संपादकीय पान मंगळवार दि. ४ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
राज्यातील वाईन उद्योगावर संकट
-----------------------------
राज्यातील वाईन उद्योगाने केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगात आपला ठसा उमटविला आहे. वाईन म्हटली की फक्त ती युरोपातच तयार होते आणि तिकडच्या वाईनची चव काही वेगळीच. अशी एक असलेली समजूत नाशिकच्या वाईन उद्योगाने फुसून काढली. नाशिकला देखील जगातील उत्तम म्हणजे युरोपातील दर्ज्याची वाईन तयार होऊन त्याची विक्री जगात होऊ शकते हे सिध्द झाले आहे. मात्र अशा प्रकारे जगावर आपला ठसा उमटविणारा हा वाईन उद्योग आता संकटात लोटला गेला आहे. राज्यातील ७५ पैकी ५० वायनरीज आर्थिक संकटात आल्या आहेत. त्यांच्याकडील ५० लाख लिटरहून जास्त वाईन सध्या विक्री न झाल्यामुळे पडून आहे. त्यांची विक्री थकल्यामुळे त्यांनी घेतलेली बँकेची कर्जे फेडता आलेली नाहीत. त्यामुळे या कंपन्या अधिकच आर्थिक बोज्याखाली दबल्या आहेत. गेल्या काही वर्षात वाईन उद्योगासाठी लागणार्या द्राक्षांची निर्मती करण्यास अनेक शेतकर्यांनी सुरुवात केली होती. मात्र गेल्या वर्षात वाईन उद्योगाची झालेली अधोगती पाहता या शेतकर्यांनी आपले पीक बदलून घेतले आहे. सध्या देशात एकूण ९३ वायनरिज आहेत. यातील ७५ वायनरिज या एकट्या महाराष्ट्रातच आहेत. ऑल इंडिया वाईन प्रोड्यूसर्स असोसिएशन व इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायन निर्मिती करणार्या कंपन्यांना योग्यरित्या आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग न करता आल्याने त्यांच्यावर ही पाळी आली आहे. म्हणजे उत्पादन जागतिक दर्ज्याचे असूनही जर तुम्ही वाईनच्या विपणात मागे पडलात तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे तुमच्याकडे सोने असेल तरी त्याचे विक्री करण्याचे तंत्र तुमच्याकड अवगत नसेल तर त्याचा काडीमात्र उपयोग नाही. त्याऐवजी तुमच्याकडे साधी माती आहे आमि जर तुमच्याकडे विक्रीतंत्र प्रभावी असेल तर तुम्ही तीच माती सोन्याच्या दरात विकू शकाल असे म्हणतात. हे सध्याच्या स्थितीत वाईन उद्योगाला एकदम लागू पडते. देशातील वाईनची राजधानी म्हणून नाशिकची ओळख आता झाली आहे. मात्र या नाशिकमध्ये ३७ पैकी ३० वायनरिज सध्या आर्थिक अडचणींमुळे बंद पडल्या आहेत. वाईनचे उत्पादन कमी झाल्याने शेतकर्यांनी आपले उत्पादन क्षेत्र आता कमी केले आहे. गेल्या वर्षात वाईनसाठी लागणार्या द्राक्षांचे लागवड क्षेत्र ५८ टक्क्याहून कमी झाले आहे. अगदी अलिकडे पर्यंत नाशिक जिल्ह्यात सुमारे सहा हजार एअर क्षेत्रावर वाईनला लागणारी द्राक्षे लावण्यात आली होती. आता ती लागवड कमी होऊन केवळ २५०० एकरवर खाली आले आहे. त्यामुळे आता भविष्यात अनेक वायनरिंजना द्राक्ष मिळणेही कठीण जाईल. अर्थात शेतकर्यांचाही नाईलाज झाला आहे. ज्यावेळी वाईन उद्योग बहरला होता त्यावेळी या शेतकर्यांना चांगली किंमत मिळाली होती. मात्र जसे वाईनचे उत्पादन घसरु लागले तसे शेतकर्यांचेही नुकसान झाले. गेल्या काही वर्षात वायनरी उद्योगाला सरकारने भरपूर सवलती दिल्या होत्या. यातील महत्वाचे म्हणजे याला लघु उद्योग म्हणून दर्जा दिला. तसेच अबकारी करातून १०० टक्के सवलत देण्यात आली. या उद्योगावरील विक्री करही २० टक्क्यावरुन चार टक्क्यांवर काली आणण्यात आणला. तसेच या उद्योगाला एक खिडकी परवानग्या देण्यात आल्या. या उद्योगाला अन्न प्रक्रिया उद्योगाचा दर्जा देण्यात आला.यामुळे झपाट्याने वायनरीज सुरु झाल्या खर्या मात्र त्यांना आपला दर्जा राखूनही विपणन न करता आल्याने संकट आले. यातून आता या कंपन्या खरोखरीच बाहेर पडतील का असा सवाल आहे.
-----------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा