संपादकीय पान सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
राष्ट्रवादीचे तीन दगडांवर पाय
--------------------------------
लोकसभा निवडणुकींचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या व केंद्रात यु.पी.ए.चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने जागा वाटपाच्या मुद्यावरुन आपल्या सहकारी पक्ष कॉँग्रेसला अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नरेंंद्र मोदींना जर न्यायालयाने सर्व बाबतील दंगलीच्या आरोपातून मुक्त केले असेल तर त्यांच्यावर आता असा आरोप करणे म्हणजे न्यायालयाचा अपमान करण्यासारखे आहे असे विधान करुन राहून गांधींना चपराक दिली आहे. कारण राहूल गांधींनी एका प्रदीर्घ मुलाखतीत नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करुन गुजरातमधील दंगलींना जबाबदार धरले होते. त्यानंतर पटेल यांचे हे विधान म्हणजे राहूल गांधींना थेट आव्हान देण्याचा प्रकार होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच अशा प्रकारे वैचारिक बेबनाव सुरु असताना दिल्लीत मोदी व शरद पवार यांची भेट झाल्याची बातमी प्रसिद्द झाली होती. मात्र शरद पवारांनी याचे खंडण केले आणि आपण दिल्लीतच नव्हतो असे म्हटले होते. परंतु पवार ज्यावेळी एखाद्या गोष्टीचे खंडण करतात त्यावेळी तशी वस्तुस्थिती नसते. त्यामुळे पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलटे होत असते असा अनेकांचा अनुभव आहे. अर्थात मोदी यांना पवार यापूर्वीही भेटले असतील, परंतु सध्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भेट होण्याला खास महत्व आहे. सध्या मोदी पंतप्रधान होतील असे वारे आहे. भाजपाला आणि त्यांच्यातील मोदी गटाला फक्त मोदींचा आता शपथविधी उरकणे बाकी आहे असेच वाटते आहे. मोदींचा हा फुगा निवडणुकांनतर फुटणार आहे. मोदी जर स्वबळावर पंतप्रधान होणारच असतील तर पवारांना त्यांची भेट घेण्यात रस तो कशाला असेल? म्हणजेच मोदींशी गुफ्तगू हे पवार हवापाण्याच्या गप्पांसाठी करणार नाहीत. तर भाजपा सत्तेवर येणार नसल्याने पुढील फिल्डींग लावण्यासाठी भेट घेतली असावी. सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आपण भविष्यात नेमके काय करायचे याची पक्की दिशा नाही. कारण केंद्रात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा येणार नाही हे नक्की झाले आहे. अशा वेळी केंद्रातली सत्ता तर जाणार आहे. अशा स्थितीत भाजपा आलीच तर आपल्याला सत्तेत कशाप्रकारे वाटा मिळतो त्यानुसार शरदराव आपली दिशा ठरविणार आहेत. भाजपाच्या थेट गोटात जाऊन सत्तेत वाटेकरी व्हायचे की भाजपाच्या पाठिंब्याने आपणच सरकार स्थापन करावयाचे हे सर्व निवडणूक निकालांनतर ठरणार आहे. शरद पवार कितीही नाही म्हणाले तरी त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. अर्थात तशी इच्छा असण्यात काही गैर आहे असेही नव्हे. मात्र शरदरावांचे वय व प्रकृती पाहता त्यांना यावेळी जर संधी मिळाली तर ती एक सुवर्णसंधी ठरेल. अन्यथा जशी वर्षे निघून जातात तसे वातावरणही बदलत जाते आणि प्रकृतीही साथ देत नाही, त्यामुळे पवारांना पंतप्रधानपद हे यावेळच्या निवडणुकांनंतरच मिळाले तर ते पाहिजे आहे. राष्ट्रवादीने कितीही ताणले तरी त्यांच्या सध्याच्या जागा काही वाढणार नाहीत, उलट कमीच होतील. राष्ट्रवादीला अजून ापल्या खासदारांची संख्या काही दोन आकड्यांवर पार करता आलेली नाही. अशा वेळी शरद पवारांना आपले स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रात भाजपाची मदत घ्यावी लागणार आहे. सध्या कॉँग्रेसच्या कळपात असताना एकदम हिंदुत्ववाद्यांची पाठराखण करणार्या भाजपाच्या बरोबरीने जाणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे पवार आत्तापासून नरेंद्र मोदींना सर्व न्यायालयाने कसे मुक्त केले आहे ते प्रफुल्ल पटेलांमार्फत सांगत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे भाजपाचा दरवाजा शरद पवारांनी किलकिला करुन ठेवला आहे. दुसरीकडे कॉँग्रेसची दोस्ती आहेच. म्हणजे कॉँग्रेस जर सरकार स्थापन करु शकले नाही तर त्यांच्या पाठिंब्याने व डाव्यांना बरोबर घेऊन बेरजेचे राजकारण पवार करु शकतात. तिसरी आघाडी शरद पवारांना केंव्हाही अनुकूल आहे. त्यामुळे पवार निवडणुकांनंतर कोणाला कशा जागा मिळतात त्यानुसार सत्तेची खिचडी पकवू शकतील. तेवढी त्यांच्यात आर्थिक ताकदही आणि त्यांनी तसे मित्रही सर्व पक्षात जोडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना सध्याची असलेली खासदारांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे कॉँग्रेसवर जागा वाढवून देण्याबाबत दबाव टाकण्याचे तंत्र सुरु केले आहे. एकदा जागा व मतदारसंघ नक्की झाले की राष्ट्रवादी आपल्या स्टाईलने कॉँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी रणनिती आखू शकते. अर्थात तशी रणनिती दरवेळी केली जाते परंतु त्यात त्यांना फारसे यश येतेच असे नाही. तरी देखील निवडणुकीच्या राजकारणात शरद पवार असे पत्ते नेहमीच फेकीत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या तीन दगडांवर पाय ठेवून आहे. यातील एक दगड म्हणजे कॉँग्रेस पक्ष आणि त्यांची सध्याची आघाडी. दुसरा दगड हा भाजपाचा आहे आणि तिसरा दगड हा तिसर्या आघाडीचा आहे. अशा प्रकारे तीन दगडांवर पाय ठेवून आपला पाय कुठे तरी निसरडू शकतो आणि आपण त्यात मार खाऊ शकतो याची कल्पना पवारांना आहे. परंतु त्यांचाही सत्तेच्या राजकारणात नाईलाज झाला आहे.
-------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा