संपादकीय पान गुरुवार दि. ६ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
काऊंटडाऊन सुरु...
--------------------------
देशाच्या १६व्या लोकसभेसाठी नियोजित निवडणुकांची घोषणा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी दिल्लीत केली. देशात जवळपास ३५ दिवसात एकूण नऊ टप्प्यात ही निवडणूक होईल. त्यातील महाराष्ट्रात तीन टप्प्यात १०, १७ व २४ एप्रिल रोजी निवडणूक होईल. यातील रायगड मतदारसंघात २४ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. १६ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर ही सर्व प्रक्रिया पूर्णत्वास जाईल आणि देशात १६ वी लोकसभा अस्तित्वात येईल. यावेळी प्रथमच देशात नऊ टप्प्यात निवडणूक होणार आहे. यापूर्वी सर्वात जास्त अशा सहा टप्प्यात निवडणूक झाली होती. यात विविध ठिकाणी असलेल्या परिक्षा, हवामान याचा अनेक अंगांनी विचार करीत हे टप्पे आखण्यात आले आहेत. आपला देश अवाढव्य पसरलेला असल्याने नऊ टप्प्यातील मतदानाची आखणी ही गरजेची आहे. यावेळच्या निवडणुकीत ८१.४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता यावेळी दहा कोटी मतदार वाढले आहेत. मतदानासाठी नऊ लाख मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांच्या संख्येतही गेल्या वेळच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली. देशातील या सार्वत्रिक निवडणुकीच्या बरोबरीने आंध्रप्रदेश, सिक्कीम, ओरिसा या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील. आंध्रप्रदेशची विभागणी झाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक. जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या पंचवार्षिक सोपस्कारास याव्दारे सुरुवात होणार आहे. आपल्यापेक्षा लोकसंख्येने मोठा असलेला देश म्हणजे चीन. मात्र या देशात बहुपक्षीय लोकशाही नाही. तेथे कामगार, शेतकर्यांची अधिसत्ता आहे आणि तेथे चीनी कम्युनिस्ट पक्ष हा सर्वेसर्वा आहे. तेथील चीनी कम्युनिस्ट पक्षात निवडणुका होऊन लोक चीनच्या संसदेवर पाठविले जातात. मात्र तेथे बहुपक्षीय लोकशाही आपल्यासारखी नाही. अर्थात चीनमधील ही प्रक्रिया वेगळी आहे. अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे. तेथे अध्यक्षाला निवडून दिले जाते. आपल्याकडे मात्र बहुपक्षीय लोकशाही आहे. जनतेला एखादा पक्ष सत्तेत नको असला तर त्याला मतपेटीच्या आधारे सत्ताभ्रष्ट करु शकते. यापूर्वी सत्ताधार्यांना आपल्या मतपेटीव्दारे हिसका देशातील जनतेने दिला आहे. पंतप्रधान म्हणून असलेल्या इंदिरा गांधींनीही याच जनतेने पतपेटीच्या आपल्या अधिकारातून घरी बसविले आहे. तर आजवर निवडणूक न हरता सलग सात वेळा निवडून येणारेही लोकप्रतिनीधी आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपल्याकडील लोकशाही ही जगातील अन्य लोकशाहीशी तुलना करता येणार नाही अशीच आहे. इथे ६० टक्के जनता साक्षर नसली तरीही तिला आपला मतदानाचा अधिकार कसा बजावयाचा याची तिला पूर्ण कल्पना असते. आपल्याकडे काही राजकारणयंना आपण जनतेची मते विकत घेऊन निवडून येतो असे वाटते. मात्र हे साफ चुकीचे आहे. अनेकदा जनतेने याच राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊनही आपल्याला योग्य वाटत असेल त्याच उमेदवाराला विजयी केले आहे. त्यामुळे आपल्याकडची लोकशाही ही परिपक्व आहे आणि आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे गेल्या सहा दशकात चांगलीच रुजली आहेत. आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानात ही लोकशाही रुजली नाही. बांगला देशात मध्येच लष्करशहा डोके वर काढतो. नेपाळमध्ये लोकशाही असली तरी स्थैर्य नसते. श्रीलंकेतही लोकशाही असली तरी सिंहली-तामीळ वांशीक वाद उफाळून आल्याने तेथे लोकशाहीचा अर्थ लोकांना उमजला नाही. खरे तर आपल्या देशाची विशालता लक्षात घेता, विविध संस्कृती, जात, पंथ यांचे स्वरुप पाहता आपल्याकडे लोकशाही कशी रुजली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु ही विविधताच आपल्याला एकत्र जोखडून ठेवते आहे. आपल्याकडे जेमतेम ५० टक्क्याहून थोडे जास्त मतदान होते. मात्र अमेरिकेसारख्या विकसीत देशातही याहून काही जास्त मतदान होते असे नाही. आपण राज्याराज्यात अनेकदा भांडतो, पाण्यासाठी-जमीनीच्या वाट्यावरुन अजूनही संघर्ष करतो. पण भारताच्या संसदेच्या छत्राखाली एकत्र राहातो. आपल्याकडे दक्षिणचे-उत्तरेचे-ईशाान्य भारताची संस्कृती, परंपरा, इतिहास पाहिला तर सर्व काही टोकाचे आहे, मात्र असे असले तरीही आपण एकत्र आहोत. गेल्या वेळच्या निवडणुकांपासून आपण कागदी मतपत्रिकांना बायबाय करुन इलेक्ट्रॉनिक्स मतदान पध्दती स्वीकारली. एक विकसीत देश असूनही आपण ही अत्याधुनिक मतदान पध्दती झपाट्याने आत्मसात केली. अगदी अमेरिकेसारख्या देशातही अजूनही मतपत्रिकांची पारंपारिक पध्दत अजूनही चालते. त्यामुळे अमेरिकेचा निकाल लागायला तीन दिवसांचा कालावधी लागतो. तर आपल्याकडे आता २४ तासाच्या आत सर्व निकाल लागतात. आपण अजूनही विकसनशील देश असलो तरी या बाबतीत विकसीत देशांच्या पुढे मजल मारली आहे. गेली वीसहून जास्त वर्षे आपल्याकडे कोणत्याच राष्ट्रीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आपल्याकडे विविध पक्षांची आघाडी सरकार स्थापन केली जात आहेत. असे असले तरीही आपल्याकडे आता स्थिर सरकार देण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. हा एक प्रकारे आपल्या लोकशाहीचा विजय म्हटला पाहिजे. याऊलट इटली सारख्या युरोपीयन देशात सतत सरकार कोसळत असतात. म्हणूनच आपल्या देशातील लोकशाही परिपक्व झाल्याचे दिसते. आता १६ व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी पहिले पाऊल टाकले गेले आहे. यावेळची निवडणुकही रंगदार ठरणार आहे. रंगदार या अर्थाने की सर्व राजकीय पक्ष आपले प्राण ओतून आपला उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील. मतदारापुढे मताची झोळी पसरतील. मतदारराजा आपला हक्क बजावेल आणि लोकशाहीचा हा पंचवार्षिक सोहळा पार पडेल. लोकशाहीचा एक नवा अध्याय जगापुढे मांडला जाणार आहे. त्याचे आता काऊंटडाऊऩ सुरु झाले आहे...
---------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा