-->
संपादकीय पान शनिवार दि. ८ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
नवी राजकीय समीकरणे
-------------------------
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील व जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि राजकीय हालचालींना वेग आला. राज्यात तिसर्‍या आघाडीची समीकरणे काही नव्या पध्दतीने मांडली जाणार असल्याचे सुतोवाच झाले. राज्यातील आगामी निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी व दुसरीकडे भाजपा यांच्या व्यतिरिक्त तिसऱी आघाडी होण्याची शक्यता मिटल्यात जमा होती. कारण ही आघाडी बर्‍यापैकी विस्कळाती झाली होती आणि तीला आलेली मरगळ झटकली जाणार का असा प्रश्‍न होता. आता मात्र बिगर कॉँग्रेस व बिगर भाजपा अशी एक नवी आघाडी आकार घेणार अशी चिन्हे दिसत आहेत. हे जर प्रत्यक्षात उतरले तर राज्यातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जाणार हे नक्की. आपल्याकडे राज्यात तसेच देशातही कॉँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला विटलेला मोठा मतदार आहे. यातील बरीच मते विरोधकांना जातात. मात्र यातील अनेकांना भाजपा हा पक्ष देखील नको आहे. कारण भाजपाचे राजकारण हे जातियवादी आहे आणि भ्रष्टाचारापासूनही मुक्त नाही. अशा वेळी मतदारांना राज्याचा विचार करता तिसरा पर्याय समर्थपणे उभा राहिलेला दिसत नव्हता. कारण कॉँग्रेस असो किंवा भाजपा यां दोघांच्याही राजकारणाचा व प्रशासनाचा अनुभव घेऊन थकलेली जनता यापेक्षा काही वेगळा बदल मिळेल का याची आतुरतेने वाट पहात होती. अशी मते काबीज करण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन झाल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो हे भाई जयंत पाटील यांनी बरोबर ओळखले व त्यादृष्टीने पावले टाकली आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना निश्‍चितच यश येईल अशी चिन्हे दिसत आहेत. या तिसर्‍या आघाडीत अनेक लहान स्थानिक पातळीवरचे पक्षही सहभागी होऊ शकतात व राज्यातील जनतेला तिसरा पर्याय समर्थपणे देऊ शकतात. अशा प्रकारच्या आघाडीकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. सध्या असलेले कॉँग्रेसच्या विरोधातील हवा तिसरी आघाडी आपल्या शिडात भरु शकते. कारण गेल्या दहा वर्षात कॉँग्रेसने जनतेची कसलीही कामे कलेली नाहीत तसेच भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर पोसला. याचा जनतेत जबरदस्त असंतोष आहे. या असंतोषाची हवा शिताड भरली जाऊ शकते. मात्र यासाठी जर राज ठाकरे यांच्यासारख्या तुफानी भाषणाची तोफ जर सोबत असेल तर मतदार या आघाडीला मदत करु शकतील. राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने तरुण आहेत आणि या तरुणांच्या रोजगारापासून विविध प्रश्‍नांची त्यांनी वेळोवेळी दखल घेतली आहे. आंदोलने केली आहेत. तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनतेची नाडी राज ठाकरे हे ओळखण्यात माहिर आहेत. मम्हमूनच त्यांनी मोदींबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी मोदींनी त्यांना ज्यावेळी अहमदाबाद येथे आमंत्रित करुन आपली प्रगती दाखविली होती. त्यावेळी ठाकरे हे भारावून गेले होते आणि त्यांनी काही काळ मोदींची स्तुती केली होती. मात्र त्यांना ज्यावेळी वास्तव समजले त्यावेळी मोदींशी फारकत घेतली. नरेंद्र मोदींच्या मुंबईतील जाहीर सभेत त्यांनी जो मराठीव्देष व गुजरातप्रेम व्यक्त केले होते ते राज ठाकरे कदापी सहन करणार नव्हते. त्याचबरोबर नरेंद्रभाईंवर गुजरात दंगलीचा जो ठबका बसला आहे तो कदापी फुसून निघणारा नाही हे देखील वास्तव राज यांना उमगले आहे. त्यामुळे त्यांनी मोदींशी फारकत घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यात काही नवीन समीकरणे शिजू शकतील याची फुसटशी ही कल्पना राजकीय विश्‍लेषकांना नव्हती. राज ठाकरे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर जी एक ठाम भूमिका घेतली होती ती प्रबोधनकारांची आठवण करुन देणारी होती. त्याउलट शिवसेना व भाजपा यांनी दाभोलकरांच्या हत्येबाबत व अंधश्रध्दा विधेयकाबाबत घेतलेली बुळबुळीत भूमिका या पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी होती. राज ठाकरे यांनी या दोन्ही वेळी घेतलेली भूमिका ही राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार्‍या ठरल्या. आता राज ठाकरे हे तिसर्‍या आघाडीबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ते या रविवारी राजकीय जी काही राजकीय भूमिका घेतील त्यामुळे केवळ सत्ताधारी कॉँग्रेसच नव्हे तर सत्ता आपल्यालाच मिळणार अशा भ्रमात असलेल्या भाजपा आघाडीच्या पोटात धस्स होणार आहे. तिसरी आघाडीने जर आकार घेतला तर जनतेला एक नवीन पर्याय खुला होणार आहे. हा पर्याय कॉँग्रेस व भाजपा वगळून स्थापन झालेला जनशक्तीचा एक प्रभावी गट असेल. ही केवळ निवडणुकीपुरती स्थापन झालेली आघाडी नसावी, ही एक समान कार्यक्रमांवर आधारित एक दीर्घकालीन टिकणारी आघाडी ठरावी. जर अशा प्रकारे एखादा राज्याच्या विकासाचा व मराठी माणसाच्या हिताचा समान कार्यक्रम घेऊन जर ही आघाडी स्थापन होणार असेल तर त्याचे स्वागत राज्यातील जनता जरुर करेल. कँॉग्रेस-राष्ट्रवादी युती ही केवळ सत्तेसाठी स्थापन झालेली सोयीची आहे. भाजपाने स्थापन केलेली युतीतील नव्याने आलेले सदस्य हे यापूर्वी त्यांना जातीयवादी म्हणून हिणवत होते. रामदास आठवलेंना जर खासदारकी दिली नसती तर ते यावेळी या युतीसोबत राहिले असते का, हा सवाल आहे. राज्यातील जनता या सर्व राजकारणाला विटली आहे आणि त्यांना यातून जनतेचे राजकारण करणारे सच्चे नेते पाहिजे आहेत. तिसर्‍या आघाडीकडे हा पर्याय देण्याची ताकद आहे, राज ठाकरे जर यात सहभागी झाले तर राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा लाभू शकते.
-----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel