संपादकीय पान गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
तिसर्या आघाडीचा समर्थ पर्याय
-----------------------
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तिसर्या आघाडीची घोषणा झाल्याने आता कॉँग्रेस विरुध्द भाजपा व या दोघांविरोधात तिसरी आघाडी अशी लढत रंगणार आहे. तिसर्या आघाडीच्या स्थापनेची घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी नवी दिल्लीत केली. सध्या या आघाडीत एकूण अकरा पक्ष असून लवकरच ही संख्या पंधरावर जाण्याची शक्यता आहे. बिजू जनता दल व आसाम गण परिषद हे पक्ष देखील लवकरच यात अधिकृतरित्या सामिल होण्याची शक्यता आहे. सध्या तिसर्या आघाडीत समाविष्ट असलेल्या अकरा पक्षांच्या खासदारांची संख्या ९०च्या वर आहे. त्यामुळे तिसर्या आघाडीने आणखी जोर लावल्यास भ्रष्टाचारी कॉँग्रेस व जातीयवादी भाजपा यांना एक समर्थ पर्याय उभा करण्याचे आव्हान पेलण्याची ताकद या आघाडीकडे आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी तिसर्या आघाडीची ताकद जास्त वाढली आहे. मात्र सध्या फक्त कॉँग्रेस व भाजपा आपल्या धनशक्तीच्या जोरावर आपला मतदारांवर प्रभाव पाडीत आहेत. मात्र वस्तुस्थिती काही वेगळी आहे. सरकारी पैसा ओतून केंद्र सरकार आपल्या योजनांव्दारे कसा विकास झाला हे लोकांवर बिंबवित आहे. याव्दारे जनतेच्या पैशांचा चुराडा केंद्रातील कॉँग्रेस आघाडीने सुरु केला आहे. तर भाजपाने ही गुजरातमधील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे कार्यक्षमरित्या चालत आहे हे जाहीरातबाजी करुन जनतेवर बिंबवत आहे. कॉँग्रेस काय किंवा भाजपा यांनी जर खरोखरीच विकास केला असेल तर तो जाहीरातबाजी करुन जनतेला दाखविण्याची गरजच का? तुम्ही जर चांगली कामे केली असतील तर त्याची दखल घेऊन जनता तुम्हाला करेल. मात्र वस्तुस्थिती अशी नाही. गेल्या दहा वर्षांत कॉँग्रेसने कोणतेही ठोस काम केलेले नाही. उलट अतनेक योजना या भ्रष्टाचाराने बरबटल्या आहेत. यातील अनेक योजना चांगल्या आहेत. परंतु त्या योजनातील पैसा किंवा अन्य लाभ जर जनतेपर्यंत पोहोचत नसतील तर त्याचा उपयोग काय? केंद्र सरकारने अन्न सुरक्षा योजना मोठा गाजावाजा करुन सुरु केली, मात्र या योजनेत लखपती लोकांनीही लाभ उचलायला सुरुवात केली आहे आणि हे करणण्यासाठी सत्ताधारी पक्षाचेच एजंट कार्यरत आहेत. त्यामुळे योजना कितीही चांगल्या तर्हेने आखल्या तरी त्याची अंमलबजावणी करणारी शासकीय यंत्रणा व त्याला साथ देणारा कॉँग्रेस पक्ष या दोन्ही भ्रष्टाचारात नखशिखांत बुडलेल्या असल्याने या चांगल्या योजनांचे माथेरे होते. अनेकदा योजना या कागदावरच राहातात. दलाल मंडळी कोणतेही प्रकल्प न राबविता त्याचे पैसे खाऊन फस्त होतात. हे जे धंदे कॉँग्रेस पक्ष करते तसेच धंदे भाजपातही चालतात. कॉँग्रेसचे व भाजपाचे आर्थिक धोरणही सारखेच आहे. उलट भाजपाने सत्तेत आल्यावर कॉँग्रेस पेक्षा जास्त गतीने आर्थिक उदारीकरण व खासगीकरण करण्यास सुरुवात केली होती. भाजपाने यावेळी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड केल्यापासून अशी काही हवा निर्माण केली जात आहे की, आता भाजपाच सत्तेत येणार आहे. परंतु केवळ प्रसिध्दी माध्यमे व सोशल मिडिया ताब्यात घेऊन सत्ता काबीज करता येत नाही हे मोदी आणि त्यांचे प्रसिध्दी करणारे भाट विसरतात. मोदींची प्रतिमा ही एक दंगलीत सहभागी असलेला मुख्यमंत्री अशी आहे. ही प्रतिमा भाजपाने कितीही फुसण्याचा प्रयत्न केला तरी फुसली जात नाही. कारण गुजरातमधील दंगलीच्या जखमा खोलवर रुजलेल्या ाहेत आणि मुस्लीम जनता ते विसरु शकत नाही. आजवर न्यायालयीन लढाईत मोदी सुटले असले तरी जनतेच्या नजरेतून ते गुन्हेगारच आहेत. त्यामुळे मोदींच्या भोवती फार काही पक्ष उभे राहीलेले दिसत नाहीत. प्रत्येक पक्षाकडे मुस्लीम मतांची एक बँक आहे आणि हा समाज आपण मोदींबरोबर गेल्यास आपल्यापासून दुरावेल अशी भीती सर्वच पक्षांना वाटते. त्यामुळे भाजपाने सत्तेत येण्याची कीतीही स्वप्ने पाहिली तरी ती प्रत्यक्षात उतरणार नाहीत. एकीकडे भ्रष्टाचारी कॉँग्रेस व दुसरीकडे जातीयवादी भाजपा यांचा विचार करता जनतेला हे दोन्ही पक्ष नको आहेत. त्यांना समर्थ तिसरा पर्याय पाहिजे आहे. आज कामगार, शेतकरी, कष्टकर्यांच्या बाजूने राजकारण फक्त डावे पक्षच करु शकतात. आपल्या देशात हेच वर्ग सर्वात मोठ्या संख्येने भरडला गेला आहे. खासगीकरण, उदारीकरणाने हा वर्ग अधिकच पिचला गेला आहे. शहरात मध्यमवर्गीयांचा जन्म झाल्यापासून सगळ्यांकडेच पैसा खुळखूळू लागल्याचा एक गोड समज करुन देण्यात आला आहे. मात्र आपल्या देशात आज ६० टक्क्याहून जास्त जनतेला एक वेळच जेवायला मिळते. मोठ्या संख्येने आपल्याकडे दारिद्रयरेषेखालील जी लोकसंख्या आहे तिचा कॉँग्रेस वा भाजपा हे दोन्ही पक्ष विचार करताना दिसत नाहीत. त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे ठरेल. कारण शेठजी आणि भांडवलदारांचे हीत जपणारे हे पक्ष आहेत. सर्वसामान्य जनतेचे जर जीवनमान सुधारायचे असले तर त्यासाठी सध्याचे कॉँग्रेसचे भ्रष्टाचारी सरकार खाली खेचले पाहिजे. तसेच त्याजागी भाजपाचे भ्रष्टाचारी व जातीयवादी सरकार येता कामा नये याची खबरदारी सर्वसामान्य जनतेने घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तिसर्या आघाडीचा समर्थ पर्याय पुढे आला आहे. एका समान कार्यक्रमावर ही आघाडी उभारली गेलेली असल्याने तिला चांगली मजबुती लाभणार आहे. आगामी निवडणुकीत ही आघाडी देशात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा