संपादकीय पान मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
फेसबूकची दशकपूर्ती
-------------------------
जगभरातील तरुणाईला वेड लावणार्या व दळणवळणात क्रांती करणार्या फेसबूकच्या स्थापनेला आज बरोबर दहा वर्षे होत आहेत. एखाद्या कंपनीच्या आयुष्यातील दहा वर्षे ही काही मोठी समजली जात नाहीत. मात्र फेसबूक हा त्याला आपवाद ठरावा. कारण स्थापनेपासून गेल्या दहा वर्षात फेसबूकने ज्या गतीने आपला जगभरात विस्तार केला ते पाहता त्यांच्या दशकपूर्तीला त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे महत्वाचे ठरते. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीने जी मजल पन्नास वर्षात मारली असेल ते उदिष्ट फेबसूकने अवघ्या एका दशकातच पूर्ण केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे फेसबूक हा आधुनिक इंटरनेटच्या काळातील एक चमत्कार आहे. दळणवळणाचे एक महत्वाचे साधन म्हणून जगापुढे आले आहे. पूर्वी एखाद्याशी संपर्क साधण्यासाठी आठवडा किंवा महिना लागत असेल तो कालावधी फेसबूकने काही मिनिटावर आणला. म्हणूनच फेसबूक हे आधुनिक काळातील चमत्कार ठरावा. दीडशेे वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी देशात तार खाते सुरु केले त्याकाळातले ते एक वेगवान दळणवळणाचे साधन समजले जात होते. त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेग आता फेसबूकने गाठला असताना तार खाते आता कालबाह्य झाले आहे. आता फेसबूक आपली वयाची दहा वर्षे पूर्ण करीत असताना याच वर्षी तार बंद होणे हा एक काळाने दिलेला अजब न्याय ठरावा. फेसबूकने तरुणाईचेच नव्हे तर जगातील अबालवृध्दांचे जनसंपर्काचे माध्यमच पार बदलून टाकले. फेसबूकचा दहावा वाढदिवस आज साजरा होत असताना त्याच संस्थापक मार्क झुकेरबर्गचा ३०वा वाढदिवस येत्या मे महिन्यात साजरा होणार आहे. वयाच्या वीसाव्या वर्षी झुकरबर्गने आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर लावलेले हे फेसबुकचे हे रोपटे आता जगात बहरले आहे. हारवर्ड विद्यापीठात शिकत असताना एका छोट्याश्या खोलीत स्थापन केलेल्या या कंपनीचा विस्तार एका महाकाय जागतिक वृक्षात होईल आणि जगातील सारी जनता त्याच्या प्रेमात पडेल याची फुसटशी कल्पनाही मार्कला ही कंपनी स्थापन करताना नव्हती. आज दहा वर्षानंतर फेसबूककडे साडेसहा हजार कर्मचार्यांचा ताफा आहे. ७५ कोटी लोक दररोज फेसबूकचा वापर सक्रियरित्या करणारे आहेत. म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के जनता फेसबूकचा वापर रोज करतात.फेसबूकची ही वाटचाल थक्क करणारी आहे. ऐवढेच काय फेसबूकच्या कंपनीचे भांडवली मूल्य १३५ अब्ज डॉलर ऐवढे आहे. जगातील ज्या झपाट्याने प्रगती करणार्या कंपन्या अमेरिकेत ओळखल्या जातात ते फेसबूकने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. गेल्या वर्षी फेसबूकने अमेरिकेतील भांडवली बाजारात नोंदणी करण्यासाठी आपल्या कंपनीचे समभाग विक्रीस काढले त्यावेळी गुंतवणूकदार त्याच्या खरेदीसाठी तुटून पडले होते. अर्थात हे गुंतवणूकदार काही समभागांची भावनीक खरेदी करीत नाहीत तर त्या कंपनीची आर्थिक वाटचाल व त्याचे भवितव्य हे पाहूनच समभाग खेरदी करतात. त्यामुळे फेसबूकचे आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याचा हा पुरावाच होता. फेसबूकची जी गती गेल्या दशकात होती ती कायम ठेवणे हे काही सोपे नाही. त्यामुळे झुकेरबर्ग याला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात फेसबूकने पाऊल टाकण्याची योजना आखली आहे. त्यासाठी त्यांनी विविध ऍप खरेदी केले आहेत तर त्यासंबंधीच्या काही कंपन्या आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. सध्याच्या आधुनिक काळात जगाची दळणवळणाची साधने झपाट्याने बदलत आहेत आणि यातील मुख्य वाटेकरी हा फेसबूक आहे. आपल्याकडे व आपल्यासारख्या विकसनशील देशात फेसबूक हे अत्यंत लोकप्रिय झाले आहे. ते एक व्यवसायाचे साधन असू शकते तर मैत्रीचा सेतू यातून बांधला जाऊ शकतो. प्रत्येक वयोगटासाठी व प्रत्येक क्षेत्रातील माणसांसाठी फेसबूकचा उपयोग होऊ शकतो. गेल्या वेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत फेसबूकचा अत्यंत प्रभाविपणे वापर सुरु झाला आणि जगातील राजकारण्यांनी हा दुवा पकडून निवडणुकांसाठी याचा उपयोग करुन घेण्याचे ठरविले. आपल्याकडे अलीकडेच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये या सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यानंतर आता येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही फेसबूकव्दारे प्रचार करण्याचा सपाटा सर्वच पक्षांनी लावला आहे. अशा प्रकारे सोशल मिडियाव्दारे लोकांपर्य्त पोहोचण्याचे एक नवीन साधन उपलब्ध झाले आहे. असे म्हटले जाते की, ज्या गतीने फेसबूक वाढले त्याहून जास्त झपाट्याने ते संपेलही. कारण जगात एवढ्या झपाट्याने तंत्रज्ञान बदलत आहे की, काळाच्या ओघात फेसबूकही कालबाह्य होण्याची शक्यता आहे. पुढील दहा वर्षात फेसबूक अस्तित्वातच नसेल असेही बोलले जाते. अर्थात हे खरे होईल किंवा नाही हे काळच ठरवेल. मात्र झपाट्याने बदलणार्या तंत्रज्ञानात फेसबूकलाही त्याच गतीने बदलावे लागणार आहे. सोशल मिडिया हे आज प्रभावी वाटत आहे, परंतु भविष्यात त्यालाही काही पर्याय उभा राहू शकेल. तार खाते बंद होईल हे जसे शंभर वर्षांपूर्वी खरे वाटले नसते तसेच फेसबूकचेही होऊ शकते. जगात हे बदल होतच असतात. या बदलाच्याच डोलार्यावर जगाच्या तंंत्रज्ञानाचा अविष्कार अवलंबून असतो. भविष्यात फेसबूक कुठे असेल याची चिंता आज करण्याची गरज नाही. गेल्या दशकात फेसबूकने जे साध्य केले आहे ते अजब असेच आहे आणि इतिहासात त्याची नोंद सुवर्णाक्षराने झाली आहे.
------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा