणाम म्हणजे येथील किरकोळ व्यापारी संपुष्टात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात गुजरातमध्ये साठ हजार लघु उद्योग बंद पडले. गुजरातमधील मोठ्या संख्येने लघुद्योग बंद पडले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र केजरीवाल म्हणतात त्यानुसार एवढा मोठा आकडा आहे त्याला अन्य कुणी दुजोरा दिलेला नाही हेदेखील तेवढेच खरे आहे. प्रामुख्याने औषध, वस्त्रोद्योग, रसायन या उद्योगांना अन्य राज्यांनी अजून भरघोस सवलती दिल्याने त्यांनी गुजरात सोडले. येथील बरेच कारखाने सिक्कमी व हिमाचलप्रदेशात गेले आहेत. केजरीवाल यांचे आरोप काही प्रमाणात खरे असले तरीही मोदी जे विकासाचे चित्र रंगवितात ते देखील काही शंभर टक्के खरे नाही.
-------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel