संपादकीय पान मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
महाराष्ट्र, कनार्टक शिक्षणात आघाडीवर
--------------------------------
आपल्याकडे देशात आता के.जी. पासून पी.जी. पर्यतं सर्व पातळ्यांववरील शिक्षण उपलब्ध असले तरीही महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांनी या क्षेत्रात चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही दोन्ही राज्ये शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. देशात गेल्या दहा वर्षात अशा चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता यावे यासाठी ३७ लाख मुलांनी शैक्षणिक स्थलांतर केले. त्यात ११ लाख मुलींचा समावेश आहे. कर्नाटकात येऊन शिक्षण घेणार्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १.८ लाख एवढी होती. तर उत्तरप्रदेश या राज्यातून सर्वाधिक म्हणजे १.१ लाख मुले बाहेरच्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी गेली. स्थलांतर हे रोजगारासाठी नेहमीच होते. अनेक वेळा देशार्ंतंगत तर विदेशातही हे स्थलांतर होते. मात्र शिक्षणासाठी पूर्वी फार कमी स्थलांतर होत असे. आता मात्र गेल्या दहा वर्षात शैक्षणिक स्थलांतर वाढले आहे, असे एका पाहाणी अभ्यासात आढळले आहे. अशा प्रकारे आपल्या देशात चांगल्या शिक्षणाच्या संधी या दोन राज्यात उपलब्ध झाल्याने येथे शिक्षण घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. ज्याप्रकारे उच्चशिक्षण घ्यायला मुले विदेशात जातात तसेच आता देशात ठिकठिकाणाहून मुले शिक्षण घ्यायला या दोन राज्यात येऊ लागली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकाच्या जोडीला आता दिल्लीलाही जाऊन शिक्षण घेण्याकडे मुलांचा कल वाढतो आहे. उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्यातून शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाणारी मुले जास्त आहेत. अर्थात यात निव्वळ शैक्षणिक स्थलांतराचा समावेश आहे. म्हणजे जर एखाद्याच्या पालकांची बदली झाली आणि त्या मुलाने आपल्या शिक्षणासाठीचे स्थळ बदलले आहे अशा विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश नाही. कारण ते शैक्षणिक स्थलांतर नाही. जी ३७ लाख मुले केवळ शैक्षणिक कारणासाठी अन्य राज्यात जाऊन शिकू लागली आहेत त्यांचाच यात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पहिल्यापासून पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले गेले आहे. सध्याच्या काळात पुणे हे आय.टी.चे मुख्य केंद्र म्हणून विकसीत झालेले असतानाही पुण्याची शैक्षणिक ओळख काही फुसली गेलेली नाही. त्यामुळे आजही पुणे हे एक मोठे शैक्षणिक केंद्र आहे. त्याचजोडीला मुंबई विद्यापीठाचा दर्जा हा देशात उत्कृष्ट मानला जातो. हा दर्जा विद्यापीठाने टिकविण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे या विद्यापीठात येऊन शिक्षण घेणे ही आपल्याकडील विद्यार्थ्यांची एक इच्छा असणे आपण समजू शकतो. अशा प्रकारे कर्नाटकातही काही शैक्षणिक बेटे चांगल्या तर्हेने विकसीत झाली आहेत. आता आपल्याकडे सरकारने विदेशी विद्यापीठांना त्यांची केंद्रे देशात स्थापन करण्यासाठी परवानगी दिली आहे. अर्थात प्रत्याक्षात ही विद्यापीठे आपल्या देशात सुरु होण्यास अजून काही कालावधी लागेल. परंतु ते झाल्यावर भारत हे एक मोठे आशियातील एक शैक्षणिक केंद्र विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांसाठी होऊ शकते. कारण ज्या आशियातील विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन चांगल्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जो खर्च येतो त्याच्या अर्द्या किंमतीत त्याचे त्याच दर्ज्याचे शिक्षण आपल्याकडेच होऊ शकते. याचा केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर विदेशातील प्रामुख्याने विकसनशील देशातील मुलांना चांगला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला यातून चांगले विदेशी चलन कमविता येऊ शकल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला आधार मिळू शकतो. अर्थातच यातही महाराष्ट्र व कर्नाटकही आघाडीवर असेल, यात काहीच शंका नाही. गेल्या दहा वर्षात शिक्षणाचा दृष्टीकोन व महत्व बदलल्याने आपल्याकडे ३७ लाख मुलांनी स्थलांतर केले. पुढील दहा वर्षात हे चित्र आणखी बदललेले असेल आमि यात ही दोन्ही राज्ये आघाडीवर असतील.
-----------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा